सगळ्यांमधे असून सुद्धा
तू नसल्यासारखीच असतेस
मधेच इकडे तिकडे बघून
फक्त गालातल्या गालात हसतेससुख दुःख शांती अशांती
भाववाचक शब्दावली होती
आजपर्यंत मला फक्त
शांतता जाणवली होती
आज मात्र मी सगळ्यांना
शांती कशी आहे ते सांगू शकतो
ती बघा शांती म्हणून
तुझ्याकडे बोट दाखवू शकतोआसपास असता पाहिलय
विचारात गढलेली असतेस
जिला फक्त हासताच येतं
अशी एखादी भावली भासतेसतुला सागराची उपमा द्यावी
की सागराला तुझी उपमा द्यावी
मन नेहमी गोंधळात पडतं
शेवटी एकच कळतं फक्त
दोघांच्याही मनात काय आहे
देवालाच कळू शकतंतुझा उल्लेख करताना
सगळे तुझी स्तुती करतात
तिच्यासारखी मुलगी आधी
कधी पाहिलीच नाही म्हणतात
कोणी खूप चांगलं असलं
की आपल्याला भीती वाटते
कारण त्यांच्यासमोर आपली
नेहमीच शरणागती असतेतुझ्याबद्दल तशी कधी
मला भीती वाटत नाही
वाटतं ते फक्त कुतुहल
तुझ्या आजूबाजूला झाली
लोकांची कितीही चलबिचल
तू शांत राहू शकतेस
वेगळी अलिप्त राहून सगळ्यांची
गम्मत पाहू शकतेसअलिप्त शब्दाचा अर्थ
तुझ्यावरून शिकावा का?
की शांतीचा अर्थ शिकावा?
तू आहेस तशीच आहेस
की हा फक्त वरचा देखावा?खूप प्रश्न मला पडतात
कधी तरी येऊन छळतात
पण मी उत्तर शेधत नाही
प्रश्न अनुत्तरित जाऊ देतो
तुझ्याबद्दल माझ्या मनातलं
कुतुहल तसंच राहू देतो