स्वास्थ्य रक्षक मसाले आणि आरोग्य!




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Generally what we think is spices are injurious to health, but here we will study Spices That Have Healthy Benefits. spices for healthy body.

मसाले म्हटले की बराच गैरसमज होतो. पण हिंग, मिरे, दालचिनी, जिरे, लवंगा हे सर्व मसाल्याचे पदार्थ जरी असले तरी ह्यात अती औषधी गुणधर्म आहेत. कदाची आपल्या पूर्वजांनी यांचे औषधी गुणधर्म ओळखूनच या पदार्थांना मसाल्यामध्ये स्थान प्राप्त करून दिले असावेत चमचमीत भोजनाच्या निमित्ताने काही औषधे पोटात जावी हा त्यांचा उद्देश असू शकतो. मसाल्याच्या सर्वच पदार्थांना सुंदर वास असला तरी दालचिनी आणि जायपत्री, कर्णफुल, या विशेष सुगंधी वासाचे मसाले, मसालेभात, छोले, पुलाव करताना या शवाय चालणारच नाही. सर्दी, कडकी (ताप) डायरिया, एसिडीटी, अपचन इ. विकारांत दालचिनी घरात हाताशी असायलाच ह्वी. एक चिमुट दालचिनी पावडर एक चमचा मधातून दोन वेळा घेतली तर सर्दीवर लगेच गुण येतो. अंगात बारीक कसकस असेल, हातपाय ठणकत असतील तर दालचिनी, सुंठ, लवंग, मिरीचा अर्धा कप काढा घेऊन उबदार पांघरूनात एक झोप काढली की दरदरून घाम यायलाच ह्वा. त्यामूळे लगेच चांगले वाटते. संधी वातात दालचिनीचे तेल लाऊन सांधे शेकले तर अर्धा तासातच हाडे मोकळी होतात. किडकी दाढ किंवा दाताने बेजार झाल्यास दालचिनी तेल कापसात घेऊन दाढे खाली धरावे म्हणजे झटका बसून फटक्यात दात दुखीला आराम होतो. दालचिनी इतकिच महत्वाची जायपत्री! दुध, खवा, बासुंदी, खरवस, पुरण पोळी या सर्वच पदार्थांमध्ये जायफळाचा स्वाद हवाच असतो, पाचक असल्यामुळे जायफळ वापरण्याची पद्धत आहें. आणि सुवासिक सुद्धा आहे. त्याच प्रमाणे त्याची पाने तितकीच महत्वाची आहेत. (ती म्हणजे जायपत्री होय ) ताप. अपचन, कृशता यावर जायपत्रीचे चूर्ण मधातून घ्यावे. त्यामुळे खाल्लेले अंगी लागते. अशक्त मुलांना साखरेच्या बत्ताश्या बरोबर जायपत्रीचे तेल दोन, तीन थेंब टाकून द्यावे. थोड्याच दिवसात पचनशक्ती सुधारून मुलं सुदृढ दिसू लागते. केसांच्या तक्रारी, सांध्यांच्या तक्रारी यावर जायपत्रीचे तेल उपयुक्त ठरते. मसाल्यांच्या पदार्थांचे हे औषधीयुक्त गुणधर्म लक्षात घेऊन एरवीच्या आहारांत ही त्यांना स्थान द्यावे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu