3
तुझी आठवण आली की माहितेय काय होते?
वारा कसा मंद मंद वाहतो…मनाला कसा हलकेच स्पर्शुन जातो…तुझी आठवण आली की माहितेय काय होते?सरी कशा थेंब थेंब बरसतात…मनाला कशा चिंब चिंब भिजवतात…तुझी आठवण आली की माहितेय काय होते?
मोगरा ही गंध गंधित होतो…मनाला ही धुंद मोहरून नेतो …तुझी आठवण आली की माहितेय काय होते?
अश्रु ही कसे झर झर झरतात…तुला पाहण्यासाठी डोळे किती किती तरसतात…तुझी आठवण आली की माहितेय काय होते?
स्पंदनंचा ताल ताल हरवतोप्रीत वेडया गीतांचा सुर ही ना गवसतोतुझी आठवण आली की माहितेय काय होते?
माझे शब्द नी शब्द विखुरतातमाझ्या कविता ही मजला ना स्फुराताततुझी आठवण आली की माहितेय काय होते?
3