निर्माता-दिग्दर्शक समीर कर्णिकला अटक
Like
Like Love Haha Wow Sad Angry

samir karnik arrested

अभिनेता सनी देओलवरही गुन्हा दाखल : सेवाकर बुडवेगिरीप्रकरणी पहिलीच अटक

मुंबई : यमला पगला दिवानाचे निर्माते व दिग्दर्शक समीर कर्णिक यांना शुक्रवारी या चित्रपटाच्या कॉपी राइटच्या विक्रीद्वारे मिळालेल्या उत्पन्नावरील १ कोटी १८ लाख रुपयांचा सेवाकर चुकविल्याप्रकरणी अटक करण्यात आली; तर अभिनेता सनी देओल यांच्याविरोधातही याच प्रकरणी सेवाकर विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. कर्णिक यांना दुपारी महानगर दंडाधिकार्‍यांपुढे हजर करण्यात आले असता २ लाख रुपयांच्या जामिनावर न्यायालयाने त्यांची सुटका केली.
सेवाकर विभागाच्या युनिट २चे उपायुक्त समीर वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, सेवाकर बुडविणार्‍या लोकांना अटक करण्याचे अधिकार विभागाला मिळाल्यानंतर मुंबईत झालेली ही पहिलीच कारवाई आहे. ‘यमला पगला दिवाना’ चित्रपटाच्या काही हक्कांची विक्री त्यांनी एका कंपनीला केली होती. त्यांना मिळालेल्या उत्पन्नात त्यांनी सेवाकराची रक्कमही संबंधित कंपनीकडून घेतली होती. मात्र, या रकमेचा भरणा त्यांनी सेवाकर विभागाकडे केला नव्हता. या माहितीच्या आधारे २१ ऑगस्ट रोजी विभागाने त्यांच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली होती व कागदपत्रांची पडताळणी केली. त्या आधारे सेवाकर बुडवेगिरीचे प्रकरण उजेडात आले.

– यमला पगला दिवानाच्या कॉपी राईटची विक्री कर्णिक यांनी १८ फेब्रुवारी २0१३ रोजी केल्याचे या संदर्भात झालेल्या व्यवहारांच्या इनव्हॉईसवरून आढळले. या प्रकरणी एकूण १.१८ कोटींचा सेवाकर चुकविल्याचे आढळले.  याच प्रकरणात अभिनेता सनी देओलनेही १.९५ कोटींचा सेवाकर बुडविल्याचे आढळून आले आहे. या संदर्भात सनीचा जवाब नोंदविला आहे. या प्रकरणी सनीवरही गुन्हा दाखल करण्यात आला. मुदतीत भरणा न केल्यास सनीलाही अटक होऊ शकते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu