शिवप्रभूच्या डोक्यावरील अर्द्ध चंद्रमा प्रणवरुपाची अर्ध मात्रा दर्शविते आणि त्यांच्या त्या शांत शीतल योग वृत्तीला भूषविते. यावरून योगीगण योगाद्वारे आपल्या चित्अग्निद्वारे संपूर्ण अहंकार नष्ट करतो. त्याच बरोबर पंचतन्मात्रा, पंचमहाभूत सर्व नष्ट करून परम शुद्ध आध्यत्मिक भावात परावर्तीत होउन निर्विकार, शुद्ध, शांत, भावस्वरूप भस्मरुपात विलिन होतात. (शरीर दग्ध करून भस्मरुप होतात, त्याला आपण भस्म म्हणतो.) आणि ते भस्म जेव्हा शिव धारण करतात त्यातच शांती प्राप्त होते. कारण पंचमहाभूतातील सर्व विकार नष्ट झालेले असतात. गंगा हि एक आध्यत्मिक तेजपुंज होय.जी महाविष्णूच्या चरणातून उगम पावते आणि ब्रम्हांड नायक शिवशंकरांच्या जटेत स्थित होऊन त्यांच्या आज्ञे नुसार विश्वाच्या कल्याणार्थ इतरत्र प्रवाहित होते. तिचे तेज आणि प्रवाह फक्त शिवशंकरच धारण करू शकतात.कारण शिव आणि विष्णू हे एकच अंश आहेत. शिव कृपेनेच तिचा अत्याधिक लाभ काशी क्षेत्रास होतो. श्रीशिवाचे पंचमुख आहेत. ईशान, अघोर, तत्पुरुष, वामदेव, सद्योजात — ईशान अर्थ स्वामी, अघोर -अर्थ निंदनीय कर्म करणारे भक्त, अभक्त यांचे कर्म शुद्ध करनेवाले, तत्पुरुष आपल्या आत्म्यात स्तितीलाभ करणे, वामदेव विकारांचे नाश करणेवाले, सद्योजात म्हणजे बालका प्रमाणे परमशुद्ध, स्वच्छ, निर्विकार रूप. आणि त्र्यंबक म्हणजे ब्रम्हांडाचे त्रिदेव अर्थात ब्रम्हा, विष्णू महेश तिघांचे अंब (कारण). जीवात्म्याची प्रगाढ भक्ती, अनन्य अनुराग, विशुद्ध, निर्हेतुक प्रेमाने शिव प्राप्ती होते त्या मिलनात श्रीशिव चरण स्पर्श शांती पूर्णतेला प्राप्त होतात, हे सर्व उदात्त भाव लिंग पुराणात पद-पद परीलक्षित होतात.
शिव – कारण : सृष्टीत परमपरात्पर म्हणजे फक्त ‘शिव’ ज्याना बहिर्मुख नाही, अंतर्मुख नाही, उभय मुख नाही,जे प्रज्ञाधन नाही,प्रज्ञ नाही, अप्रज्ञ सुद्धा नाही. जो वर्णनाचे अतीत, दर्शनाचे अतीत,व्यवहाराचे अतीत, ग्रहणाचे अतित, लक्षणाचे अतीत, चिंतेचे अतीत, निर्देशचे अतीत, आत्मप्रत्यय मात्र-सिद्ध, प्रपंच्यातित , शांत, शिव, अद्वैत आणि तुरीयपदस्थित आहे त्यांचेच नाव ‘महेश्वर’ ‘स्वयंभू’ आणि ‘ईशान’ ते ईश्वराचेही परम महेश्वर, देवतांचे परम देवतां,पतिंचे परमअधिपती, परात्पर परमपूज्य आणि ‘भुवनेश’आहेतं ज्यांच्यात विश्व आहे, ज्यामुळे विश्व आहे, जो स्वयं विश्व आहे, आणि या विश्वाच्याही परे आहे. त्याची भक्ती करनेवाला त्याला जाननेवाला आत्यंतिक शांतीचा अधिकारी आहें. तोच सदाशिव आपल्या शक्तीने युक्त होउन सृष्टी निर्माण करतो. माया हि प्रकृती व महेश्वर त्याचे अधिष्ठाता होय. मायाद्वारे त्यांच्याच अवयवभूत जीवाने समस्त संसार परिव्याप्त आहे. महेश्वराचे सृष्टी रचनाच्या निमित्ताने दोन अंग होतात, कारण आधार आणि आधेय याशिवाय सृष्टी निर्मिती शक्य नाही. आधेय (चैतन्यपुरुष) आधार (प्रकृती, उपाधी) सृष्टीत जितकेही पदार्थ निर्मित आहेत त्यात अभ्यंतर चेतन बाह्य प्राकृतीक आधार अर्थात उपाधी (शरीर) आहे. यातच सर्वांची प्राप्ती होय.
कारण या अनादि-चैतन्य परमपुरुष परमात्माची शिवसंज्ञां सृष्टयुन्मुख होऊन अनादि-लिंग आणि त्याच परम आधेयला आधारभूता अनादि-प्रकृतीचे नाव ‘योनी’ होय. हे दोन्ही या अखिल चराचर विश्वाचे परम-कारण होय. शिव-लिंग रुपात पिता आणि प्रकृती-योनि रुपात माता हीच शिव-पुराण सज्ञां होय. गीता हेच सांगते ‘मह्द्ब्रम्ह’ माझी-योनि ज्यात बीज रोपण करून गर्भ संचार करून सर्व भूतांची उत्पत्ती मीच करतो. तेव्हा या अनादि सदाशिव-लिंग आणि अनादि प्रकृती-योनि समस्त सृष्टीची निर्मिती तेच होय. यात आधेय बीज प्रदाता (लिंग) आणि आधार-बीज धारण करनेवाली (योनि) चा संयोग आवश्यक आहे. या संयोगा शिवाय काहीच उत्पत्ती होऊ शकत नाही. याचे श्लोकांत वर्णन केले ते असे–
॥ द्विधा कृत्वात्मनो देहमर्धेन पुरुषो$भवत् || अर्धेन नारी तस्यां स विराजमसृजत्प्रभु: ||
सृष्टी निर्मिती च्या वेळी परमपुरुष महेश्वराने आपल्याच अर्धांगातून प्रकृती (नारी- पार्वती ) प्रगट करून समस्त सृष्टी निर्मितीची रचना केली. तेव्हा शिव-लिंग-योनिभाव आणि अर्धनारीश्वरभाव हे एकच आहेत. सृष्टीबीज देनेवाले परमलिंगरूप श्रीशिव जेव्हा आपलीच प्रकृतीरूपा नारी (योनि) ने आधार-आधेय सारखे संयुक्त होतात. तेव्हाच सृष्टी निर्मित होते अन्यथा नाही. तेव्हाच श्रीशिव आपल्या तेजोमय प्रकृतीला धारण करून त्यात आच्छादित होऊन व्यक्त होत असतात अन्यथा व्यक्त होणे असंभव आहे. म्हणून ते म्हणतात ‘ हे देवी! तू माझ्या अर्धांगाचे (वाम भागाला) हरण केलेलं आहे. म्हणून तू सुद्धा माझेच शरीर आहे’ .
या लिंग-योनि यांची शिवपूजनात पूजा मानली आहे. हे सृष्टी निर्मितीचे सूचक आहें. या प्रमाणे परमपरात्पर जगतपिता आणि द्यामयी जगन्माता आदी संबंध भावाची द्योतक आहे. अत: हे परम- पवित्र मधुर भाव आहेत. यांत अश्लील भाव आणू नाही.शिवशंकर संपूर्ण विद्यांचे — योग, ज्ञान, भक्ती, कर्म, कल्याणचे भंडार म्हणजे जगद्गुरू श्रीशिव आहेत. फक्त गुरूच नव्हेतर स्वयं आदर्शरूप आहेत. पूर्णत: योगेश्वर, ज्ञानस्वरूप, स्व्च्छ स्वरूप शिवाची फार थोड्या उपासनेत प्रसंन्न्ता प्राप्त होते. त्याच्या उपासने साठी कोठेही जावे लागत नाही, कारण त्यांचे स्थान म्हणजे स्मशान तेथे जाउन उपासना करणे सामान्य मनुष्याचे काम नाही, तेव्हा नर-नारीने लिंग पूजा करून त्यांना शीघ्र प्रसंन्न करून घेता येते. ते योगी आहेत, ज्या स्थळी ते विराजित आहे, ते स्थान अगदी शांत असायला हवे. म्हणूनच ते मोठमोठे पहाड, शिखर, पर्वतांत विराजित असतात. स्वयंभक्ती करीता त्यांनी लिंगपूजा आम्हा सामान्यांना दिली आहे. ते पूर्णत: दयाळू, देवर्षी, मुनी असे मानवांचे ज्ञानदाता आहेत. सर्वांचे मनोरथ पूर्ण करण्यास सदा तत्पर आहेत. शिव कल्याणमयी मंगलमूर्ती आहे, विषय- वैराग्याचे आदर्श आहेत, काही लोक शिवांना भांग पिणे वाले,स्मशानात राहणारे म्हणून त्यांचा सदाचार हीनता आरोप घेतात. पण ते स्वत:चे दुर्गुण झाकण्याकरीता त्यांचा सहारा घेतात हा घोर अनर्थ, पागलपन आहे.खरा शिवभक्त सदाचारी पाहिजे. त्यांच्या भक्तीने मनुष्य गुणातीत होतो. त्यांच्या गळ्यातील सर्प म्ह्णजेच अभिमान, क्रोध आणि दोष या गुणांना वश करणारे भूषण आहे. धर्म म्हणजे वृषभ ते नेहमी वृषभावर (नंदी) आरूढ होतात. ते नेहमी विभूती (भस्म) देहातील पंच तत्व विलीन करून जे शवभस्म म्हणून लेप करतात. तेच निर्विकार शांती प्रदान करते. संपूर्ण चराचर भूत त्यांच्या अधीन आहें. त्यांचे प्रत्येक अंग, आणि आभूषण अध्यात्मिक अर्थ सांगतात. त्यांचे प्रत्येक नाव परममंगलमय, कल्याणमय, सर्वदुखनाशक, सर्वसुखविधायक, सर्वसिद्धीदाता आणि मोक्षकारी आहें. त्यांचे सर्व नाव ‘नम: शिवाय’ या पंचाक्षर मंत्र जपात सिद्ध आहेत. तेव्हा या आशुतोष श्रीशिवाची उपासना करून कृपा प्राप्त करुयां ! ‘ शिव’
Marathi article Shivprabhu Anyabhav, About Lord Shiva – the powerful and fascinating deity of the Hindu Trinity, who represents death and dissolution.