सर्वधिष्ठान , सर्वप्रकाशक, परब्रम्ह परमात्माला वेद ग्रंथात शिवत्तव च म्हटल्या गेलेले आहे. आणि तोच सच्चितानंद परमात्मा स्वत: शिवशक्तीच्या रुपात प्रगट होतो, तो परमार्थ निर्गुण, निराकार असूनही आपल्या अचिंत्य दिव्य लीलाशक्तीने सगुण, साकार सच्चिता नंदघन रूपाने साकार होतो. तोच शिवशक्ती, राधा-कृष्ण, अर्धनारीश्वर होय, सत्ताविना आनंद, आणि आनंदा विना सत्ता हे निष्फळ आहें. म्हणून ‘स्वप्रकाश सत्तारूप आनंद’ असे म्हटल्यास त्या आनंदा विषयीची सुखरुपता वारण होते. जसे आनंद सिंधू चे रूप माधुर्य आहे, तसेच पार्वती शिवस्वरूप म्हणजेच शिवात्मा होय, म्हणून माधुर्यात आनंद आहे, आनंदात माधुर्य.
प्राणी रुपात जितक्या वस्तू तयार होतात, त्या सर्वात योनी म्हणजे उत्पन्न करणे वाली प्रकृती जननी आणि बीज प्रेरक शिव पिता (लिंग) होय. अर्थात मुळ प्रकृती आणि परमात्मा हेच माता-पिता (योनी-लिंग) रुपात त्या त्या वस्तू उत्पन्न करतात. म्हणून वेद-शास्त्र नुसार एक ब्रम्हतत्व म्हणजेच प्रजोत्पादन अनंत रुपात विवरण होतोय. प्रकृतीसंसृष्ट संकल्प प्राथमिक आधिदैविक काम होय यानुसार भगवान अनंत ब्रम्हांड उत्पन्न करतो आणि करवितो.
काम ही भगवान अंश होय, ‘ कामस्तु वासुदेवांश:’ (भागवत) लोकांत काम ,ईच्छा मुख्य विषय आनंद होय, सुख साक्षात कामना आणि अन्य सुखसाधनातून ईच्छा प्रगट होते. तद्रूप आत्मा निरतिशय,निरुपाधिक प्रेमाचा आस्पद होय. अन्य आनंद सातिशय, सोपाधिक अपरप्रेमाचे आस्पद होय. जसे विषय प्रभावात कडूनिम्बाप्रमाने प्रेम प्रतीत होते. आणि भ्रांती, मोह प्रभावात मांस मयी कांतीत आनंदाचा भास होतो. याही व्यतिरिक्त शुद्धप्रेम (आनंद) आत्मातील प्रेम,तो आनंद कामना,स्वाभाविक होय हे क्वचितच (जरुरतमयी उत्पन्न होणारी) आत्माचा अंश होय. यामुळे अद्वैतआत्मा हि निरुपाधिक प्रेमाचा आस्वाद दर्शविते. परंतु त्यांतिल प्रेम आणि आश्रय तथा विषय यात भेद नाही.प्रेम, आनंद, रस हे सर्व आत्म्याचेच स्वरूप आहें.या रसरूप आनंदानेच समस्त विश्व निर्माण होत असते. सर्व वस्तुत त्याच असणं अनिवार्य आहे. सोपाधिक आनंद आणि सोपाधिक प्रेम सर्वत्र आहें. म्हणून कांता सोपाधिक स्वरूप म्हटल्या जातें. सोपाधिक प्रेमविषय आहे. परंतु निरुपाधिक प्रेम निरुपाधिक आत्मातच असतो. सुंदर, मनोहर प्रेम उपादेय आहे. सुंदरी,वेश्यादिकी आनंदरूप हेयता (अशुद्धता) होय. जसे पवित्र, शुद्ध दुध जर अपवित्र (अस्वच्छ) भांड्यात ठेवल्या गेले तर त्याच्या संसर्गाने ते दुध अशुद्ध आणि अपवित्र होते. त्याच प्रमाणे आनंद किंवा प्रेमाची परिभाषा कुसंगत आणि अशुद्ध संसर्गात मापल्या जाते. शास्त्रनिषिद्ध विषयांतील आनंद आणि प्रेमांत दोष आहें, हेयता आहें, पाप आहें. आणि शास्त्रविहित विषयांत आनंद, प्रेम पुण्य आहें. परंतु निर्विशेष सर्वोपाधियुक्त प्रेम, आनंद स्पष्ट आत्मा व ब्रम्ह होय. मात्र देवतां विषयी प्रेमाला भक्ती मानलेली आहें. सजातीय -सजातीय आकर्षण प्रेम, आनंदी आणि काम होय.
परंतु शुद्ध सच्चितानंदघन परब्रम्हस्वरूप आकर्षण, आत्मा आपल्या अत्यंत स्वरूपात आकर्षण किंवा निरुपाधिक प्रेम आत्म- स्वरूप असतो. जसे राधा-कृष्ण, गौरी-शंकर, अर्ध- नारीश्वर परस्पर प्रेम म्हणजे शुद्ध काम होय. हे स्वरूप म्हणजे कामेश्वर किंवा कृष्ण रूप होय. राधा-कृष्ण, गौरी-शंकर, अर्धनारीश्वर हे स्वरूप म्हणजे एकचरूप होत. यातभिन्न अंश नाहीत. अर्धनारीश्वर रूपांत मिथुनीभूत (सिम्मीलित) आहे. तेव्हांच पूर्ण सच्चितानंद भाव प्रगट होतो,वास्तविक रूप एकच होय. सामान्य: (हे भेद औपचारिकता म्हणून दर्शविले आहे) शुद्ध परमतत्व म्हणजे शिवशक्ती, अर्धनारीश्वरभाव शुद्ध आकर्षण प्रेमभाव म्हणून दर्शविण्यात आलेले आहें. महानुभाव पंथात म्हटल्या गेले आहें कि संपूर्ण नरनारी सौंदर्यप्रतिबिंब रूप स्वत:त बघून भगवान स्वत: विस्मित झालेलेतं !