शिव आणि गणेश उत्पत्ती




Like
Like Love Haha Wow Sad Angry

lord shiv and ganesh

पंच देवतां मध्ये श्री आदिगणेश ह्यांची उत्पत्ती सृष्टीकर्ता महेश्वराने सृष्टीप्रारंभात विघ्न – बाधा प्रशमनार्थ केली. आपल्या साक्षात अंशातूनच प्रगट कलेली आहे. पूर्वी जेव्हा देवता राक्षसांद्वारे पराभूत होत असल्याने त्यांनी शिवाची स्तुतीरूप आराधना केली व त्यांना प्रसंन्न करून देवगुरु बृहस्पतीने दैत्यांपासून  होणारे विघ्नयुक्त कर्माचे भय व्यक्त केले. (त्यांच्या संरक्षणा करीता स्वयं विघ्नहर्ता गणेशाचे रूप धारण केले)  गजाननाच्या रूपाने मां अंबिका पासून प्रगट झाले. आणि सर्व गणाचे अधिपती म्हणजेच (संचालक)  गणाचे पती ‘गणपती’ म्हणून रुप धारण केले. गणपतींना सर्व संस्कारांनि संपन्न करून त्यांना सांगितले कि “हे वत्स तुझा अवतार दैत्यांच्या विनाशासाठी झाला आहे. देवतांचे व द्विजांचे उपकारा प्रीत्यर्थ तसेच पृथ्वीतला वरील जो अन्यायपूर्वक कर्म करेल त्याच्या कार्यात विघ्न उत्पन्न करावे व जो सत्कर्म करेल त्यांच्या कर्माची वृद्धी करावी.  आणि सर्वांकडून सर्व प्रथम पूजनाचा मान प्राप्त होईल. तुझी आग्रपुजा न झाल्यास कोणतेही मंगल कार्य अमंगल कार्यात परावर्तीत होईल. असा वर प्रदान करून भगवान शिवांनी गणेशाच्या वंदनेचे गुणगान केलेले आहे. या करीता सर्व प्रथम गणेशाचीच स्तुती करून मंगल कार्य अथवा पूजा करावी. श्रीगणेशाचे चरणकमल अरुणवर्ण आहेत ते विघ्नांचानाश करतात. गणाधिपती ज्ञांनांचे दाता आहेत. यांचे विशाल मस्तकाची महती बुद्धीचे सूचक आहेत. एक वेळ श्री महेश्वरांनी गणेशावर एक काम सोपविले.  सर्व देवतांना निमंत्रित करण्याचे, अत: त्यांचे वाहन मूषक मंद गतीचे असल्या कारणाने त्यांनी बुद्धीने काम केले. त्यांना माहित होते कि सर्व देवदेवतांचा वास महादेवांतच आहे,तेव्हा त्यांनाच तीन परिक्रमा करून तेथेच निमंत्रन दिले. आणि सर्व देवतां ना निमंत्रन प्राप्त झाले. व सर्व देवी देवता यज्ञांत सामील झाले.

This articles will tell you about How Shri Ganesha and lord Shankar comes to this earth, Marathi article Shiv ani Ganesha Utpatti.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu