देशांतर्गत घडामोडीच रुपयाच्या घसरणीला कारणीभूत असल्याची कबुली :
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण अजूनही चालूच आहे. ती थांबायचे नावच घेत नाही. आज रुपया डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात खालच्या स्तरावर ६६.२४ या नवीन उच्चांकावर येउन स्तीरावला आहे. रुपयाच्या ढासळत्या मुल्ल्याला देशांतर्गत घडामोडी जबाबदार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी म्हटले आहे. डॉलर च्या तुलनेत रुपयाचे होणारे अवमूल्यन हे असहाय्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रुपयाचा सध्याचा प्रवास खूपच खालावत गेला असला तरी लवकरच चलन स्तिर पातळीवर विसावेल असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला आहे. आपण ठाम आणि शांत राहायला हवे, सरकारदेखील गुंतवणूकदारांचा विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी पर्यंत करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दिवसभरातील भांडवली बाजार आणि परकीय चलन व्यवहारात रुपयाच्या नव्या विक्रमी घसरणीच्या पार्शवभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री राज्यसभेत विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना सर्वच विकसित अर्थव्यवस्था सध्या मोठ्या आव्हानांना तोंड देत असल्याचे म्हटले आहे.
म्हणून त्याचा विपरीत परिणाम हा भांडवली बाजार तसेच चलन व्यवहारावर झाला आहे, असे त्यांनी नमूद केले. २००८ प्रमाणे दिलेला आर्थिक सहकार्याचा हात विकास आणत असला तरी वित्तीय व चालू खात्यातील टूट वाढवत आहे, असेही त्यांनी या वेळी नमूद केले आहे. या वर्षी मे पासून सर्वच सर्वच आशियाई चलन घसरत आहे, असे स्पष्ट करून अर्थमंत्री म्हणाले कि सरकारने मंजुरी दिलेल्या १.८३ लाख कोटी रुपयांचा २७ विविध प्रकल्पामुळे गुंतवणूक सदृश्य वातावरण पुन्हा एकदा निर्माण झाले आहे .