पाव भाजी पुलाव




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Paw Bhaji Pulao :

for home cooks, this recipe can be made in a frying pan or even in a kadai this tawa pulao recipe is a quick to make if you have leftover rice. you will need pav bhaji masala to make this pulao. If you like schezwan fried rice then you will love this Paw Bhaji pulao.

pawbhaji pulaw

साहित्य -: दोन वाट्या बासमती तांदुळ, लिंबाचा रस, एक चमचा जिरे, साजूक तूप,फुलकोबीचे तुरे, एक गाजर, सिमला मिरची, तीन बटाटे, एकचमचा आलेलसून पेष्ट, दोन कांदे, टोमाटो ज्युरी, बारीक चिरलेली कोथिंबिर, बटर (लोणी ) पाव भाजी मसाला, हळद , चवी पुरते मीठ.

कृती -: तांदूळ दोन पाण्याने धुवून थोडा वेळ निथळत ठेवा. तुप गरम करून जिरे ची फोड्णी करून त्यात तांदूळ परता नंतर त्यात किंचीत मीठ, गरम पाणी व लिंबाचा रस घालून मोकळा भात शिजवून घ्या. सर्व भाज्या बारीक चिरून धुवून घ्या, भांड्यात तेल घालून गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा व आलेलसून पेष्ट व हळद घाला व त्याला गुलाबी होईस्तोवर परता नंतर तोमातो प्युरी( किंवा बारीक चिरलेला टोमाटो चालेल ) घालून कडेला तेल सुटे पर्यंत परता,बटाटे उकडून त्यांच्या फोडी करून घ्या, त्याघाला व सर्व भाज्यांचे तुकडे  करून घाला थोडी हळद व चवीपुरते मीठ घालून शिजू द्या. त्यावर पाव भाजी मसाला घाला व भाज्या शिजून घेतल्या कि त्यात मोकळा भात थोडा थोडा करून घाला व परता व थोडा लिंबाचा रस घालून परतत रहा सर्व भात मिक्स करून घ्या व मंदाग्निवर दोन मिनिटे भांडे झाकून ठेवा वाफ येऊ द्या,वाढताना पुलाव वर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर व थोडे बटर घालून द्या.

Paw Bhaji Pulao Marathi Recipes Tips.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu