भारताचे पोलादी पुरुष
सरदार वल्लभभाई पटेल
जन्म :३१ ऑक्टोंबर १८७५ करमसद (गुजरात)
मृत्य :१५ डिसेंबर १९५०
नाव :वल्लभभाई झवेरभाई पटेलभारताचे पोलादी पुरुष म्हणून त्यांची ख्याती अजरामर आहे असे थोर महात्मे “सरदार वल्लभभाई पटेल” यांना भारतीय नागरिक कधीही विसरणार नाही. सरदारांचा कणखरपणा, धीटपणा हा त्यांचा वर्तनातूनच दिसून येत होता. एकदा त्यांच्या काखेत आलेल्या गळूस चटका देणाऱ्यास तप्त लाल सळीने चटका देताना वाईट वाटले होते.अशा प्रसंगी वल्लभभाईनि स्वतः ती सळी घेऊन चटका दिला.
अशाच धिटाइतून ते पुढे शिक्षणात सुधा चमकले. त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले होते. ख्यातनाम वकील म्हणून त्यांनी खूप नाव कमावले.
महात्मा गांधीच्या प्रभावामुळे सरदार वल्लभभाई पटेल देशसेवेत रमू लागले. गुजरातमध्ये आलेल्या पुराच्या प्रसंगी त्यांनी लोकांना धीर दिला. पुढे नागपूरला सरकारच्या अवाजवी कामाविरुद्ध आवाज उठवला. बर्डोलीच्या सत्याग्रहाच्या वेळी शेतकर्यांवर बसवलेला जाचक शेतसारा त्यांनी शेतकऱ्यांच्या सहकार्यातून मागे घेतला. त्यांना लोकांनी “सरदार” हि पदवी बहाल केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर ते भारताचे गृहमंत्री झाले. संस्थान मंत्री म्हणून उत्कृष्ट प्रकारचे त्यांनी काम केले. संस्थानांच्या विलिनीकरणाकरीता त्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग केले. या पोलादी पुरुषाने १५ डिसेंबर १९५० रोजी मुंबई इथे जगाचा निरोप घेतला.Great son of India Sardar vallabhbhai patel .