मधुर गुणाचा फणस




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Health Benefits of Jack fruit : Delicious jackfruit is rich in energy, dietary fiber, minerals, and vitamins. Almost all parts of the jackfruit can be used as herbal medicine. Its leaves are used to boost the production of breast milk for nursing mothers.

आंब्या नंतर आणिक एक महत्वाचे फळ म्हणजे फणस. भारतात गोवा, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यात फणस अधिक प्रमाणात पिकतात. फणसाच्या फळातील गरे. बिया, आणि तंतुमय भाग खाण्यासाठी वापरतात. बियांभाजून, उकडून किंवा भाजी करूनही खातात. फणसाची साल दुध देणार्या गुरांना खायला दिल्यास त्यांच्या दुधात वाढ होते. फणसाची गरे सुकवून ठेवल्यास केव्हाही तळून खाता येतात.पिकलेल्या गरापासुन फणसपोळी बनवितात. फणसाचे पिकलेले फळ शीत, सिग्ध, पित्त-वातनाशक, तृप्ती देणारे, पुष्टी देणारे, स्वादिष्ट, मासवृद्धी करणारे असते आणि वीर्यवर्धक असून रक्तपित्त व व्रणनाशक ही आहे. तसेच फणसाचे कच्चे फळ वातकारक, तुरट, जड, दाहकारक, मधुर व बलदायक असते. त्याच प्रमाणे ते कफ आणि मेद्वर्धक आहे. भूक कमी असलेल्या व्यक्तींनी फणस खावू नये. फणसाच्या झाडाच्या सालीपासून एक चिक निघतो त्यास फणसांबा असे म्हणतात. तोंड आल्यास त्यावर हा चिक लावल्यास चांगलाच गुण येतो. तसेच हा चिक गळवावर लावल्यास गळू लवकरच पिकून येते व फुटते. जुलाब झाल्यास फणसाच्या मुलांचा काढा उपयोगी पडतो. त्वचा विकारात फणसाच्या पानांचा आणि मुळांचा काढा घ्यावा. रक्तपित्त झाल्यास फणसाची गरे खावीत.असा हा बाहेरून काटेरी दिसणारा हा फणस आतून फार गुणकारी व मधुर आहे.

Note: Unique, delicious jackfruit is rich in energy, dietary fiber, minerals, and vitamins. Almost all parts of the jackfruit can be used as herbal medicine. Its leaves are used to boost the production of breast milk for nursing mothers.  Jackfruit contains morin and a crystalline constituent, cyanomaclurin. In Ayurvedic medicine, hot water extract of mature leaves used for treatment of diabetes.

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu