लाला राधाकिशन लजपतराय




Like
Like Love Haha Wow Sad Angry
423232

लाला राधाकिशन लजपतराय

भारतीय स्वातंत्र्याचा उद्गाता
लाला लजपतराय
जन्म : २८ जानेवारी १८६५ जगरण (लुधियाना-पंजाब)
मृत्यू  : १७ नोवेंबर १९२८
नाव   : लाला राधाकिशन लजपतराय

लाला लजपतराय हे पंजाबचे एक श्रेष्ठ देशप्रेमी नेते होते. त्यांचा क्रांतिकारक चळवळीशी संबंध असल्याच्या संशयावरून इंग्रज सरकारने त्यांना अटक करून तुरुंगात ठेवले. पुढे लालाजी व सरदार अजितसिंग यांना ९ मे १९०७ ला सीमापार केले. नंतर त्यांची सुटका केली. लालाजीनी आर्य समाजाची फार मोठी सेवा केली. पंजाबच्या सार्वजनिक चळवळीचे नेतृत्व त्यांच्या कडे होते.१९२८ साली सायमन कमिशनला विरोध दर्शविण्याकरिता देशभर चळवळ सुरु होती. पंजाबमध्ये सायमन कमिशनला विरोध करणारी चळवळ दडपून टाकण्याचा सरकारच प्रयन्त होता. लाहोर येथे ३० ऑक्टोंबर १९२८ रोजी सायमन कमिशनला विरोध दर्शवण्यासाठी लालाजींच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला. लालाजी आघाडीवर होते, रेल्वेस्टेशन कडे मोर्चा जात असताना काटेरी तारेच्या कुंपणामुळे सार्वजन तिथे थांबले होते. मिरवणुकीचा जमाव फार मोठा होता तरीही त्यांनी कमालीची शांतता राखली होती. तरीही जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठी हल्ला सुरु केला. लालाजींनाही फार मार बसला होता. त्यांच्या छातीवर लाठ्यांचा फार मार बसल्याने छातीलाही फार इजा झाली . लालाजींच्या छातीवर झालेल्या इजेमुळे १७ नोवेंबर १९२८ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. व स्वातंत्र्याच्या चळवळीत लालाजी हुतात्मा होऊन अमर झाले.

About Lala Lajpat Rai and Essay of Lajpat Rai was born in Dhudike (now in Moga district, Punjab) on 28 January 1865. (The word ‘Lala’ is an honorific, applied to prominent Hindu men of the time.)

Like
Like Love Haha Wow Sad Angry
423232




, , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा