शिव पूर्ण पुरुष ! शिवज्योर्तीलिंग उत्पती !




Like
Like Love Haha Wow Sad Angry

lord shiva a complete man

महादेव हे सर्व जीवांचे बीज आहेत. त्यांनाच पुराणपुरुष परमेश्वर म्हणतात. हे सर्व जग म्हणजे त्यांच खेळण आहे. बिजवान महादेव आहेत.  बीज म्हणजे ब्रम्हा व योनी विष्णू होत. एकवेळ ब्रम्हा व विष्णू यांच्यात वादविवाद होतो कि परमेश्वर कोण आहे? दोघे स्वत:ला ईश्वर सिद्ध करण्यात लागले असता त्यांचा कलह वाढला तितक्यात त्यांच्या मध्ये एक अति प्रकाशमान तेजपुंज ज्योर्तीलिंग उत्पन्न झाले. त्याला त्यांनी आपल्या कलहाच्या प्रादुर्भावाचे साधन समजून हा निश्चय केला कि जो कोणी याच्या अंतिम भागास स्पर्श करील तोच परमेश्वर, लिंग दोन्ही बाजूने होता. (वरून व खालून) तेव्हा ब्रम्हाने हंस बनून अग्रभाग शोधण्यास निघाले आणि विष्णू अती विशाल वराह रूप बदलून लिंगाचे खालील भागास स्पर्श करण्यास निघाले. हजारो वर्षपर्यंत ते चालत राहिले परंतु त्यांना लिंगाचे अंतिम भागाचा शोध लागला नाही तेव्हा ते अति व्याकुळ व हताश होऊन प्रथम स्थानावर वापस आले. आणि त्या लिंगाकडे पुन्हा पुन्हा बघून विचार करायला लागले की हे परमेश्वराचे कोणते मायारूप आहे की त्याला अंत नाही. अनंत आहे. विचार करीत असता त्यातून लुप्त स्वरांत ‘ओम’ ‘ओम’ ध्वनी कानावर आला. आणि बघतात तर लिंगाच्या दक्षिण भागास प्रत्यक्ष साक्षात ओंकारस्वरूप शिव प्रगट झाले, तेव्हा दोन्ही देवांनी भगवान शिवाची स्तुती आरंभ केली तेव्हा शिवप्रभू त्यांच्या वर प्रसन्न झाले व म्हणाले मी तुमच्यावर प्रसंन्न आहे तुम्हाला अभय देत आहे. तुम्ही दोघे ही माझेच अंश आहात माझ्या दक्षिण अंगातून सृष्टी उत्पन्न करनेवाले ब्रम्हा व पालनहार विष्णू उत्तर भागाच्या अंगातून उत्पन्न झाले आहेत. तुम्ही मला वर मागा ! तेव्हा ब्रम्हा आणि विष्णू दोघांनी वर मागितला कि आमचे मन सदोदित तुमच्या भक्तीत एकरूप राहू द्यात आणि शिव प्रभुणे त्यांना अखंडभक्ती प्रदान केली.

Lord Shiva, she will perform the task of destroying evil and will be your consort. Aum Shakti is used to describe the name of the goddess. When The Supreme God wishes to create the universe He transforms Himself into two forms – Shiva and Divine Energy (Shakti). lord shiv is the symbol of energy. all evil get destroyed with shiv power.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा