शिव आणि मंत्र !
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

परमपुरुष शिव आणि शक्ती यांचे सम्मेलन म्हणजेच शिवाचे तांडव-नृत्य या तांडव नृत्याने (शिव-शक्ती हे एकचरूप होय) जे स्पंदन उत्पन्न झाले, तेच उत्पत्तीचे कारण ठरले. रसायन -विज्ञांन सिद्धांत आहे की इलेक्ट्रोन (electrons) जो परुषासमान आधेय (position) आहे. त्यात प्रोटोंन (protons) जे प्रकृती समान आधेय (negation) होय, यांचे संघर्ष होऊन जे स्पंदन उत्पन्न होते. त्याद्वारे अणुची उत्पत्ती होते आणि त्याच अणुचा आकार बनतो. त्याचप्रमाणे जेव्हा सदाशिव आनन्दोन्मत्त होतो अर्थात मां जगदम्बात युक्त होऊन महानृत्य करतात (नटराज अवतार) त्या आवतारांच्या परिणामातून सृष्टीत कितीतरी पदार्थांची उत्पत्ती होत असते. हे सर्व सदाशिव नृत्य आणि नाद यांचा परिणाम होय. कारण नृत्यात ते जे डमरू नाद करतात त्याचेच स्पंदन होऊन शब्द तयार होतात. व्याकरणातील मुख्य शब्दाची उत्पत्ती त्यातूनच झालेली आहें. (जे प्रकृती आणि पुरुष सम्मेलनातून नाद रुपात प्रगट होतात.) या शब्दांचे चार प्रकारे विभागून अंतिम ‘वैखरी’ (वाणी) व्यक्तरूप प्राप्त झाले. त्यालाच आपण शब्दरूपी भाषा म्हणतो. वर्णमालेत प्रत्येक अक्षरात शक्ती(शारदारूप )समावलेली आहे. शक्तीकारण अभ्यंतरीक षचक्रांत प्रत्येक अक्षरांचेनिवासस्थान आहें. आणि शिव -शक्तीच्या नादाचे स्थान स्वर्गात सर्वात उंच आहे.  हीच ‘परा’ संज्ञां आहे या ‘परा’ ला स्वर्गलोकांत ऋषिगण मंत्ररूपांत उल्लेखतात. याला तेथे ‘पश्यन्ति’ म्हणतात ह्याला अध्यात्मिक स्वरूप प्राप्त आहें. नंतर हेच वैखरी रुपात प्रगट होतात. यांपासून समस्त ‘मंत्र’ वाक्य यांची उत्पत्ती झाली. म्हणून शिव-शक्तीला मंत्र शास्त्राचे प्रवर्तक म्हटल्या जाते. शिव पूजेत शेवट जे ‘बम् बम् ‘ शब्दांचे उच्चारण करतात तो प्रणव सुलभरूप आणि अत्यंत प्रभावशाली मानलेला आहें.

त्यांचा मनुष्यरूप श्रीमहादेव पिंडांण्ड सर्वोत्कृष्ट उदाहरण होय अर्थात मनुष्य अध्यात्मिक जीवनात उत्कृष्ट उन्नती केल्यास श्रीमहादेव त्याचे आदर्शस्वरूप आहें त्यांची भक्ती करून भक्ती मार्गात अग्रेसर होतो. श्रीशिव जगद्गुरू आहेतं. कारण यज्ञ,तपस्या,योग,भक्ती,ज्ञांन यांची पराकाष्ठा प्राप्त होते. त्यांचा तिसरा डोळा म्हणजे दिव्य ज्ञानचक्षु आहें. आणि तो प्रत्येक मनुष्यात आहें परंतु ज्यावर श्रीजगतगुरू शिवाच्या कृपाप्रसादानेच खुलतो. गायत्रीशक्ती हेच आदर्श शिवाकडून घेऊन आणि आपल्या सृष्टी कार्याचे लक्ष बनून साधकास प्रवृत्त करीत असते.

shiv ani matra

Shiva separated his Shakti (power) from himself and started the creation. Shiva and Shakti created Vishnu to manage the universe. The Supreme God wishes to create the universe He transforms Himself into two forms – Shiva and Divine Energy (Shakti).

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu