Dont Hurt others and wish for others Loss, Its really bad Hobbit if you are wishing for the others loss. never ever think in negative way and wish for others benefit.
दुस-याचे वाईट व्हावे असे मनातही आणू नका कारण आपले विचार परत फिरून आपल्याकडे येत असतात. दुस-याविषयी मनात चांगले विचार आणावेत, जेणे करून सर्वंच सुखी समाधानी आनंदी होतील. नेहमी गोड बोलावे. एखाद्या वेळी कठोर बोलावयाचे झाल्यास बोलू नये असे नव्हे. जरूर कठोर शब्द वापरावेत, पण काही वेळानंतर त्यास समजवावे. म्हणजे त्या व्यक्तीस राग तर येणार नाही उलट आपल्याविषयी त्याच्या मनामध्ये प्रेमाची भावना उचंबळून येईल. नात्यातील गोडवा कायम राहील. सुंदर जीवनाचा लाभ जर घ्यावयाचा असेल तर काही पथ्ये पाळावी लागतात. उदाहरणार्थ, घरात छोट्याशा कारणावरून भांडणे करू नयेत, समजुतीनी आलेल्या अडचणी किंवा समस्या सोडवाव्यात म्हणजे कटुता निर्माण होणार नाही नी घरातील समस्या घरातच राहील असं मला वाटतं. आपण याविषयी काय सांगाल. हरी ओम.
प्रदीप नरहरि केळकर…
ठाणे, ११०९२०१३.