Veg Biryani :
Are you Vegetarian? Cook delicious Vegetable Biryani in simple but tastier way, A healthy and delicious Biryani with vegetables and rice. Garnish it with the slice of onions.
साहित्य -: तीन वाट्या चांगल्या प्रतीचे बासमती तांदूळ, वाटीभर फुलकोबीचे तुरे, दोन गाजर, दोन बटाटे, दोन हिरव्या मिरच्यांचे लांबट तुकडे, अर्धी वाटी फरस बियांच्या शेंगाचे तुकडे, अर्धा पाव पनीरचे तुकडे, दोन चमचे बिर्याणी मसाला, चार लवंगा, दोन तीन दालचिनीचे व जायपत्रीचे तुकडे, एकचमचा जिरे, एक फुल, तमालपत्र, दोन कांदे, अर्धी वाटी तळलेले काजू तुकडे, मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर,चवी नुसार मीठ, वाटीभर दही, एक चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, चिमुटभर हिंग, जरुरत नुसार तेल, दोन चमचे दुध.
कृती -: तांदूळ दोन पाण्याने धुवून पंधरा मिनिट तसेच ठेवा, भाज्यांचे तुकडे करून धुवून निथळत ठेवा, तुकडे वेगवेगळे तळून घ्या, दही पाणी न घालता घुसळून ठेवा व त्यात किंचित तिखट, मीठ व हळद घाला, सर्व भाज्यांचे तुकडे दह्यात अर्धा तास घालून ठेवा,तुपावर लवंग, दालचिनी, तेजपत्ता फुल,जायपत्रीघालून त्याची फ़ोडणी तयार करून त्यावर निथळलेले तान्दुळ घाळून पाच मिनिटे परता, त्यानंतर तांदळाच्या दुप्पट पाणी चांगले उकळून त्यात घाला. भातातील पाणी उकळत असतानाच मिठ् व लिंबाचा रस घालून मोकळा भात शिजवून घ्यामोठ्या जाड बुडाच्या कढईत तूप गरम करून त्यात जिरे व हिंग घालून फोडणी तयार करा. त्यात दह्यातील भाजींचे तुकडे घालून कढईला तेल सुटेपर्यंत ते तुकडे परता त्यात चवीनुसार मीठ व बिर्याणी मसाला घाला. सर्व तुकडे शिजल्या नंतर त्यात थोडा थोडा करून भात घालुन परतून घेत जा ( भात तुटू न देता परता ) याप्रमाणे पूर्ण भात घालून एकत्रित मिसळा गॉस बंद करून घ्या. शेवटी दोन चमचे दुघात केशर मिसळून ते भातावर घाला व काजूचे तुकडे लांबट चिरलेला कांदा,कोथिंबीर घालून बिर्याणी सजवा नंतर तवा गरम करून ती भाताची कढई तव्यावर मांडून ठेवा वाफेने बिर्याणी मोकळी व गरम राहते.वाढताना गरम तूप सोडून वाढा.