मुंबई गँगरेपा मधील सर्वच आरोपींना अटक झालेली आहे . शेवटच्या आरोपीला दिल्ली येथे अटक करण्यात आली . पाचव्या आरोपीचे नाव सलीम अन्सारी असून त्याने दिल्लीला पळ काढला होता. मुंबई क्राइम ब्रॅंचच्या पोलिसांना काल दिल्लीत अटक केली. बलात्काराच्या घटनेनंतर आपल्या साथीदारांना अटक झाल्याचं माहिती होताच सलीम दिल्लीला पळून गेला होता . काल त्याला अटक झाली . आता सर्वच आरोपींना ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय आणि त्यांना कोर्टा समोर उभे केले जाणार आहे . कासिम बंगाली हा नराधम सर्व आरोपींमध्ये वयानं मोठा आहे आणि त्यानं तरुणीवर दोनदा बलात्कार केल्याचं कळतंय.