आक्रमक आंदोलनांमुळे तेलंगणाचा मुद्दा निकाली निघाला, असे कारण पुढे जात असले तरी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठीही तेवढीची प्रभावी आंदोलने झाली आहेत. अनेक सभा, परिषदा घेण्यात आला. रास्ता रोको ते रेल रोको करण्यात आले. खासदारांनी संसदेसमोर ठाण मांडले तर पंतप्रधान- राष्ट्रपतींची भेट घेऊनही मागणी करण्यात आली. वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी वैदर्भीय जनतेने अनेकदा आंदोलने केली.. ३१ जानेवारी १९९९ साली संपूर्ण वैदर्भीयांनी सामूहिक उपोषण करून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भाजपच्या राष्ट्रीय परिषद अधिवेशनात सहभागी होण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी २६ ऑगस्ट २000 साली नागपुरात आले होते. त्यावेळी राजभवनात खा. विलास मुत्तेमवार, खा. विजय दर्डा, आमदार व ज्येष्ठ नेत्यांसहीत ५0 जणांचे शिष्टमंडळ वाजपेयींना भेटले. २0१0 मध्ये वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा जोर धरू लागली. खा. विलास मुत्तेमवार व खा. दत्ता मेघे यांच्या नेतृत्वात आमदार व काँग्रेस पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने ७ जानेवारी २0१0 रोजी तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची दिल्ली येथे भेट घेऊन पुन्हा विदर्भाची मागणी केली.