भूमीवरील हेच वैकुंठ




Like
Like Love Haha Wow Sad Angry

heaven is on earth

आजच्या काळात मानव हा निरनिराळ्या समस्यांनी गांजलेला आहें. त्यातल्या त्यात शेतकरी, कामगार, श्रमजीवी वर्ग यांची तर फारच दूरवस्था होत आहें. या त्यांच्या दशेला वेगवेगळे कारण असू शकतील, पण त्यांचा व्यवसाय पोटाची भाकर असलेली शेती व्यवसाय तिच्या उत्पादनाला मिळणारे नगण्य भावं या मागे भांडवलदारांचे व त्यांच्या पुढे माना झुकावणाऱ्या माय-बाप (?) सरकारचे षड्यंत्र हे आता चांगलेच जाणवू लागले आहें. हि आजची समस्या नसून “येरे माझ्यां मागल्यां” याच प्रमाणे कित्येक काळा पासुंचीच आहे.

शेतकर्यांच्या या समस्या म्हणजे त्याच्या चुबाजुनेच आलेल्या आहेंत,कधी नैसर्गिक तर कधी कृत्रिम यांपासून त्यांची पार खच्ची करून गेलेली आहें.  संतश्रेष्ठ तुकोबांच्या काळातही हि संकटे होतीच. मात्र आता ही संकटे वेगवेगळी रूपे घेऊन समोर आलेली आहेत. तेव्हाही माणसे देशोधडीला लागलेली होतीच अवर्षण आणि त्यावेळी पडलेला दुष्काळ हा विशेषत: शेतकरी आणि शेत मजुरांचा कर्दन काळ ठरलेला होता. आजही काही फरकाने तशीच अवस्था आहे. मान मोडून पडलेला शेतकरी मान वर करूच पाहू शकत नाही. त्याच्याय कोणत्याही प्रकारे बळ उरलेले नाही. सर्व कडील आधार संपले की तो परमेश्वराचा दरवाजा ठोठावतो. तो तर झोपलेला नसतोच. त्याचा दरवाजा सदैव आपल्या भक्तांसाठी उघडाच असतो, व त्याच्या दारी गेलेला भक्त कधीच रिकामा येत नसतो. या मराठमोळी मातीतल्या माणसाची त्याच्या वर एवढी श्रद्धा वसलेली आहे. त्यावर गाढ विश्वास ठेवून आषाढी -कार्तिकेची वारी न चुकता त्या पांढूरंगाच्या दारी भाव-भक्तीने जातात.

सामान्य जणांचा हा विठ्ठल आपल्या भक्तांची वाट बघत असतो. तो आपल्या भक्तांची कामे सुद्धा करतो. तो आपल्या भक्तांच्या भेटीला सुद्धा जातो. पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर युगानुयुगे तिष्ठत उभा राहून भक्तांची वाट बघत आहें. असा हा पंढरीचा पांढूरंग आपला माय-बाप, सखा- सोयरा होय. म्हणून  तुकोबाराया म्हणतात .

“विठ्ठल माझी माय, आम्हा सुखा उणे काय |”

“विठ्ठल सोयरा, सज्जन विसावा | जाईन त्याच्या गावा भेटावयां | सीण भाग त्यासी सांगीन आपुला | तो माझा बापूला सर्व जाणे|”

या आपला सगा सोयरा असलेल्या देवाचे हे वारकरी भक्त त्याच्या ठायी एकरूप होतात. त्यांच्या वाणीतच विठ्ठल असतो. त्याच्या नावा वाचून त्यांच्या मुखातून अन्य काहीच निघत नाही. त्यांची काया आणि छाया विठ्ठलमयी झालेली असतें. सर्व इंद्रियात श्रेष्ठ असलेले मन हे नित्य विठोबाचेच ध्यान करीत असतें.  खरे तर या भगवतभक्तांच्या ठायी सर्वधर्म समभाव वसलेला असतो. सर्वांची सुख-दु:ख ते जाणून घेतात. हा भक्तांचा मेळा म्हणजे एक संस्काराचे केंद्रच होय. परस्पर विश्वासाचे ते एक ठिकाण आहे. या धकाधकीच्या जीवनातील तो एकमेकांचा आधार आहें. या भक्तांच्या वारीतील पायदळ दिंडीत कथा-किर्तनातून, भक्तिगीते, ओव्यातून समाज प्रबोधन होत असते. आजच्या काळात या मानव जातीला भेडसावणारी या पर्यावरणाची हानी व त्यातून नियोजनाचे उपाय, वृक्षारोपणाचे महत्व जलसंवर्धनाचे उपाय या सर्व गोष्टींचे प्रबोधन व्हायला हवे. म्हणून संत तुकोबारायांनी “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी” या ओवी द्वारे समजाविण्याचे प्रयत्न केलेले आहे. की त्यांनी वृक्ष वल्लीनां आपली सोयरी मानलेली आहें. या भगवत भक्तांचा उपदेश लक्षात घेऊन वृक्ष तोड होत असल्यास ती थांबवावी, नवीन झाडे लाऊन ती जगवावी, गावोगावी श्रमदानाने पाण्याचे तलाव, विहिरी निर्माण कराव्यात, पाण्याचे महत्व स्पष्ट करावेत. आपापला परिसर स्व्च्छ ठेवून जन माणसातील आरोग्य जपावेत. यासर्व गोष्टी सांगितल्या आहे. झाडे, वने, नद्या, डोंगर, पहाडे ही संपूर्ण सृष्टी म्हणजे परमेश्वराचीच रूपे होत.

आतां तर अध्यात्म्याच्या व भक्तीच्या नावावर साधू,भोंदू,बुवाबाजी यांचा फारच सुळसुळाट झालेला आहें. भविष्य, जोतिष्य, यांच्या नावा खाली शहरी,खेडोपाडी,सुशिक्षिता-पासून ते अशिक्षिता पर्यंत फसवेगिरीचा मातंग पसरलेला आहे. आधीच भेदरलेल्या जनतेला गंडवून निरनिराळी अधोरी कृत्ये, तसेच मांत्रिक,तांत्रिक कृत्ये करून पैसा उखडतात. प्रवचनांच्या नावाखाली घनसंग्रह करण्याच्या मागे हि साधू-संत म्हणवून घेणारे संत विखुरलेले आहेत.

तुकोबा राया म्हणतात.

ऎसे कैसे झाले भोंदू , कर्म करोनी म्हणती साधू | अंगी लावूनिया राख, डोळे झाकुनी करती पापं |
दावुनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा | तुका म्हणे सांगो किती, जळो त्यांची संगती |

अशा भोंदू बाबांची सध्याच्या काळांत फारच चलती आहे. त्यांचेच दरबार भरतात. त्यांच्या कृपेने म्हणतात मोठे लाभ होतात. आणि लोक अश्या खोट्या भ्रमात चांगलेच चाचपडत आहेंत. आणि त्याच भोंदू साधूंचे बँक बँलन्स करोडो रुपयांनी वाढतच आहेंत.प्रसारमाध्यम हयांच बाबींना प्राधान्य देत आहे. बाबांचे कथित भक्त बाबांच्या भाषेत बोलत आहेत. हे सर्व चुकीच्या दिशेने जात आहे. आणि वारकरी सांप्रदाय या गोष्टींच्या विरोधात आहें. तेव्हा हे जनतेच्या अंगावरचे अंधश्रद्धाचे लेप धुवायला पाहिजेत.  आज ह्या महागाईच्या काळात सुद्धा मोठमोठी कारखानदार, व्यापारी ही मंडळी कामगार, श्रमजीवी मजदूर वर्गाची मजुरी वाजवी न देता तो पैसा मंदिरे सजविण्यात, बुवाबाजीत यांत जास्त प्रमाणात लुटतात.यातच आपली प्रतिष्ठा, आणि श्रीमंती मानतात.  गरीब कामगार वर्गातून पैसा कमवून त्यांचेच गळे कापतात. या मुळे गरीब गरिबीत दु;ख भोगतो व श्रीमंत श्रीमंतीत मौज करतो आहे.  तेव्हा देव नेमका कशात आहे. दानर्धमाचे पुण्य कशात आहे. या स्वत:ला श्रीमंत म्हणवून घेणार्यां लोकांना कोण समजावणार.!

तेव्हा तुकोबाराया म्हणतात कि–

“जे का रंजले गांजले त्यासी म्हने जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा”
या अभंगावरून लक्षात घ्यायला पाहिजे.हे स्मरून परमेश्वर पाहावा व आपल्या परिसरातील लोकांनाही याचा अर्थ पटवून द्यावा.

There is a popular view that “heaven” will be on “earth,” after our planet has been … As noted already, the Bible clearly teaches that heaven is on earth.

Like
Like Love Haha Wow Sad Angry







  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu