गोपाळ कृष्ण गोखले

Like Like Love Haha Wow Sad Angry 6275566 विवेकशक्तीचा उपासक   ना. गोपाळ कृष्ण गोखले जन्म : ९ मे १८६६ ...
Like
Like Love Haha Wow Sad Angry
6275566

गोपाळ कृष्ण गोखले

विवेकशक्तीचा उपासक  
ना. गोपाळ कृष्ण गोखले
जन्म : ९ मे १८६६  कोथाळूक (रत्नागिरी)
मृत्यू  : १९ डिसेंबर १९१५
नाव   : गोपाळ कृष्ण गोखले

भारतीय स्वातंत्र्य युद्धात ज्यांनी आयुष्यभर कष्ट सोसले व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अशा महात्म्यात शोभून दिसणारे नामदार गोपाळ कृष्ण गोखले हे रत्नागिरीतल्या एका खेडेगावात जन्माला आले.त्यांचे बालपण अतिशय खडतर अशा परिस्थितीत गेले.परंतु कुशाग्र बुद्धीच्या जोरावर वयाच्या अठराव्या वर्षीच पदवी मिळवली. देशसेवेने झपाटून गेलेले गोखले पुण्यात जाऊन ” न्यू इंग्लिश स्कूलच्या” मंडळीस मिळाले. त्यांच्यावर आगरकर, टिळक, रानडे यांचा प्रभाव पडला. ते शाळा कॉलेजात इंग्रजी, गणित, राज्यशास्त्र, आर्त्शास्त्र, इतिहास, हे विषय आवडीने शिकवत असत. पुढे न्या.रानडे यांचे शिष्यत्व पत्करून अर्थशास्त्र व राज्यशास्त्र यांचा सुष्म अभ्यास केला.
गोखल्यांनी राजकीय जीवनात सार्वजनिक सभेचे, कॉंग्रेस अधिवेशनाचे सरचिटणीस म्हणून उत्तम प्रकारे काम केले.पुढे ते डेक्कन सभेचे प्रतिनिधी म्हणून इंग्लंड ला गेले. तिथे त्यांनी भारतीय स्थितीचे अभ्यासपूर्ण वर्णन केले. त्यांच्या अभ्यासाची जाणीव इंग्रजांना सुद्धा होती. त्यामुळे गोखल्यांनी भारतीयांची जेवढी दाद मिळवली तेव्हडिच दाद इंग्रज सरकार सुद्धा देत होते. समाज सुधारणा करण्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट घेतले. अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचे प्रश्न, शैक्षणिक प्रश्न, औदोय्गिक प्रश्न, सामाजिक प्रश्न अशा प्रश्नांना त्यांनी प्राधान्य दिले. त्यांच्या उत्कृष्ट कामाच्या पद्धतीमुळे देशाची पावले प्रगती पथावर पडू लागली. त्यांचा गौरव करण्यास शब्दही अपुरे पडतात.

Gopal Krishna Gokhale, CIE was one of the founding social and political leaders during the Indian Independence Movement against the British. Read More.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
6275566

Related Stories