गुरुचे महत्वाचे बिंदू




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Read on Blessing of Gurudev, the points given by gurudev that teaches you how to live life and face the real part of your life.

Motivational Stories (Bhartiya Sanskri

  • ईश्वर कोणत्याहीमूर्तीत नसतो हे सत्य आहे, परंतु आपली श्रद्धा आपला विश्वास व भक्तीभाव यामुळे मूर्तीत चैतन्य येते,प्राण येतो व आपल्या अति उच्च भावने मुळे मूर्तीला ईश्वराचे रूप प्राप्त होते. ईश्वर या जगात आहे किंवा नाही याची चर्चा करण्याचा अधिकार फक्त अश्याच व्यक्तीला आहे. की ज्यांनी ईश्वराचा अनुभव घेतलेला आहे.
  • मनुष्याच्या चांगल्या वाईट कर्माचे फळ हे त्याला मिळतेच. मिळायला थोडा वेळ अवश्य लागतो येवढेच,त्यासाठी धीर धरावा लागतो आणि तेवढ्यासाठी आपल्या मनाचे नास्तिकतेकडे जाणे थांबवावे.
  •  मनुष्याचे दैव अनुकूल असेपर्यंत तो आपल्या कर्तुत्वाच्या गप्पा मारतो व ईश्वराला विसरतो. पण दैव जेव्हा प्रतिकूल होते तेव्हा त्याला ईश्वराची आणि नशिबाची दोघांची आठवण होते. मग तो मनुष्य झोपेतून जागा कधी झाला ते सांगू शकतो.पण निद्राधीन कधी झाला हे तो सांगू शकत नाही. याला ईश्वराची माया असे म्हणतात.
  • वैज्ञांनिक हे निश्चित सांगू शकतात की, लाल व पिवळ्या रंगाच्या मिश्रणाने कोणता रंग तयार होतो. पण ते हे सांगू शकणार नाही की, भगवंताने निर्माण केलेल्या सृष्टीत मुळात लाल व पिवळा रंग प्रथम तयार झाले कसे ?
  • जमिनीला उतार जितका चांगला असेल तितकेच पाणी वेगाने वाहाते.त्याच प्रमाणे आपले आचरण जितके शुद्ध स्व्च्छ व  असेल, श्रद्धा आणि भाव उच्च दर्जाचे असतील तितकीच वेगाने गुरुकृपा अधिक सम्पादन होईल.
  • वृक्षाचे एखादे फळ आंबट लागले तर त्याचा दोष वृक्षाला देण्याचे कारण नाही. कारण वृक्ष तर सर्वच फळांना सारखाच रस पुरवीत असतो. परंतु फळ जर पक्व होण्यापूर्वी फांदी पासून तोडून नेले तर त्यात तर आंबटपणा राहणारच, तसेच गुरु शिष्याचे असते. अपेक्षित बदल व सुधारण्या होण्या आधीच शिष्य गुरुचरनापासून दूर गेला . तर त्या शिष्यात कुठेतरी उणेपणा दिसणारच. ” आपण ज्या वृक्षाखाली उभे आहोत, तिथेच स्थिर राहिले पाहिजे आहे त्या झाडाच्या सावलीपेक्षा दाट सावलीचा शोध घेण्यात धोका असतो. कारण सावलीच्या शोधात केवळ तप्त उनच मिळेल. तसेच आपल्या जीवनात एकदा सद्गुरू मिळाले की,त्याच   स्थिर व्हावे व आपली भ्रमंती थांबवावी.
  • वैराग्यशील मनुष्य निरिच्छ असतो. म्हणूनच ईच्छा त्याची चरणदासी होऊन राहु शकते.
  • अध्यात्मपुरुष आणि विद्वान पुरुष या दोघांत फरक आहे.विद्वान चर्चा करू शकतो. पण त्याच्यात श्रद्धेचा अभाव असू शकतो. मात्र अध्यात्मिक पुरुष्याची विद्वत्ता सश्रध्द असते.
  • वैराग्यशील व्यक्ती आणि सहनशील व्यक्ती या दोघांत फरक आहे.वैरागी सहजपणे क्षमा करतो, तर सहनशील स्वत:चा क्रोध मनात दाबून ठेवून क्षमा करीत असतो.
  • वैराग्यशील व्यक्ती आपल्या सर्व ईच्छा आकांक्षावर नियंत्रण ठेऊ शकतो, त्याच्या सर्व ईच्छा आपोआपच नष्ट होतात. व व्हायलाच पाहिजे अन्यथा भगवंताचाच अपमान होतो.
  • ज्या चैतन्याला जाणण्यासाठी आपण अध्ययन करतो ते तर आपल्या स्वत:तच स्थित असते. याच चैतन्याच्या अनुभूतीला आपण अध्यात्म म्हणतो. अध्यात्म म्हणजे अंतर्मुख होऊन आपण आपल्या देहाचा असा विचार करणे कि चैतन्य म्हणजे काय?  हि कुणाची देणगी आहे? आणि हे चैतन्य माझ्यात आले कोठून ?
  • अध्यात्म आचरणाने दुष्ट बुद्धी नाहीशी होते, स्फूर्ती निर्माण होते, स्वत:बद्दलच्या प्रशंसनिय आणि अवास्तव कल्पना गळून पडतात. अस्वच्छ भांड्यात शुद्ध दुध ठेवल्यास ते नासते. त्याच प्रमाणे रोगी, भोगी व मलीन शरीरावरही ईश्वरी साक्षात्कारी व्यक्तींचे आशीर्वाद व्यर्थ ठरतात.
  • कार्यसिद्धीसाठी ईश्वराचे सहाय्य तेव्हाच मिळते की,जेव्हा श्रम आणि प्रयत्न यांची पराकाष्ठा आपण करतो.
  • चिंता ही दोघांनाही त्रास देते ज्याच्या जवळ काही नाही त्याला आणि ज्याच्या जवळ सर्वकाही आहे त्याला सुद्धा.
  • आपले दैव हे ईश्वराधिन आहे आपण त्याला बदलू शकत नाही. पण अध्यात्मिक आचरणाने त्याला अवश्य सावरू शकतो.
  • चंद्राचे प्रतिबिंब हे गटाराचे पाणी व गंगाजल दोन्ही वर सारखेच पडते,परंतु आपण हे प्रतिबिंब गंगाजलावर पाहणेच अधिक पसंत करतो. व त्यातच पाहण्याचा प्रयत्नही करतो.
  • दुधाला साय येण्यासाठी अग्नीची आवश्यकता असते. दह्यातून लोणी काढण्यासाठी मंथनाची आवश्यकता असते. तसेच भक्तीला योगाची साथ मिळाल्यास ती भक्तीही श्रेष्ठभक्ती म्हणून ओळखली जाते.
  • जर अधिक बोलण्याची सवय असेल तर ती कमी करण्यासाठी चिंतनाचा आधार घ्यावा.
  • ज्याने दिव्य प्रकाशाचा अनुभव घेतला आहे. त्याला अंधाराची कसली भीती? जर पूर्ण प्रकाशाकडे जायचे असेल तर अंधाराला भिउन कसे चालेल?
  • वैदिक धर्मच सर्वश्रेष्ठ् आहे कारण या ईश्वरानेच स्थापन केलेल्या धर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी ईश्वरालाच पुन्हा पुन्हा अवतार घेऊन पृथ्वीवर यावे लागले आणि पुढेही येत राहणार आहे. वैदिक धर्म अद्वैत सिद्धांत शिकवितो.ज्याचा मुख्य आधार त्याग आहे.
  • धर्माचा अर्थ आहे चांगल्या विचारांना आत्मसात करून त्यांना कर्ममय रूप देणे. अंधश्रध्द व्यक्ती धर्माचा खरा अर्थ काय,तो समजू शकत नाही. त्यामुळेच धर्माची हानी होते. त्याला क्षती पोचते.
  • पिकाच्या उत्तम वाढीसाठी ज्या प्रमाणे आजूबाजूची तने किंवा गवत कचरा काढून टाकावे लागते. त्याच प्रमाणे धर्माच्या संरक्षणासाठी त्यात समाविष्ट झालेल्या अनिष्ट प्रथाही वेळोवेळी काढून टाकल्या पाहिजेत.
  • वैदिक धर्मीय तेजस्वीतेला नमस्कार करतात मग तो सूर्य असो वा संत. परीसामुळे लोखंडाचे सोने होते.व लोखंडाची किंमत वाढते, लोखंडामुळे परिसाची नाही. म्हणून लोखंडाला परिसाची गरज असते,परिसाला लोखंडाची गरज नाही. य़ाच प्रमाणे शिष्याने गुरु जवळ जावे,गुरूला शिष्या जवळ जाण्याची गरज नाही. कारण सृष्टीचा नियम असा आहे की,तहानलेला विहिरीजवळ जातो. विहीर तहानलेल्या कडे येत नाही.
  • सत्पुरुषांचे दर्शन होणे फार दुर्लभ आहे. परंतु राम दर्शनाची अभिलाषा मनांत बाळगणाऱ्या शबरीच्या मनासारखी आपल्या मनाची स्थिती ठेवल्यास दर्शन दुर्लभ किंवा अश्यक्यही नाही.
  • बाजारातून कोणतीही वस्तू खरेदी करताना तिची किंमत पैशात चुकवावी लागते तसेच गुरु कृपा प्राप्त करून घेण्यासाठी श्रद्धा आणि भक्ती याची किंमत भरून द्यावीच लागते.
  • गुरु शिष्याला अनुग्रहित करतात याचा अर्थ केवळ कानात मंत्रोपदेश देणे असाच नाही अनुग्रह हा दृष्टीतून, स्पर्शातून किंवा शब्दातूनही दिल्या जाऊ शकतो.
  • आपण प्रत्येक काम कठोर परिश्रमाने व प्रयत्नानेच केलेलं पाहिजे. जेथे आपली शक्ती कमी पडते, बुद्धी कुंठीत होऊ लागते त्या क्षणापासून गुरुंची शक्ती आधाराला मिळू लागण्यास आपोआपच प्रारंभ होतो.
  • तलावातील पाणी सर्वच जण घेऊन पितात,त्यावेळी अस कुणी विचारत नाही की हे तळ कुणाचं आहे ?त्याच प्रमाणे साक्षात्कारी पुरुष समोर असल्यास त्यांच्या  बद्दल असे विचारू नये की, हे कोण आहेत ? त्यांना आपल्या गुरुस्थानी समजून नमस्कार अवश्य करावा.
  • शिष्याच्या घरी गुरुंचे आगमन झाल्यास त्याच्या घरातील सर्व दोष नाहीसे होतात,घर आनंदाने पावित्र्याने भरून जाते. व त्यामुळे शांतीचे वातावरण निर्माण होते. म्हणून पूर्वीच्या काळी राजे आपापल्या राजवाड्यात ऋषीमुनींना पाचारण करीत असत.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu