जीवनाचे दोन वरदान — जन्म, मृत्यू
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Life and Death are the two important stages of life. we can not just go away without this two stages. people are always fear about the death. death is the last stage of life. we can not run away from this. In bhagwat geeta geeta it is written that we can not stay away from Death…

life and death are two crucial stages

परमेश्वराप्रती संपूर्ण अनुराग म्हणजे भक्ती होय. ती आपल्याच सुखासाठी आवश्यक आहे. जन लोकांत दिखावा म्हणून भाव म्हणजे  भक्ती नव्हे. ही कृत्रिमता होय. भक्तीसाठी कर्तव्यपालन आणि अनुशासन पहिली आवश्यकता होय. वासनामयी, लोभी, क्रोधीत व्यक्ती भक्तीवान होऊच शकत नाही. अती संसारिक लगाव माणसाला भक्ती पासून दूर ठेवतो. अनन्य भक्तच प्रभूभक्ती प्राप्त करू शकतो.

मनुष्य जन्म क्षणभंगुर आहे. जन्म-मृत्यू श्वास घेणे आणि सोडणे याच प्रमाणे आहें. हे आपल्या हक्कात नाही. हे जीवन म्हणजे शरीररूपी पिंजर्यातील बंद जीव ( जसे पिंजर्यातील फ़डफडनारा पोपट) या शिवाय काहीच नाही. जीवन एक यात्रा त्याचा शेवट म्हणजे मृत्यू. मृत्यू म्हणजे अनेकांत ऎक. हा ऎक म्हणजे अनेक होय. प्रभूभक्ती करता करता जो शरीर त्यागतो तो भक्त प्रभुत ऎकाकार होतो. तो मृतात्मा ब्रम्हलीन आत्मा होय.या जीवन यात्रेला पूर्णता म्हणतात. मृत्यू हे शोक कारण नव्हे.

मृत्युला जीवनाच्या हिशोबाचा महत्वाचा असा मंगलमय पवित्रदिवस मानला पाहिजे.जीव हा परमात्माचा बिंदू होय हा बिंदू त्या परमात्म्यात लीन होणे म्हणजे शोक कसला ?
*  “मृत्यू म्हणजे प्रभूचे आमंत्रण होय.” जेव्हा तो येतो तेव्हा हर्ष मनाने त्याचे स्वागत करायला हवे.
* ऋषी-मुनी म्हणतात की मृत्यू हि आपल्या सोबतच चालत,उठत,बसत असते ती सदैव आपल्या सोबतच असते, ती सोबतच वापस जातं असते. मृत्यू ऎक अशी सरिता आहें. ज्यात श्रमाने जीव न्हाउन कायारूपी वस्त्र बदलवून नवीन वस्त्र धारण करणे. जीवात्मा जुने शरीर त्यागून नवीन शरीर प्राप्त करतो.  मनुष्य मृत्यू वर विजय प्राप्त करू शकत नाही. परंतु मृत्यू भयातून मुक्त होवून त्याला मंगलकारी अवश्य बनवू शकतो. मृत्यू काय आहें ?  पंचतत्वांतून निर्मित शरीर होणे व पंचतत्वात विलीन होणे. आत्मा अजर-अमर अविनाशी आहें. त्याला न शस्त्र कापू शकत, न अग्नी जाळू शकत, न पाणी भिजवू शकत, न वायू सुकवू शकत. देह नष्ट होतो परंतु आत्मा नष्ट होवू शकत नाही.

दु:खाचे प्रकार अनेक आहेंत, पण ममतामयी दु:खात तर आपण आपल्या स्वार्थासाठीच रडत असतो. जाण्याऱ्या व्यक्ती नंतर आपले कसे होणार, आपली देखभाल कोण करणार, याच स्वारथी भावनेतून रडत, बिखरत राहतो. पण हे सुद्धा विसरतो की ज्याने आपल्याला या पृथ्वीवर पाठविले तो सतत आपल्या पाठीशी आहें. तो ईश्वर आपला साथ एका क्षणाला सुद्धा सोडत नसतो त निरंतर आपली रक्षा करीत असतो. जशी माता आपल्या मुलाची रक्षा करीत असते.  आपल्याला जीवन प्राप्त होतो. परंतु जीवनाला सुधारण्यासाठी अंतकाळ पर्यंत आपण काहीच उपाय करू शकत नाही. यामुळेच जीवनाला दुर्गती प्राप्त होते. जीवनाची दुर्गती मिटवीण्या साठी ईश्वराशी दृढ संबंध जोडावे लागतात. आणि हेच संबंध अंतकाळात मनुष्याला ईश्वराचे स्मरण करून देत असतात, या स्मरणाने त्याची सहज कृपा होत असते.   मनुष्याने दु:खात भयभीत होण्याची गरज नाही. दु:ख आपले हित साधण्यासाठीच असतात. कारण ईश्वर दु:खातच मिळतात. सुखाचे साथी जीव आणि दु:खाचे साथी ईश्वर होय. सतपुरुषाचे जीवन दु:खातच मंगल साधते. या करीता दु:खातच सुखाच्या अनुभवाचा अभ्यास व्हायला ह्वा. तेव्हाच वासना, लोभ, क्रोध, विषयाची आसक्ती नष्ट होत जावून ईश्वरा प्रती नाते दृढ होत जाते.  जो पर्यंत संसार विषयात लोभ आहें तोपर्यंत बंधन आहें, लोभ कमी होत जातो तसतसे जीवनात वैराग्य प्रवेशतो. हे वैराग्य शस्त्र होय ज्याने लोभ, मोह जड नष्ट केल्या जातें.  सत्संगाच तात्पर्य म्हणजे सत् आसक्ती आहें, सत् संगात नि:संगता आणि नि:संगतात ईश्वरा प्रती अनुराग उत्पन्न होतो.  ईश्वरास प्राप्त करण्यास सांसारिक कामना नष्ट करावी लागतात. थोड्याही अहंकारात ईश्वराचे हृदयात निवास होत नाही.  राग, द्वेष, अहं सर्व त्यागावे लागेल. त्याकरीता सहृदय पावन मंदिर बनवावे लागेल.

उदा. लोट्यात जो पर्यंत पाणी आहें तो पर्यंत हवा प्रवेश करू शकत नाही.  तेव्हाच आस्था, निष्ठा संसारातून मुक्त होवून प्रभू कडे वळण घेईल. जीवन नंदनवना प्रमाणे होईल, मृत्यू मंगलकारी बनेल.

Life and Death are the two important stages of life. we can not just go away without this two stages. people are always fear about the death. death is the last stage of life. we can not run away from this. In bhagwat geeta geeta it is written that we can not stay away from Death…

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu