rose flowers Essential Oil Profile includes uses, constituents, aromatic description, extraction method, latin name, safety info and references.
लहानांपासून तर व्य्वृद्धापर्यंत सर्वांनाच फुले हवीहवीशी वाटतात. ग़ुलाबाचे फुल तर सर्वांनाच प्रिय आहे. याला राष्ट्रीय फुल हा सन्मान देऊन त्याचे महत्व पटवून देण्यात आलेले आहे. गुलाबाच्या झाडाची उंची पाच ते सात फुट असते. त्याच्या खोडावर काटे असतात. या फुलांचे अनेक रंग असतात. त्यांचा औषधीमध्ये लाल व गुलाबी रंगांच्या फुलांचा बऱ्याच प्रमाणात वापर केला जातो.गुलाबाचे झाड हे लघु, स्निग्ध गुणाचे मधुर, ततुरट रसाचे आहे. शरीरातील वात पित्ताचे शमण करणारी हि वनस्पती भारतात सर्वत्र आढळते. याच्या बाह्योपचारामुळे त्वचेचा रंग उजळतोच शिवाय त्वचेवरील खाज, डाग, सूज ईत्यादि लक्षणे कमी होतात. शौचाला न होण्याची तक्रार अनेक वेळा आढळते. अश्या वेळी वाळलेल्या गुलाबाच्या कळ्या साखरे बरोबर खाव्यात. किंवा त्या कळ्या रात्री पाण्यात भिजवून ते पाणी सकाळी प्यावे. गुलाबापासून चांगल्या प्रतिचा गुलकंद तयार केला जातो. याचा शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी चांगलाच उपयोग होतो. गुलाबाच्या पाकळ्यांच्या दुप्पट प्रमाणात खडीसाखर घेऊन बरणीत गुलाबाच्या पाकळ्या व साखर यांचा एकावर एक थर रचावा, ही बरणी १५ दिवस उन्हात ठेवावी किंवा जमिनीत गद्ढा खणून आठ दिवस पुरून ठेवावी. या प्रमाणे गुलकंद तयार होतो. हा गुलकंद पित्तकमी करणारा, शौचाच साफ करणारा आहे. उन्हाळ्यात गुलकंदाचे नियमित सेवन केल्यास उष्णतेचा त्रास होत नाही. ग्याच गुलाबाच्या पाकळ्या पासून गुलाबजल होतो त्याचा सौंदर्य साधने बनविण्यात उपयोग केला जातो. तसेच यापासून सुगंधित अत्तरे तयार केली जातात. अगरबत्ती, तेल, साबणे यातही याच्या सुगंधित अत्तरांचा उपयोग केला जातो.यांच्या वेगवेगळ्या जाती तयार करण्यात आल्या आहे. त्यांपासून कित्येक रंगीबेरंगी गुलाब बघण्यात मिळतात लग्न, सत्कार कार्ये यासाठी विविध प्रकारचे गुलाब वापरून कार्यक्रमातील शोभ व आनंद द्विगुणीत केल्या जातो. असा हा बहुगुणी गुलाब अती महत्वाचा व उपयुक्त आहे.
Rose flowers : Uses of rose flowers.