मुंबई गँगरेप : फोटो जर्नलिस्ट तरुणीवर झालेल्या पाशवी बलात्काराची आपबिती

Like Like Love Haha Wow Sad Angry फोटो जर्नलिस्ट तरुणीला  बीअरच्या फुटलेल्या बाटलीचा धाक दाखवून त्या सहा बलात्कारी युवकांनी तिच्यावर...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

mumbai rape

फोटो जर्नलिस्ट तरुणीला  बीअरच्या फुटलेल्या बाटलीचा धाक दाखवून त्या सहा बलात्कारी युवकांनी तिच्यावर बलात्कार केला होता, अशी धक्कादायक माहिती त्या तरणीने दिलेल्या पोलिस बायानातून समोर आली आहे, हा प्रकार घडण्याआधी तिला तिच्या आईचा फोन आला होता, पण तिला धमकावल्यामुळे त्या मुलीला आपण ठिक आहोत असचं सांगावं लागलं. अतिशय क्रूरपणे त्या ब्लात्कार्यानी तरुणींच्या शरीराचे लटके तोडल्याचं माहितीतून समोर आल आहे.

त्या दिवशी नेमक काय घडल ….

माणुसकीला काळीमा फासणारा शक्ती मील कम्पाऊंडमध्ये करण्यात आलेला सामूहिक बलात्कार हा … पीडित तरुणीने दिलेल्या बायानातून त्या वासनांधयुवकांचा कृर चेहरा समोर आलाय. या घटनेच्या वेळी तरुणीला तीच्या आईचा फ़ोन आला होता. पण, त्या बलात्कारी युवकांनी बीअरच्या फुटलेल्या बाटलीचा धाक दाखवून व तिला आणि तिच्या सहकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली.  मुलीच्या आईने दोनदा मोबाइलवर संपर्क साधून सर्व काही ठीक आहे ना अशी विचारपूस केली होती. पण त्या बलात्कारी गुंडांच्या धाकापुढे त्या तरुणीचा नाईलाज झाला. आणि त्यांनी सांगितल्या प्रमाणेच आईला सारे ठिक असल्याचं सांगावं लागलं आणि त्यानंतर त्या बलात्कारी गुंडांनी त्या तरुणीवर पाशवी बलात्कार केला.

पीडित फ़ोटो जर्नालिस्ट तरुणींने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिनं डिप्लोमा इन कम्युनिकेशन कोर्स केला आहे, ती मे महिन्यात एका इंग्रजी मासिकात इंन्टर्न फोटोग्राफर म्हणून कामाला लागली होती. गुरुवारी दुपारी साधारण एक वाजता ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर पाच वाजेपर्यंत तीनं काम केलं आणि नंतर ऑफिसने दिलेली बातमी करण्यासाठी ती तिच्या सहका-याबरोबर शक्ती मिल कपाउंडमधील पडक्या इमारतींची छायाचित्रे काढण्यासाठी महालक्ष्मी स्थानकाच्या जवळ  असलेल्या गिरणीत गेली. त्यावेळी या गिरणीतून दोन तरून बाहेर जात होते त्यांनाच तिने आत जायच्या रस्त्याबाबत  विचारले होते व त्यांनी आत जाण्याचा मार्ग सांगितला. पण त्या वेळी त्या तरुणीला काय माहित की आपण आपल्याच हातानी आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे ते. हे तेच दोन तरुण होते ज्यांनी या तरुणीवर अमानुष अत्याचार केला. पुढे कम्पाऊंडमधून आत गेल्यावर तरुणीने तिच्या मोबाईलवरून तर तिच्या सहका-याने त्याच्याकडील कॅमेऱ्यातून इमारतींची विविध छायाचित्रे काढण्यास सुरूवात केली. छायाचित्रे काढून झाल्यावर बाजूलाच रस्ता दिसत असल्यामुळे दोघेही तिथूनच बाहेर जाणार, तोच ते तरून पुन्हा तेथे आले. त्यावेळी त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीने हिंदीत सांगितले, ‘हमारे शेठने आपको देखा है, और आपको शेठके पास आना पडेगा.’ त्यावर त्या धाडसी तरुणीने ‘मै तुम्हारे शेठसे बात करती हूँ’ असं सांगितलं. तेव्हा त्यांनी फोनवरुन बातचीत करण्यास नकार दिला. आणि जबारदस्तीने त्या दोघांना शेठकडे घेऊन जाऊ लागले. तितक्यात त्या तरुणींने आपल्या ऑफिसमध्ये संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैव म्हणून की काय ऑफिसचा फ़ोन लागलाच नाही. तोपर्यंत ते सर्व मिलच्या पडक्या भागात आले होते. अचानक त्या फोटो जर्नलिस्ट तरुणीला तिच्या ऑफिसमधील फोटोग्राफर प्रमुखाचा फोन आला, त्या तरुणीने घडत असलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. त्या ताबडतोब तिथून बाहेर पडा असं त्या दोघांना सांगितलं. पण, त्या पा़च नराधमांना जे करायचा होतं त्यांनी ते केलच. त्या तरुणीला आणि तिच्या बरोबर असलेल्या तिच्या सहकारीला आरोपींपैकी तिसऱ्या व्यक्तीने ‘काही दिवसांपूर्वी येथे मर्डर झाला होता आणि तो तूच केला’, असे सांगत आणखी दोन साथीदारांना दूरध्वनी करून बोलावून घेतले. त्यावर त्या तरुणींने आणि तिच्या सहकारीने त्यांना सोडण्यासाठी झटापट करू लागले. पण त्या नराधमांनी त्या दोघांचे काहीच ऐकलं नाही. आणि तरुणीच्या साथीदाराला मारहाण करून पट्टयाने आणि दोरीने बांधून ठेवले. त्यावर त्या दोघांनीही या दोघांकडचा मोबाइल व कॅमेरा ३० हजारपेक्षा जास्त रकमेचा आहे, तो ठेवा आणि आम्हाला सोडा अशी विनंती त्या नराधमांना केली. पण त्याचा काही एक परीणाम त्या पाच नराधमांवर झाला नाही.

त्यानंतर त्या पाच नराधमांपैकी एक मिशीवाला आणि रस्ता दाखवणाऱ्यांबरोबर नंतर आलेला एक अशा दोघा आरोपींनी त्या तरुणीला एका बाजूला नेले. त्याच वेळीस तरुणीच्या आईचा फोन आला. जणू आपल्या मुलीवर काही तरी संकंट ओढावलय अशी चाहूल त्या आईला लागली असावी, ‘तु कुठे आहेस, ठिक आहेसना, घरी कधी येणार’ असं त्या तरुणीच्या आइने त्या तरुणीला विचारलं. पण त्या नराधमांनी बाजूलाच पडलेल्या बिअरच्या फुटक्या बाटलीचा धाक दाखवून तिला आईला सर्व काही नीट असल्याचे सांग नाही तर दोघांना मारुन टाकू अशी भीता दाखवून आईशी खोट बोलण्यास त्या तरुणीला भाग पाडलं. पण, तिच्या आईचा पुन्हा फोन आला, जणू तिला कळून चुकलं होतं की, तीच्या मुलीवर भयंकर संकट ओढावलय. पण त्या नराधमांनी तिला फोन उचलूच दिला नाही आणि फोन तिच्याकडून हीसकावून घेतला आणि बंद करुन टाकला. आणि आरोपींनी तरुणीला धमकावले आणि तिच्यावर पाशवी बलात्कार केला. वासंनांध राक्षसांनी घटनास्थळावरुन पळ काढला.अखेर, थोडया वेळाने पीडित तरुणीने आपल्या सहकाऱ्याच्या मदतीनं टॅक्सी करून जसलोक हॉस्पिटल गाठले. हॉस्पीटलमध्ये जाताना वाटेत तीनं आपल्या आईला आपल्यावर बेतलेल्या त्या प्रसंगाची माहिती फोनवरुन सांगितली. आणि तेव्हा त्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं समोर आलं.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories