2
युपीए सरकारचं सर्वात महत्वकांक्षी असं अन्न सुरक्षा विधेयक राज्यसभेत मंजुर झालंय.राज्यसभेत थोड्याच वेळापूर्वी झालेल्या मतदानात हे विधेयक मंजूर करण्यात आलं. यापूर्वी 26 ऑगस्ट रोजी लोकसभेनंही या विधेयकाला मान्यता दिली होती. आता या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होणं बाकी असून त्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी याचे लाडके विधेयक म्हणून अन्न सुरक्षा विधेयक ओळखले जाते. हे विधेयक केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्याची टीका सुरूवातीला भाजपाने केली होती. मात्र नंतर भाजपानंही या विधेयकाला पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर जेडीयू, बसपा आणि आरजेडी या युपीए बाहेरच्या पक्षांनीही या विधेयकाला पाठिंबा दिला होता. या विधेयकावर विरोधकांनी सुचवलेल्या शिफारसी फेटाळण्यात आल्या होत्या.
2