आरोग्य–पाठीचे दुखणे व कारण




Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

Back pain is pain felt in the back that usually originates from the muscles, nerves, bones, joints or other structures in the spine. Back pain affects most of us at some time in our lives. It is the most common reasons for absence from work and having to visit the doctor.

How to Cure Back Pain at Home 1पाठीच्या दुखण्याचे वास्तविक कारण काय ते डॉ.सांगितलेल्या तपासण्याच्या निष्कर्षांनंतरच होऊ शकतो. म्हणून पाठीचे दुखणे सुरु झाले असल्यास आपल्याला आपल्या दैनंदिन जीवन शैलीत काही परिवर्तन करून म्हणजेच पथ्य पाळून बर्याच अंशी या दुखण्यातून आराम मिळू शकतो.

१) खुर्चीवर सरळ स्थितीत बसावे. शरीराचा मागचां भाग खुर्चीच्या पाठीला स्पर्श करीत असावा. गूढगे ९० अंशाच्या कोनात मोडलेले असावे. तसेच गुढगे एकावर एक ठेवून बसू नये. गुढगे हिप्सच्या पातळीत किंवा थोडे उंच ठेऊन बसावे.

२) पायांचे तळवे जमिनीला संपूर्णपणे स्पर्श करीत असावे. एकाच स्थितीत बराच वेळपर्यंत बसू नये.

३) ऑफीस मध्ये आपल्या खुर्चीला ‘वर्क स्टेशन’ शी अशा प्रकारे व्यवस्थित ठेवावे कि काम करताना सोयीचे व्हावे.

४) ढोपर आणि हातांना खुर्ची किंवा डेक्सवर आरामाच्या स्थितीत ठेवावे तसेच खांद्यांना शिथिल ठेवावे.

५) समोर वाकणारे योगासन करू नये आणि जास्त वेदना असतील तर योग व  व्यायाम करणे टाळावे.

६) खुर्ची वर अधिक वेळ बसू नये. मध्ये थोडे उठावे व फिरावे.

७) कुठलीही जास्त वजनी वस्तू उचलू नये. थोडी वजनी वस्तू उचलण्याचे काम पडले तरी कमरेवर ताण पडेल असे उचलू नये.

८) शारीरिक श्रमांना टाळू नये. त्यामुळे मांस पेशी पुष्ट होतात. उंच टाचेची चप्पल अथवा बूट घालू नये.

९) खूप वेळ पर्यंत उभे राहावयाचे असल्याच एकाच अवस्थेत उभे राहू नये. स्थिती वारंवार बदलत राहावी. पायर्यांवर चढताना उतरताना अत्यंत सावधपणे सावकाश उतरावे.

१०) माने खाली जाड व उंच तकिये वापरू नये. झोपताना गादी कडक असावी. पाठीचे मनके वाकतील असे झोपू नये. सर्वात म्ह्त्वाचे म्हणजे पाठीच्या दुखण्यावर आपल्याच मनाने कुठलेही वेदनानाशक गोळी किंवा औषध घेऊ नये. पाठीच्या दुखण्यांना रूटीन सिम्टम्स सारखे समजायला नको. पाठीचे दुखणे म्हणजे नेहमीच कुठल्या तरी आजाराचे लक्षण असते. याचे प्रारंभी निदान करून भविष्यात येणार्या जटील समस्यापासून आपण सुरक्षित होऊ शकतो. अन्यथा गंभीर रूप धारण केलेल्या आजारामुळे पाठीच्या मणक्यांना गंभीर नुकसान झाल्यानंतर कुठल्याही उपचारांनी ते भरून काढणे अशक्य होऊन बसते. वयोमानापरत्वे पाठीच्या दुखण्याची झिज होणे स्वाभाविक आहे. परंतु आयुर्वेदातील पंचकर्म चिकित्सेतील स्नेहन, स्वेदन इ उपचारांनी हि झीज कमीत कमी होत असते. या उपचारांनी पाठीच्या कण्याचे पोषण होऊन ते दीर्घकाळ कार्यरत राहू शकतात.मात्र हा उपचार वेळे नुसार लगेचच व्हायला हवा. पंचकर्म याहून अधिक चांगली चिकित्सा सध्या तरी उपलब्ध नाही.

 Note: Read 10 easy tips to get rid of back pain, Back pain is pain felt in the back that usually originates from the muscles, nerves, bones, joints or other structures in the spine.

 How to Cure Back Pain at Home i

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu