देह आनिक मन महती !
Like
Like Love Haha Wow Sad Angry

The proud of body and soul, human body is the wold best creature produce by god. body and brain are two important part of body.

guru ani shishya

मानवी जन्म आणि देहाच महती निरनिराळ्या अवतारी महात्म्यांनी सांगितली आहे बाह्यत:एक सारखा दिसणारा देह धारण केलेल्या व्यक्ती एकाच संदर्भात वेगवेगळे वर्णन करताना दिसतात दुर्लभ आणि कष्टसाध्य असा नरजन्म लाभल्यावर बहुतांशी मानवी समाज त्यांची हेळसांड करताना दिसतो. त्याचे सार्थक करावे याची जाणीव बहुसंख्याना नसते. एव्धेच काय, ज्यांना याची थोडी जाणीव असते त्यांना ‘मानवी जीवनाचे सार्थक करावे हे आपल्या सारख्यांचे कामच नाही’ असे वाटते. बहुतेकांची समज जन्माला आला, गेला अन पाणी वाहता मेला’ अशी दुरावस्था असते. पण असे का? असा खरोखरच प्रश्न पडतो कष्ट करण्याची मानवाची तयारी नाही असे सुद्धा म्हणता येणार नाही. कारण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपे पर्यंत तो सतत कामच करतो. मानवी जीवनाचे सार्थक करावयाचे म्हणजे नेमके काय करायचे या विषयी तो अज्ञांनी आहे.

आपण कोण आहोत? आपल्याला काय हवे आहे? ते कशा प्रकारे प्राप्त केले पाहिजे? आपण ज्याप्रकारे आयुष्य जगतो आहोत! अश्यांसारख्या अनेक प्रश्नांची उकल हवी आहे, आणि ती सहजतेने समजेल आणि आचरणात आणता यायला हवी. सध्याच्या या कली युगात हे ज्ञान फार अत्यावश्यक आहे.

मानवी जन्म, बुद्धी आणि मन:

मनुष्य म्हणून जन्माला आल्यावर मन आणि बुद्धी यांच्या आधाराने त्यांना जागातील सुख-दु:खांचा अनुभव घेता येतो. आणि स्वत:चा विकास करता येतो. हा विकास मानवी देहा कडून मन आणि बुद्धी यांच्या मदतीने होतो. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. बुद्धीची धाव  सतत विकासाकडे असते तर मनाची धाव विकारांकडे असते. जेव्हा मन विकारांकडे धाव घेऊन त्यातच लुप्त होऊन राहते त्यावेळी मनुष्याचा बौद्धिक विकास कुंठीत होतो. मन ऐहिक गोष्टीत जास्त रमते आणि शारिरीक सुखामागे धावते

परंतु या सुखाचा त्याला शेवटी कंटाळा येतो,त्यातील फोलपणा जाणवतो आणि हि ऐहिक सुखे त्याच्या मानसिक दु:खाची कारणे बनतात. आणि या दुखांतून त्याला मुक्ती हवी असते पण ती मिक्ती हवी तेव्हा मिळविणे त्याच्या हातात नसते. कारण मानवी जीव हा मुळात मर्यादांनी बांधलेला असतो. त्याच्या प्रत्येक कृतीला व शक्तीला मर्यादा ही असतेच पण मानवाला याची जाणीव  नसते. त्यामुळे तो मर्यादांचा विचार न करताच जीवन जगत असतो. व येतो तसाच जातो. वास्तविक पाहता जीव जन्माला येण्यापुर्वीपासूनच म्हणजे गर्भावस्तेतच त्याला मानवी जीवनाच्या यातनांचे ज्ञान झाले असते. त्यामुळेच त्या जिवाचा गर्भावस्थेत को हं  (मी कोण) असा जप चालू असतो. तेथे त्याला स्वत:ला जाणून घेण्याची इच्छा असते. त्यामुळे जन्माला आल्या बरोबरच तो कॉवं असा आवाज काढतो. स्वत:ला असाहाय्य समजून मी कोण? मी कोण? असा आक्रोश करतो. पण त्या अर्भकाचा हाकेला त्याची जन्मदात्री तरी काय उत्तर देणार? कारण तिला स्वत:लाच माहित नसते. की ती कोण?

त्यामुळे हा जीव प्राप्त परिस्थितीत व देहांतर्गत असलेले षड्रिपू त्यांच्याशी समायोजन स्वीकारतो व को$हं ला विसरून केवळ देह रूपाने तो सो$हं रूपाने जपत राहतो. त्याचा स्वत:ला जाणण्याचा ध्यास येथेच संपतो. सामान्य मनुष्य याच पद्धतीने सो$हं म्हणत देह संपवितात. परंतु सत् पुरुष को$हं चे स्वरूप जाणतात. को$हं म्हणजे दुसरा कोणी नसून ‘तोच तो मी आहे’ याच  रहस्य स्वत:जाणतात व ईतरांनाही या मार्गावर आणून सोडतात. परमात्माच जिवात्माच्या रूपाने जन्माला आला आहे हे त्यांना समजते. त्यामुळेच त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. हा मोक्ष म्हणजे दुसरे काही नसून जिवाचे परमात्म्यात विलीन होणे होय.

आपण म्हणजे सर्व सामान्याना निदान या आत्म्याच्या अंतरी परमात्मा आहे ह्याची जाणीव झाली तरी पुरे. ही जाणीव आपल्याला व्हावी म्हणून– श्री गुरुदेवांनी मानवी देह म्हणजे नक्की काय? त्याची अवस्था व स्थिती कशी असते ? त्यात मन कसे असावे ?मनाला कसे सांभाळावे ? स्वत: विकास कसा करून घ्यावा ? मोक्ष कसा मिळविता येणे शक्य आहे ? आणि जरी मोक्ष मिळाला नाही तरी त्या मार्गापर्यंत कसे येता येईल ? हे सर्व आपल्याला समजणे आवश्यक आहे असे म्हटलेले आहें —  त्याकरिता सोपी समज , — सर्वसामान्यत: मानवी देहाची व्याख्या म्हणजे ५ ते ६ फुटाचा मानवी देह हे वर्णन येथेच संपते. परंतु सत् पुरुष्याना या देहाचे सुक्ष्म ज्ञान असते. त्यांनी देहाचा अंतर्बाह्य अभ्यास केलेला असतो.प्रत्येक भागाचा अनुभव घेतलेला असतो त्यामुळे देहाच्या प्रत्येक अवस्थेचे त्यांना संपूर्ण ज्ञान असते.या देहाच्या जन्मापासून ते मोक्षापर्यन्तच्या प्रत्येक अवस्थेबद्दल ते अधिकार वाणीने बोलू शकतात.

देहाचे तीन भाग आहेत. स्थूल, सूक्ष्म आणि कारण. स्थूलदेह हा आपण डोळ्यांनी बघू शकतो. सूक्ष्म देह मात्र सामान्य व्यक्ती बघू शकत नाही मात्र सूक्ष्मदेहाचे ज्ञान सिद्धपुरुषांनाच होते. हा देह डोळ्यांना दिसत नसला तरी त्यांना अनुभवाला आल्या शिवाय राहात नाही. तिसरा देह म्हणजे कारणदेह या कारणदेहामुळे मनुष्याला पुन:पुन: जन्म घ्यावा लागतो. कारणदेहाचे स्वरूप व ज्ञांन व्यक्तीला पाहिल्यानंतर  सत्पुरुष किंवा सिद्धपुरुषच जाणू शकतात. व्यक्तीच्या देहाची आकृती, हालचाल, चेहरा, कृती या सर्व गोष्टी पाहिल्या नंतर कारण देहाचे ज्ञान सत्पुरुष करू शकतात. कोणत्याही योनीत जन्माला येण्याचे कारण व मुक्तीचा मार्ग हेही ते जाणतात. “स्थूलदेह” हा अस्थि आणि रक्त मासाचा एक गोळा असतो. या रक्त, मास, अस्थि यांना जोडणारी कोणतीही तार किंवा कोणत्याही चलित यंत्राचा उपयोग केलेला अंसतो. तरीही स्थूलदेहाला जिवंतपणाची भावना कशी येते ? हे तर मोठे रहस्य आहे.’स्थूलदेह’ वाढतो, जगतो, हालचाल करतो तो प्रत्येक कृतीचा विचार करतो. हे सर्व तो कसे करतो? स्थुलदेहाचे अति सूक्ष्मतम कार्य कसे चालते हे मानवाला विज्ञानाद्वारे कळते. मात्र त्यांमागील कार्य कारण कळत नाही. स्थूलदेहाला जिवंतपणाची भावना सूक्ष्मदेहामुळेच येते व सर्व कृती घडतात. त्याच सुक्ष्मदेहाला ‘आत्मा’ असे म्हणतात. आत्म्याच्या अस्तित्वामुळेच देहाचे गुण प्रकाशमान होतात. मन, मनाचे भाव, सुख-दु:ख, बुद्धी इ. केवळ आत्म्यामुळे प्रकाशमान असतात. ज्याप्रमाणे सूर्य प्रकाशामुळे सर्व चराचरांच्या गुणांचा विकास होतो, चराचर सृष्टी प्रकाशमान होते. व सूर्यास्त होताच ती अंध:कारात लुप्त होते, आणि जर सूर्य उगवलाच नाही तर सृष्टीतील कोणत्याच सजीवाला त्याचे गुण विकसित करता येणार नाही अर्थात त्याचे अस्तित्वच संपेल त्याचप्रमाणे आत्म्याच्या (सुक्ष्मदेहाच्या) स्थुलदेहातील वास्तव्यामुळे त्याला जीवंतपनाची भावना येते.

* विश्वाच्या अफाट पसार्याचा विचार केला तर मनुष्यजीव अगदी शुद्र आहे. अगदीच थोटा जीव म्हणजे गर्भावस्तेतील जीव ! हा जीव मातेच्या मार्फत अन्न घेतो व वाढतो. हा वाढणारा भाग स्थूलदेहाचा असतो. मनुष्याचा पिंड अन्नमय असतो. अन्नामुळेच त्याची वृद्धी होते व अन्नाअभावी नष्ट होतो. देहासाठी अन्न हे एक शस्त्र आहे ते जर योग्य प्रमाणात घेतले नाही तर घातक ठरेल. जीवन जगण्यासाठी अन्न,अग्नी,वायू,पाणी भगवंताने उत्पन्न केलेच आहे. तरीपण बुद्धीचा वापर करून त्याचा उपयोग आवश्यक तेवढाच करावा म्हणजे ते शस्त्र ठरणार नाही. अन्नाअभावी स्थूलदेह संपतो हे ‘प्रायोपवेषण’ पद्धतीच्या देह्समाप्तीच्या मार्गाद्वारे आपण अनुभवतो.  याच पद्धतीने देहाला अन्न देणे थांबविले जाते अन्नाच्या अभावाने देह खचू लागतो व संपविल्या जातो.

स्थूलदेह भूमीवर पडण्यासाठी भगवंत निरनिराळी कारणे घडवितात. कारण ‘ कारणा शिवाय मृत्यू नाही अशीच भगवंताची नियती आहे. मृत्यू झाला तर रोग,हत्या,आत्महत्या,अपघात यापैकी काहीतरी त्यांच्या मृत्यूचे कारण सांगितले जातात. म्हणून मृत्यू पावतो म्हणजे नेमके काय होते ? देह तर समोरच पडलेला दिसत असतो. देह आलेला आपण पाहातो व गेलेला ही पाहतो. परंतु हे सामान्य मानवांच्या बाबतीत हे स्थूलदेहा पुरते स्थित आहे. स्थूलदेहाची किंमत हि फक्त त्यात ‘ सूक्ष्मदेह’ असेपर्यंतच असते. जेव्हा स्थूलदेहाला सूक्ष्मदेह सोडून देतो,तेव्हा त्याची किंमत मातीमोल होते. गर्वाने ताठ उभा असलेल्या स्थूलदेहाला सूक्ष्मदेह सोडून जाताच तो मातीवर आडवा होतो. व मातीतच विलीन होतो. म्हणून सत्पुरुष सांगतात ‘या स्थुलदेहाचा अभिमान घरु नका ‘ या सूक्ष्मजीव निघून जाण्यालाच आपण मृत्यू म्हणतो. सर्वसामान्य मनुष्याच्या मृत्युला स्वर्गवास, यमसदन, देवलोक असे संबोधतात. पण असामान्य व्यक्तीच्या मृत्युला त्यांच्या कृती,वृत्ती नुसार ‘महाप्रयाण’  ‘महानिर्वाण’ ‘वैकुंठवास’ या प्रमाणे संबोधतात. मात्र मृत्यू ज्याच्या त्याच्या कर्माच्या गती वर अवलंबून असतो.

देहाला सुख दु:खाच्या भावना येतात तरी कशा ?  त्याभावना त्यांच्या पूर्व कर्मा नुसार येतात. यातील दु:खे दूर करण्याचे काम तो भगवंत करीत असतो आणि सुख देण्याचे कामही तोच करीत असतो. कारण तो न्यायी आहे. त्याचा न्याय आपण स्वीकारायलाच पाहिजे. परमात्मा जीवात्म्याच्या रुपात जेव्हा जन्म घेतो तेव्हा तो अशी दु:खे देऊन जीवात्म्या कडून पापाचे क्षालन करून घेतो. ही शिक्षा जीवात्म्याला याचसाठी असते. जर शिक्षा भोगून आपण पापमुक्त होत असलो तर भगवंताला दोष देऊन वाटेल तसे बोल बोलण्यात काय अर्थ आहे?  उलटपक्षी तो आपल्याला ही शिक्षा देऊन आपल्यावर उपकारच करीत नाही कां ?

उदा. संत सूरदास अंध होते पण त्यांनी कधीच भगवंताला दोष दिला नाही. उलट ते म्हणत की हे भगवंता, तू मला डोळे दिले नाहीस त्यामुळे मी कोणतेही पापकर्म पाहू शकलो नाही व करूही शकलो नाही.  मनुष्य प्रथम डोळ्याने कृती पाहतो मगच देहाद्वारे ती कृती घडते. म्हणून भगवंताच्या काही शिक्षा म्हणजे वरदान ठरतात. त्या आपल्याला कळत नाही.

प्रभू ने आपल्याला देह दिला व त्याच बरोबर षडरिपू ही दिले. देह एक आणि सहा शत्रू आहेत.जेव्हा हे षडरिपू देहावर हल्ला करतात. तेव्हा एकटा देह काय करणार ? शेवटी हा देह षड्रिपू च्या ताब्यात जातो कारण तो त्यांच्यापुढे पराजय पावतो. परिणामत: म्हणजे भगवंताला विसरतो. परंतु देहात्मा भगवंताला विसरत नाही. भगवंताला विसरते ते त्याचे मन मनुष्य जन्माला आल्यापासून तो ‘सो अहंम्’ (तो मीच ) असा रात्रंदिवस प्रत्येक उच्छवासाद्वारे जप करीत असतो. देहाला श्वास घेणे व सोडणे सांगावे किंवा शिकवावे लागत नाही.ती क्रिया तो आपोआपच करतो. कारण भगवंताने हा देह निर्माण करतानाच त्याच्यात ही क्रिया केलेलीच आहे. सृष्टीला निर्माण करणारा भगवंत देहात्म्याला त्याचा विसर पडू देत नाही. म्हणूनच हा देहात्मा भगवंताला झोपेत व जागेपणी सुद्धा विसरत नाही. मात्र मनुष्याचे मन झोपेत सर्व विसरते, कृती बंद होते पण श्वासोच्छश्वासाची गती चालूच असते. अगदी मृत्यू पर्यंत ती तशीच चालू असते. याप्रमाणे देहात्मा भगवंताची आठवण कधीच विसरत नाही. परंतु षड्रिपूच्या ताब्यात गेलेले मन मात्र त्यांच्यातून मुक्त करणे अवघड असते. मनुष्याने जन्माला आल्यापासून वेगवेगळ्या गोष्टी अनुभवलेल्या असतात. वेगवेगळ्या सुखांचा आस्वाद घेतलेला असतो. त्यासर्वाना विसरून त्याला भगवंताची आठवण होणे केवळ अवघडच नव्हे तर अशक्य होऊन बसते. मनुष्य देहाचे बरेच चोचले पुरवितो. पण नंतर त्या देहाला रोग होतात. यातून सत्पुरुषही वाचत नाही. कारण स्थूलदेह हा नाशीवंत आहे.

स्थूलदेह हा नाशिवंत आहे याला पंचमहाभूतात विलीन व्हावेच लागते. सृष्टीच्या रचनाकाराचा हा नियम आहे. निर्माण करणे स्थितीत ठेवणे आणि भोग संपल्यावर नष्ट करणे. सुख असो वा दु:ख काही तरी भोगणे चालूच असते. हे सर्व पूर्व सुकृतां प्रमानेच असते. मनुष्यास रोग जडतो. हे त्याचे पापकर्म किंवा पुण्यकर्म नव्हे. देहात रक्त, मास, ओलावा त्यामुळे निसर्गा नियमानुसार रोग होणे नंतर नाश होणे हा धर्मच आहे. निसर्गाचा नियमच असा आहे. नियमच आहें प्रथम निर्माण करून उभे करायचे, नाश करायचा आणि स्वरूप बदलवायचे. देहाला ईश्वरस्मरणाच्या विसराने मालिन्य येते तो आपण स्वच्छ करून घेत नाही. त्यामुळेच आपण वरचेवर आजारी पडत असतो. त्याच बरोबर आपने मन सुद्धा त्या आजारपणातच अडकून पडते. आणि बुद्धी निकामी होते.नंतर मन आणि देह त्यातच गुंतून पडते,यात ईश्वरस्मरण होत नाही.कधी कधी मनुष्य म्हणतो कि काय आतापासून देव देव करायचे काय करू म्हातारपणी पण असा विचार करताना याचा सुद्धा विसर होतो कि हा देह संस्काराने घडविला जातो त्याच्या सवयीचे काम त्याला मिळाले नाही तर तो सुद्धा बेचैन होतो. ज्यांना परमार्थिक दृष्टी असते त्याना हा देह परमार्थाकडे वळविणे सोपे जाते. अन्यथा हा देह वाया जातो. प्रपंचात कितीही सुख असले तरी शेवटी हा देह त्याला कंटाळतो. त्यावेळी मन कमकुवत झालेले असते. आणि मुख्य म्हणजे प्रत्येकालाच म्हातारपण येईलच याची काय खात्री आहे? आणि म्हातारपण आले तरी या देह त्यावेळी जाणीवपूर्वक परमार्थ करू शकेल काय? षड्रीपुंनी युक्त मन देहाला परमार्थाची जाणीव पूर्वक आठवण करून देणे शक्य नाही, हि जाणीव त्याला प्रथमत: थोडी थोडी असायला हवी तेव्हाच वृद्धावस्थे पर्यंत टिकून असू शकते. आणि कधी कधी तर वृद्धा वस्थेपर्यंत देह विकलांग झालेला असतो. आधिव्याधीने ग्रस्त झालेला देहाचे चित्त त्यातच गुंतून पडते. तेव्हा ईश्वरस्मरनाचे संस्कार सुरवात पासूनच लावावे लागते. त्याचेच सहज प्रवृत्तीत रुपांतर होते.

सत्पुरुषांनाही रोग होतात पण त्यांचे मन देहात गुंतून पडत नाही. बुद्धी सदैव योग्य निर्णय घेत असते. निसर्ग नियमा नुसार शरीर हे विकारी असणारच पण मन प्रसन्न असायला हवे. रोगयुक्त देहाला शुद्ध करून अध्यात्म्याने ईश्वरस्मरण करून स्व्च्छ,शांत. प्रसंन्न ठेवता येते. केवळ बाह्य शुद्धी करून अर्थ नाही. अंर्त शुद्धीही महत्वाची आहे. अंर्तशुद्धीने मन ईश्वर चरणाशी स्थिर होते. शरीर कितीही रोगग्रस्त असले तरी मन दुर्बल होत नाही.

The proud of body and soul, human body is the wold best creature produce by god. body and brain are two important part of body.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu