Birthday Cack :
Celebrate a birthday by baking one of our stunning cake. Discover our collection of delightful and easy birthday cake recipes that will give you plenty of great ideas for baking a festive cake. We’ve got lots of easy birthday cake recipes and ideas for you to make at home.
साहित्य -: मैदा एक पाव, तूप अर्धी वाटी, पिठी साखर एक वाटी, बेकिंग पावडर छोटा एक चमचा, बेकिंग सोडा अर्धा चमचा, एक कप दुध, एक कप कंडल्स मिल्क.काजूचे पाच ते सात तुकडे.
कृती -: मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा एकत्रित करून चाळणीतून गाळून घ्यावे. नंतर तूप, पिठीसाखर, एकत्रित करून मिक्स करावे, त्यात अर्धा कप दुध, कंडल्स मिल्क एकत्रित करून मिश्रण तयार करावे, नंतर त्यात बेकिंग पावडर व बेकिंग सोडा याचे एकत्रित केलेला मैदा घालून चांगले मिश्रण तयार करावे. बाकी असलेले दुध आवश्यक वाटल्यास परत घालून ते मिश्रण तयार करावे. गुठली राहणार नाही याची काळजी घ्यावी. [जास्त घट्ट किंवा जास्त पातळही करू नये] मिश्रण एकजीव करून चांगले फेटून घ्यावे. आता पसरत व खोलगट असणारे भांडे जे कुकरमध्ये व्यवस्थित बसणारे भांडे केक तयार करण्या करीता या प्रमाणे तयार करावे. प्रथम त्याला आतील भागातून सभोवताल तूप लावावे [तूप नसल्यास लोणी चालेल] त्यात कोरडा मैदा गाळून तो सभोवताली भांड्याला त्याचा थर द्यावा. बाकी मैदा भांडे पालथे करून काढून घ्यावा. [हाताने काढू नये मैद्याचा थर सभोवताली व्यवस्थित हवा.] नंतर त्यात संपूर्ण मिश्रण ओतावे.व त्यावर काजूचे तुकडे सजवावे. नंतर कुकर मंद आचेवर ठेऊन त्यात एक ते दीड कप कोरडे मीठ घालावे व तळाशी पसरून घ्यावे. मीठ थोडे गरम होऊ द्यावे. नंतर त्यावर अलगद केकचे भांडे मांडावे. कुकरचे झाकण बंद करावे परंतु शिटी लाउ नये. मंद आचे वर कुकर ४० ते ५० मिनिटे ठेवावे. नंतर कुकर थंड झाल्यावर केक शिजून फुलला काय ते बघण्या करीता त्याचा ब्राउन रंग येतो. तसेच सुरीने टोचून बघावे सुरीला चिकटून येत नसेल तर झाला असे समजावे. दुसरया थाळीत काढण्यापूर्वी सभोवताली सुरुने मोकळा करून घ्यावे. नंतर पालथा करून काढावे. परत त्याला सरळ करून घ्यावे व काप द्यावा अश्या पद्धतीने केक तयार केला जातो .
Recipe: Homemade birthday cake. Get list full ingredients required for this recipes. a very birth day cake for your family. Homemade birthday cake.