वासोटा किल्ला
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Vasota Fort (also called Vyaghragad) is located in Satara district in the Indian state of Maharashtra. full information about Vasota Fort.
वासोटा किल्ला

दर्ग्यात्रींचा आवडता किल्ला म्हणजे वासोटा किल्ला. जावळीच्या जंगलामधील अनोखे नैसर्गिक सौंदर्य लाभलेला हा किल्ला. हा किल्ला म्हणजे एक दर्गरत्न होय.  सह्यान्द्री पर्वताची रांग हि दक्षिणोत्तर पसरलेली आहे . याच पर्वत रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दतेगडाची रांग घाटमाथ्यावर  आहे. हि रांग महाबळेश्वरपासून दातेगडावर जाते . याच दोन पर्वतांच्या मधून कोयना नदी वाहते. याच जावळी खोऱ्यातून वाहणाऱ्या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे . या जलाशयाला शिवसागर असे म्हणतात. या शिवसागर धरणाचे पाणी वासोटा किल्ल्याला स्पर्श करते.  या भागात फार घनदाट जंगल आहे. वासोट्याच्या पूर्वेला घनदाट जंगल आणि पश्चिमेला कोकणात बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूपच वाढली आहे. वासोट्याला जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहे. एक कोकणामधून आणि दुसरा घाटमाथ्यावरून.  कोकणातील ‘चिपळूण’कडून वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे या गावापर्यंत गाडीमार्ग आहे या मार्गावर राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या चालतात. चोरवणे पासून वासोट्याकडे येता येते पण दुसरा मार्ग हा जास्त सोयीचा आहे. सातारा-कास-बामणोली असा गाडीरस्ता असून यावर बसेस आहेत. बामणोली हे गाव शिवसागर जलाशयाच्या पूर्व काठावर आहे. येथून वासोट्याकडे जाण्यासाठी शिवसागर ओलांडावा लागतो.येथून वनखात्याची परवानगी घेवून आपण वासोट्याकडे जाऊ शकतो. साधारण ४० ते ५० मिनिटांच्या प्रवासानंतर आपण वासोट्याच्या जवळ पोहोचतो. पायथ्याजवळ मेट इंदवाली नावाचे गाव होते. ते फार पूर्वीच उठून गेलेले आहे. मात्र त्याचे अवशेष अजूनही आपल्याला येथे पाहायला मिळतात.या अवशेषांच्या जवळूनच गडावर जाणारा मार्ग आहे. या मार्गाने काही अंतर गेल्यावर आपण गडाच्या पायथ्याला पोहोचतो. पायथ्याच्या ओढ्याकाठी मारुतीची मूर्ती आहे. येथूनच किल्ल्याची चढण आणि जंगल सुरु होते. हा चढाईचा मार्ग हा दुतर्फा घनदाट जंगलामधून जातो. यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे व वनस्पती आपल्याला दिसतात.या जंगलात अनेक प्रकारची वन्य श्वापदे आहेत. त्यामुळे सावधगिरीने आणि गोंगाट न करता चढाई करावी लागते. .अर्धाअधिक किल्ला चढल्यावर एक वाट उजवीकडे जाते. ही वाट केतकीच्या गाद्याजवळून पुढे नागेश्वराकडे जाते. सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होऊन कारवीचे रान लागते. कारवीच्या रानातून वर चढल्यावर किल्ल्याच्या पायऱ्या लागतात. त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून आपल्याला गडाचे दर्शन होते. या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने गेल्यावर आपण पूर्वेकडील बाजूस पोहोचतो. या बाजूने दिसणारा शिवसागर जलाशयाचा परिसर फारच सुंदर दिसतो , आणि त्याचरोबर अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा सुद्धा आपले मन मोहित करून टाकतो. येथून समोरच दक्षिण टोकावर गेले कि जुना वासोट्याचा डोंगर दिसतो. जुन्या वासोट्याच्या बाबू कड्याचे तसेच तेथील दरीचे दृश्य आपल्याला मुग्ध करून ठेवते. गडावरही सर्वत्र काडीकचरा वाढला असल्यामुळे गडावरच्या वास्तू त्यात लुप्त झाल्या आहेत. वाटेवर मारुती मंदिरआणि मोठ्या वाड्याचे भन्न अवशेष तसेच महादेव मंदिर आहे. तेथून थोड पुढे गेले कि उत्तरेकडील माची आहे. पण या माचीवर बांधकाम नाही. पण येथूनच दूरपर्यंतचा परिसर दिसतो. नागेश्वर सुळक्याचे दर्शन उत्तम होते. कोकणाचे विहिम्गम दृश्य येथून न्याहाळता येतो. वासोटा हा गिरिदुर्गाबरोबरच वनदुर्गसुद्धा आहे. म्हणून याला ‘मिश्रदुर्ग’ म्हटले जाते. या किल्ल्याचे ऐतिहासिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व होते. हा किल्ला शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो.आणि वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu