“Badam khanese akkal nahi atI Hai” this is very famous sentence written by somebody, that by taking any special diet we cannot gain special talent.
” बदाम – अक्रोड खाऊन जेवढी अक्कल येत नसेल, तेवढी अक्कल विश्वासघात झाल्यावर येते “. एक सुंदर विचार करण्यास लावणारे शब्द आहेत. आजची परिस्थिती पाहता, कुणावर विश्वास ठेवायचा कुणावर नाही ठेवायचा याचा प्रथम विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण आज अशी स्थिती आहे कि आई वडिलांनी आपल्या मुलांवर विश्वास ठेवून काही हितकारी गोष्टी करण्याचे ठरविले किंवा केल्या तर आपल्या बायकांच्या सांगण्यामुळे मुले ऐकतील हे सांगता येत नाही, म्हणजे आपल्या मुलांच्याकडून विश्वासघात होणार नाही हेही सांगणे कठीण झाले आहे. काही मुले नी त्यांच्या बायका अपवाद असतीलही. सगळ्यांना एका तराजूत तोलणे योग्य होणार नाही असे माझे मत आहे. मित्राला गरज आहे म्हणून त्याची गरज भागवावी तर आपला मित्र शब्दाला जगेल अशी खात्री देता येत नाही. विश्वासघात होणारी दोन उदाहरणे दिली ती पुरेशी आहेत असे मला वाटते. अक्रोड बदाम जरूर खावेत कारण ते आरोग्याच्या दृष्टीने हिताचे आहे. विश्वासघात झाल्यानंतर ” आपण असे करावयास नको होते ” असे मनात येऊ नये यासाठी कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करूनच कृती करणे हितकारक ठरेल असे माझे प्रामाणिक मत आहे. सावधगिरी बाळगणे कधीही चांगले. असे केल्याने विश्वासघात होणार नाही आणि विश्वासघात झाल्यानंतर येणा-या अनुभवास सामोरे जाण्याची वेळही आपल्यावर येणार नाही.