2
मी …………
मी कुठल्या बँकेचा थकबाकीदार आहे
म्हणून काय मला विचारता …?
मातीसाठी मातीत गेलो
इतकीच माझी थकबाकी
पुरेशी नाही काय ….?
ज्यांनी फेडले त्यांनी पाप केले
ज्यांनी बुडवले त्यांना
सगळे कर्ज माफ झाले ….
ठाऊक आहे मला
एकदाच होईल माफी
मग जन्मभर कापाकापी ……….
रचून ठेवली जातील माझ्यासाठी
चौकशी आयोगाची लाकडं
कारण आकडे सादर करणाऱ्याचं या देशात
कुणीच करू शकत नाही वाकडं ………सुनील वडसकर
काटोल
Matisathi Matit Gelo Marathi kavita written by sunil wadaskar katol, nagpur. unlimited collection of Marathi geet.
2