मी ईश्वराच्या शरण मध्ये आहें, आता मला काहीही कमी नाही, मी तृप्त आहें, मी संतुष्ट आहें, मी अकाम आहें, मी आपत्काम आहें. कारण ईश्वराने मला आपलं मानलेलं आहे. आता माझ्या मनात भोग-मोक्ष कोणतीही ईच्छा उरलेली नाही. माझी दृढ धारणा आहें की ईश्वराने मला आपलें मानले तेव्हा मला काहीच चिंता नाही.ईश्वर माझ्या साठी जेही विधान करीत आहें माझ्या कल्याणार्थ करीत आहें; कारण एक ईश्वरच माझे आहें,ईश्वरा शिवाय माझे हितचिंतक, परमसुहृदय कोणीच नाही. माझ्यासाठी परमपिता, स्नेहमयीमाता प्रिय सखा, परमप्रिय स्वामी, परमगुरु, परमात्मा हे सर्व रूप ईश्वरच आहें.
निश्चय करीत आहे; की भगवान वासुदेव हे विश्वरूप होत आहे; प्रत्येक पदार्थ त्यांचेच स्वरूप आहें. मी सुद्धा वेगळे रूप नसून त्यांचेच अंशरूप आहें ; मी शरीर नाही; मला अग्नी जाळू शकत नाही; हवा सुकवू शकत नाही; पाणी भिजवू शकत नाही;शस्त्र कापू शकत नाही;मृत्यू मारू शकत नाही; मी नित्य आहें,सर्वगत आहें, घन आहें, अचल आहें, अमर आहें, सनातन आहें, अटळ आहें. असे सर्व मानवजाती ने निश्चित करावें, सर्व ईश्वर मय आहें, पाप -ताप यांतून सुटका करा, निर्भय आणि अति शक्तिशाली बना ; जीवन सफल आणि कृतकृत करा.
वास्तविकता ही आहे की तुम्ही शरीर नाही; तुम्ही मरनेवाली वस्तू नाही; तुम्ही चेतन आहें, आनंदमय आहें ;ईश्वराचे अभिन्न अंश आहें; तुम्ही ज्याला दु:ख समजत आहांत ती भूल आहें, लक्षात घ्या की त्याहीपेक्षा जास्त दु:ख तुमच्या जीवना येऊ नये त्यासाठीच भगवान काही विधान करीत असतो; ते आपल्या लक्षात येत नाही. (त्याला सौम्य स्पीड ब्रेक म्हटल्या जाते) ईश्वराला आपल्या हृदयात जागवा हृद्य निर्मळ आणि तेजोमय बनवा.जसे सूर्याच्या तेजा समोर अंधकार टिकत नाही. त्याच प्रमाणे निर्मळ हृदयात दु:खाला घर मिळत नाही. अशा हृदयात विषय- पाप जागू शकत नाही. (पापी आणि विषय भोगी या हृदयात ईश्वरस्थान राहू शकत नाही). ऐश्वर्य, सौंदर्य, माधुर्य, ज्ञान, वैराग्य, यश, शक्ती, भक्ती हे सर्व गुण ईश्वरांत अपार आहेंत त्याला आपल्या सुहृद्यात बसवा, जेव्हा मनुष्याच्या मनातून भोग ईच्छा सर्वथा नष्ट होतात. भोग नष्ट झाले कि तेथे पापांना स्थान नसते. जो मनुष्य ईश्वराचे आश्रय घेतो त्याला सर्व कार्यात सिद्धी प्राप्त होते. इहलोकी आणि परलोकी दोन्ही ठिकाणी उन्नती प्राप्त होते. तेव्हा ईश्वराला प्राप्त करून संतोष, शांती, तृप्ती, ज्ञान, वैराग्य, सदाचार प्राप्त करून घ्या. ईश्वराच्या आश्रयाने मनुष्य विश्व बंधुत्व आणि विश्वसेवक बनू शकतो.
Article based on Peace in life. how to bring peace in your life.