लालबाग च्या राज्या तुझीही
थोडी झुकली असेल मान
विकृत मनोवृत्तीच्या राक्षसांनी
विसर्जनाला घातला जो थैमान !दहा दिवस राजा मनोभावी केली पूजा तुझी
बौद्धिक संस्काराची आरती ओवाळली
विषन्न डोकी ? सर्व दिखावाच होता ?
का विनयभंग कराया हात हा सरसळला ? !देवा तुझ्या येण्याचा अर्थच विसरलोय ?
तू मातेच्या रक्षणार्थ मान (डोक) गमविली
गज- आनना तुझ्याच डोळ्यादेखी मात्र
तिच्याच रुपाची आम्ही आब्रू आज लुटलीतुझ्या आगमनाची चाहूल लागता
मन्हे दारूविक्रेते खुष होतात
तरुणाईला झिंग चढू लागतो
डीजे च्या मग्ध धुंद आवाजातदेवा जर दहा दिवस वासतव्य तुझ
आम्हा सदबुधीही देऊ नये
नुसत्या विकृतीच्या प्रदर्शनार्थच म्हणावं
पुढच्या वर्षी लवकर ये ………..
पुढच्या वर्षी लवकर ये ………..तुषार शेळके
२०/०९/१३