अतिसार

Like Like Love Haha Wow Sad Angry अतिसार हा एक विशेष करून पावसाळ्यात होणारा उपद्रव होय. आधुनिक वैद्यकानुसार अतिसार हा जंतुजन्य...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

अतिसार हा एक विशेष करून पावसाळ्यात होणारा उपद्रव होय. आधुनिक वैद्यकानुसार अतिसार हा जंतुजन्य असू शकतो अथवा जंतुच्या उपद्रवाविनाही होऊ शकतो. आतड्याच्या अंत त्वचेला सूज येणं आतड्यांवर दुष्परिणाम होणारी औषध घेणं, न मानवणारे पदार्थ खाणं अशा कारणां मुळेही अतिसार होतो. आयुर्वेदातही अतिसाराची कारण थोडी बहुत अशीच आहेत. किंबहुना सर्व विकारांची कारण आयुर्वेदान ‘आगंतु’ अथवा ‘नीज’अशी मानली आहे. आता हे ‘नीज’रोग जन्मत:असलेल्या विकृतीमुळे होतात. अथवा प्रज्ञापराधामुळे होतात. अशा प्रज्ञांपराधामुळे अतिसार होऊ शकतो. अवेळी आहार तसेच चुकीचा आहार आदी कारणांमुळे – थोडक्यात अग्निमाद्यामुळे अतिसार होउ शकतो. म्हणजे अग्निमाद्य,-अजीर्ण-अतिसार-अंतत्वचेला दुबळेपण –अजीर्ण अतिसार  अस चक्र चालू होऊ शकत. डाळ,गुळ,भजी अशांसारख्या पदार्थांचा आहारात सामावेश, अतिमद्य यामुळे अग्नीवर ताण पडतो. आणि अंतत्वचाही नाजूक बनते. म्हणून अतिसाराच्या चिकित्सेत तज्ञाच्या सल्ल्याची आवश्यकता असली तरी देखील सुरवातीच्या अवस्थेत या दोन बाबी ध्यानात घेऊन घरघुती उपाय करणे महत्वाचे आहे.diarrhoea/ loose disease, how to treat diarrhoea/ loose disease, care n diarrhoea/ loose disease

येथे एक लक्षात घ्यावं एक-दोन ढाळ झाले की, आतड्यांची हालचाल कमी करणारी काही औषध देऊन अतिसाराचा वेग ताबडतोब कमी करायची पद्धत आजवर आधुनिक औषध शास्त्रांत मान्य होती. पण आता अस् केल्याने आतड्यांत साचून राहिलेली ‘टॉक्सिन्स’ हानिकारक असतात, अश्या अनुमानाप्रत आधुनिक वैद्यक आलं आहे. त्यामुळे ‘आम’ जाईपर्यंत जुलाब जाऊ नये,हे आयुर्वेदाच प्रतिपालन अगदी योग्य आहे. दुर्गंधीयुक्त मल बाहेर पडला,बुळबुळीत चिकटा गेला कि स्वच्छ पाण्यासारखे जुलाब होऊ लागले की जुलाब थांबवण्याच औषध द्याव. जायफळ हा घरातला पदार्थ आतड्यांची गती कमी करतो आणि त्याच बरोबर सुंठ आणि तूप घेतल की,पाचक अग्नीची कार्यक्षमता वाढून मूळ कारण दुरुस्त केल जात. म्हणून जायफळ,सुंठ व तूप याचा अतिसारात फार फायदा होतो.  पण तत्पूर्वी अतिसार सुरु झाल्यावर लंघन करावचं. सौम्य अतिसार असला तर लंघनानेच बरे वाटेल. पाणी प्यावं (पाजावं )आणि ते औषधीयुक्त असावं उकळताना त्यात सुंठ आणि वाळा टाकावा. भरपुर पाणी प्याव. बटव्यातली औषधीपैकी अतिविष आणि कुड्याच पाळ हि औषधी अतिसारावर उपयोगी पडतात. कुड्याच चूर्ण आणि अतिविषाच चूर्ण १/४ चमचा (५०० मि.ली. ग्राम) घेऊन मधा बरोबर तीन मात्रा घ्यावं.

भूक चांगली लागली तरच भाताची पेज,मनुकाच पाणी,लाह्याच पाणी, रव्याची कांजी आणि या  पदार्थात जिरे,ओवा,सैंधव,पिंपळी,सुंठ ह्यातील जे काही उपलब्ध असेल ते चिमुट चिमुट घालावं. डाळिंब हे अतिसारावर अतिशय गुणकारी आहे. हे मुळातच पचन वाढविणारे असल्याने ते अतिसार,मलावरोध दोन्हीत उपयोगी आहे. डाळींबाच्या सालीचा मात्र अतिसारातच उपयोग करावा.

Note: Diarrhoea is a symptom of various illnesses and bowel disturbances during which someone passes more frequent, loose, watery stools. Diarrhoea is the frequent passing of watery faeces (poo). Other symptoms include cramps and pains in the abdomen (stomach), nausea and vomiting.

z_p14-Diarrhoea

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories