मुंबईत महिला छायाचित्रकारावर सामूहिक बलात्कार




Like
Like Love Haha Wow Sad Angry

मुंबईत महिला छायाचित्रकारावर सामूहिक बलात्कार

लोअर परळमधील धक्कादायक घटना
एका इंग्रजी नियतकालिकात प्रशिक्षणार्थी छायाचित्रकार म्हणून काम करणाऱ्या तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक    बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी लोअर परळ येथील शक्ती मिल कंपाऊंड भागात घडली. एकटय़ाने प्रवास करणाऱ्या महिलांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटना ताज्या असतानाच भर सायंकाळी घडलेल्या या घटनेने मुंबई महिलांसाठी असुरक्षित असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

ही तरुणी सायंकाळी सहाच्या सुमारास वार्ताकनासाठी लोअर परळ येथील शक्ती मिल कंपाऊंड येथे गेली असताना चार नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला व पळून गेले. त्यानंतर या तरुणीला जखमी अवस्थेत जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री नऊच्या सुमारास रुग्णालयातून दूरध्वनी आल्यानंतर मुंबई पोलिसांना ही घटना समजली. यानंतर उपायुक्त विनायक देशमुख, मुंबई पोलिसांचे प्रवक्ते सत्यनारायण चौधरी हे ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात दाखल झाले. तसेच पोलिसांचे पथक युवतीचा जबाब घेण्यासाठी रुग्णालयात रवाना झाले. पीडित तरुणीचा जबाब घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
लोकलमधून प्रवास करणाऱ्या अमेरिकन युवतीवर तरुणाने ब्लेडहल्ला करण्याची घटना नुकतीच घडली होती. त्यातच गुरुवारच्या घटनेने मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

 

स्त्रोत: http://www.loksatta.com/

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu