‘दुनियादारी’चा नवा विक्रम

Like Like Love Haha Wow Sad Angry झी टॉकीजच्या ‘दुनियादारी’ या चित्रपटानं मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात एक नवा विक्रम केलाय....
Like
Like Love Haha Wow Sad Angry

झी टॉकीजच्या ‘दुनियादारी’ या चित्रपटानं मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात एक नवा विक्रम केलाय. आजपासून ‘दुनियादारी’चे तब्बल ७१० शो राज्यासह गोवा, गुजरात आणि कर्नाटकातही झळकणार आहेत. ९ ऑगस्ट रोजी चौथ्या आठवड्यात पोचणारा दुनियादारी आणि ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा चेन्नई एक्स्प्रेस हे दोन्हीही चित्रपट सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असल्याचे आता स्पष्ट होत आहे.

कॅमेरामन संजय जाधव यांचा `दुनियादारी` हा मराठी सिनेमा १९ जुलैला झळकला.

– वादावर पडदा : मनसेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही चित्रपट सिंगल स्क्र ीन चित्रपटगृहांत

मुंबई : दुनियादारीचे शो बंद केल्यास चेन्नई एक्स्प्रेसचा एकही शो होऊ देणार नसल्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला होता. त्यामुळे आपल्या चित्रपटावर याचा परिणाम होईल या भीतीने चेन्नई एक्स्प्रेसचे दिग्दर्शक रोहीत शेट्टी यांनी आपल्या संपूर्ण टीमसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर राज यांनी चेन्नई एक्स्प्रेसला हिरवा कंदील दाखविला. या भेटीच्या वेळी दुनियादारीचीही टीम उपस्थित होती.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories