‘अनवट’ वाटेवरचा चित्रपट रसिकांच्या भेटीला.!




anawat marathi chitrapat

मराठी चित्रपटांच्या दुनियेत थरारपट तसे सातत्याने सादर होताना दिसत नाहीत आणि हीच बाब हेरून पूजा शेखर ज्योती या युवतीने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे. व्यवस्थापन क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलेल्या पूजाने चाकोरीबाहेरील वाट निवडत ‘अनवट’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यासाठी तिने सुभाष घई यांच्या व्हिसलिंग वूडस्मध्ये विशेष प्रशिक्षण घेतले आणि स्वत:ची निर्मिती संस्था उभी करून ‘अनवट’ साकारला आहे. ‘अनवट’ हा थरारपट असल्याने त्यात छायाचित्राला अनन्यसाधारण महत्व आहे. छायाप्रकाशाच्या खेळाचे संमोहित करणारे छायाचित्रण आणि त्याला संगीताची जोड यावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे पूजाने स्पष्ट केले. या चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी केले असून, हा सिनेमा कोकण, गोवा आणि हैदराबादच्या पार्श्‍वभूमीवर आधारित आहे. १९७५ चा काळ तसाच ठेवून ‘अनवट’ व्दारे एक पिरिमड सिनेमा निर्माण करण्यात आला आहे.

या चित्रपटाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम संगीतकार त्रयी शंकर-एहसान-लॉय यांनी या सिनेमाचे संगीत केले आहे. या चित्रपटात आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर, मकरंद अनासपुरे, किशोर कदम, विभावरी देशपांडे, भार्गवी चिरमुले आदी कलावंत चमकत असून येत्या नोव्हेंबरमध्ये ‘अनवट’ रूपेरी पडद्यावर अवतरत आहे.

पडद्यावर साकारणार तरूणाईची प्रेमकथा!

पूर्णत: प्रेमकथेचा टच घेऊन आणि तरूणाईला डोळय़ांसमोर ठेवून निर्माते तन्मय खंडागळे हे ‘चंद्रकोर’ हा चित्रपट पडद्यावर साकारत आहेत. ज्येष्ठ लेखक निंबाजी हिवरकर यांच्या ‘चंद्रकोर’ याच कादंबरीवर हा चित्रपट बेतला आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद शरद दोरके यांचे असून, राजेश जाधव यांनी या चित्रपटाची धुरा सांभाळली आहे. बर्‍याच कालावधीनंतर मिलिंद शिंदे यांनी या चित्रपटासाठी गाणे गायले आहे. मराठीतील नवीन जोडी जीतू गोस्वामी आणि मनिषा केळकर यात प्रमुख भूमिका रंगवित आहेत.विजय गटलेवार यांनी या चित्रपटातील गीते संगीतबध्द केली आहेत

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

– प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड