सांधे दुखी
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Shoulder pain it comes after certain age, its not new for us. Shoulder problems including pain, are one of the more common reasons for physician visits for musculoskeletal symptoms. Shoulder pain is an extremely common complaint that has many causes. Because we use our arms for so many common activities.

सांधेदुखी हि अशी व्यथा आहे कि, ठराविक वय झालं की सर्वांच्या मनात थोडी भीती निर्माण होतेचं. या दुखण्यावर घरघुती उपाय काय? असा विचार कुणाच्याही मनात येण साहजिकच आहें. कारण संधिवात म्हटले की डॉक्टर त्यांच निदान, क्ष-किरण, ई. उपाय आलेच आधुनिक शास्त्रानुसार सांधेदुखी असली की तो कसल्या तर्हेचा ‘आर्थराय्टीस’ आहें हे बघणे आलेच, आणि त्यासाठी या वेगवेगळ्या निदान परीक्षा कराव्या लागतात. पण निदान पक्क करूनही आधुनिक  वैद्यकात या दुखण्यावर खात्रीचा उपाय नाही.

सांधेदुखी कमी करणारी औषधी आहेत. पण त्यांचे दुष्परिणामही आहेत. ही औषधे घेतल्याने पोटात जळजळतं, व्रन होऊ शकतो, पायांवर सूज येऊ शकते ईतकच नव्हेतर ही औषध रोगाची मूळ प्रक्रिया अधिक गतिमान करू शकतात. आयुर्वेदात आहारविहाराद्वारे या रोगाचा मुकाबला करण्यासाठी बरीच उपाय आहेत ते बघू सांध्याच्या रोगांच एक कारण ‘आम’असते. हा ‘आम’ म्हणजे अग्नीच निट पचन झाल्याने शरीरात अभिसरीत झालेला दुषित आहार रस आणि आहार रस दुषित होण्याच कारण म्हणजे आग्निमाद्य व चुकीचा आहार. जास्तत जास्त रोग मंदाग्नी पासून होतात. त्या मुळे आयुर्वेदात अन्न पचनावर जास्त भर आहे. भूक नसताना जास्त खाणे, तेलकट-तुपकट, रुक्ष-वातूळ, थंड पदार्थ, किंवा विरुधान्न (दही-मासे) यामुळे ‘आम ‘ तयार होत आणि सांधेदुखीची सुरवात होते.असे वाटल्यास ईशारा मिळाला हे जाणून स्वत:पचन सुधारण्यास सुरवात करावी. यासाठी लंघन, बेताचं पचेल तेवढेच अन्न घेण योग्य, पचनक्रिया सुधारण्यास सुंठीची पावडर (अर्धा चमचा) जेवणानंतर घ्यावी. नेहमी गरम पाणी प्यावे. त्या पाण्यात सुंठ, पिंपळी, पिंपळीमूळ चवक, चित्रक घालून उकलावं. किंवा ताकातहि सुंठ पावडर घालून ते प्यावे. मात्र सुंठीचा अतियोग होणार नाही याची काळजी घ्यावी. आणि मलावरोध असल्यास काळजी घ्यावी. शरीर स्थूल असल्यास ते कमी करण्याचा प्रयत्न करावा. या साठी तज्ञाचा सल्ला घ्यावा. वजन कमी करण्यास वाट्टेल तसा ‘डाएट’करू नये. सांधेदुखी  सोसण्यासारखी असली तर ऑस्पिरिन-बुफेन अशी वेदनाशामक औषध घेऊ नये. कारण त्या मुले तात्पुरते दुखणे थांबून सांध्यातील ‘इंन्फ़्लमेट्री’ प्रक्रिया वाढत राहते. सांधेदुखित बिघडलेल्या वाताचाहि सहभाग असतो. यासाठी वात प्रथम ठिकाणावर आणावा लागतो. त्यासाठी औषधी तेलमालिश व शेकावा द्यावा लागतो. किंवा गरम पाण्यात मीठ घालून शेकावा द्यावा किंवा निद्गुडी ची पाने थोड्याश्या एरंडेलावर गरम करून पाने बांधावीत. ‘ नाडीस्वेद ‘ या प्रकाराने औषधीशेक घेता येतो. सांधेदुखी ची सुरवात झाल्यास थंड,आंबट,कडवट ,जड असे वातुड पदार्थ टाळावेत. दही, मास, चिंच, टोमाटो, कैरी, पोहे, चुरमुरे, मेवा-मिठाई, डालड्याचे पदार्थ, आईस्क्रिम, कोल्ड्रीक, कळी, आंबा  हे पदार्थ टाळावेत.

जेवणात आले, लसून, पुदिना, जिरं, सुंठ यांचा वापर करावा. तांदूळ जुने वापरावेत. धान्य भाजून ध्यावे. भाज्यांमध्ये चुका, पडवळ, शेवगा कारले, या पथ्य कारक आहे. पोळीत मोहनाला तेला ऎवजी एरंडेल घालाव. एक चमचा एरंडेल, अर्धा कप सुंठीच्या काढ्यातून मधून मधून रात्रीच्या झोपते वेळी घ्यावा, हे प्रमाण रेचक नाही. थंड जागी बसने टाळावेत. ए.सी. त बसने झोपणे टाळावेत. सांधेदुखी संपूर्ण बरी होत नसली तरी त्यापासून अती त्रास टळतो. त्याच्या मुळची जी प्रक्रिया ती आटोक्यात येते.एकदा का ही प्रक्रिया पसरली, सांधे आखडू लागले, कि ती प्रक्रिया फिरवणे कठीण होते. म्हणून सुरवातीस नियमन करणे फायद्याचे ठरते.

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d