‘मिक्ता’ 2013 नाटय – चित्रपट महोत्सव पुण्यात

Like Like Love Haha Wow Sad Angry मराठी चित्रपट व नाटयसृष्टीला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणारा मानाचा सोहळा म्हणजे म्हैसकर ‘मिक्ता’...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Now-MICTA-Marathi-Natya-Chitrapat-Mahottsav-in-Pune-1121212

मराठी चित्रपट व नाटयसृष्टीला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणारा मानाचा सोहळा म्हणजे म्हैसकर ‘मिक्ता’ पुरस्कार सोहळा (“MICTA” Marathi Natya – Chitrapat Mahottsav). दरवर्षा परदेशात आयोजित होणा-या या पुरस्कार सोहळ्याचे हे चौथे वर्ष आहे. ‘महाराष्ट्र कलानिधी’ (Maharashtra Kalanidhi) प्रस्तुत म्हैसकर ‘मिक्ता’ म्हणजेच ‘मराठी इंटरननॅशनल सिनेमा अँड थिएटर अवार्डस्’ (Marathi International Cinema and Theaters Awards)सोहळ्याचे आयोजन यंदाही अभिनेता – दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या संकल्पनेतून होत आहे.

दरवर्षाप्रमाणे परदेशातील मुख्य सोहळ्याआधी ‘मिक्ता’ नाटक आणि चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यंदा प्रथमच हा महोत्सव पुण्यात आयोजित होत आहे. 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान आयोजित होणा-या महोत्सवासाठी प्राथमिक फेरीत निवडण्यात आलेल्या 10 नाटकांची आणि 10 चित्रपटांची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली आहेत. पुण्यातील कोथरड येथील यशवंतराव चव्हाण नाटयगृहात ‘मिक्ता’ नाटय महोत्सव रंगणार असून ‘मिक्ता’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन सिटी प्राईड कोथरड येथे करण्यात आले आहे.

‘म्हैसकर फाऊंडेशन’ आणि ‘महाराष्ट्र कलानिधी’ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त प्रेक्षकांनी सहभागी होऊन त्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

निवडण्यात आलेल्या 10 चित्रपटांची नावे-

  • दुनियादारी (Duniyadaree)
  • टाइम प्लीज (Time Please)
  • आजचा दिवस माझा (Aajcha Divas Majha)
  • 72 मैल एक प्रवास (72 Miles – Ek Pravas)
  • बालक पालक ( Balaak Palaak)
  • प्रेमाची गोष्ट (Premachi Goshta (PG))
  • इन्व्हेस्टमेण्ट (Investment)
  • अनुमती (Anumaati)
  • आयना का बायना (Aayna Ka Bayna)
  • धग (Dhagg)

निवडण्यात आलेल्या 10 नाटकांची नावे –

  • प्रपोजल (Proposal)
  • गेट वेल सून (Get wel S00n)
  • ठष्ट (Thashta)
  • डू अँडमी (Dru Admi)
  • एकदा पहावं न करन (Ekada pahaw n krn)
  • फॅमिली ड्रामा (Family Drama)
  • सुखान्त (Sukhant)
  • ड्राय डे (Dry day)
  • उणे पुरे शहर एक (Une Pune Shahar)
  • ती गेली तेव्हा (Ti Geli Tenwha)
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories