** संचीत म्हणजे जन्मा पासून ते देहांता पावेतों आपण चांगली अथवा वाईट जेवढी कर्मे केलीत व त्यापासून चांगला अथवा वाईट जी संचय झाला त्या संचयास संचित किंवा सुकृत म्हणतात.
** क्रीयामान म्हणजे जन्मा पासून ते देहांतापावेतों आपण चांगले अथवा वाईट जे कर्म करतो.त्या क्रियेस क्रीयामान म्हणतात.
** प्रालब्ध म्हणजे जन्मापासूनतों देहांतापावेतों आपण जेवढे जे सुखदु:ख भोगतो. त्यास प्रालब्ध, प्राक्तन, दैव, भाग्य, ब्रम्हलिखित म्हणतात.
** ज्ञांनयज्ञ कसे जाणावे ?
सोहं ज्योर्तीब्रम्हाची प्राप्ती करण्यासाठी प्रत्येक नर-नारीं नी ”ज्ञांनयज्ञ” अवश्य करावा. ज्ञानयज्ञा वाचून जिवाला चिदसौख्यता, जीवनमुक्तता लाभणार नाही. त्यासाठी अंत:करण हि ‘भूमी’ जाणावी,पंचतत्व हाच ‘मंडप’ जाणावा, शम, दम हेच ‘कुंड’ जाणावे अज्ञांन हेच ‘धृत’ जाणावे. सूक्ष्म देहाची पंचवीस तत्वेहींच ‘यज्ञसामग्री’ जाणावी. ज्ञान हाच ‘ज्ञांनाग्नि’ जाणावा. जीव हा ‘यजमान’ जाणावा. श्रद्धाहींच ‘यजमानीण’ जाणावी. सद्गुरू हांच ‘ब्राम्हण’ जाणावा. विवेक हेंच ‘आसन’ जाणावे. मोक्षेच्छा व शांती हेच ‘हवनीय कुंड’ जाणा.ज्ञान बोध जाणणे !
बुद्धीचा आत्म्याशी निरंतरचा योग आहे हे ओळखणे त्याला बुद्धी योग आणि त्याच्यासाठी सर्वस्वाची आहुती करावी लागते. त्याला ज्ञानयज्ञ”असे म्हणतात. ” कोणाशीच नाही बंधन । भ्रांतीसत्व भुलले जन” (दासबोध) भ्रांतीला कारण संमोह, संमोहाला कारण क्रोध, क्रोधाला कारण काम आणि कामाला कारण संग आहे.अशी जगाला आदीकारण जी अहंवृत्ती किंवा प्रकृती तिच्या संगाने काम उत्पन्न होतो.कामाने प्राण्याची उत्पत्ती होऊन तो काम पुन्हा त्या उत्पन्न झालेल्या प्राण्यात संच्यार करून उत्पत्ती करवितो. अश्या रीतीने कामाने उत्पत्ती आणि उत्पत्तीने काम असा हा सृष्टी क्रम चालूच आहे. तो अपरिहार्य आहे.त्याची आहुती ज्ञानाग्नित देने.हा आत्मशुध्दर्थ “ज्ञानयज्ञ” होय. मनुष्य उपजतांच मुक्त असला तरी अनेक जन्मांच्या संस्काराने झालेली भ्रांती गेल्यावाचून मोक्ष लाभ नाही. म्हणून आत्मबोधार्थ ज्ञानयज्ञां ची योजना आहे. दान, त्याग, पूजन, हवन, संगतीकरण, अपर्ण, उपासना, ईत्यादी यज्ञ शब्दाचे पुष्कळसे अर्थ असून यज्ञ हि पुष्कळ प्रकारचे आहेत. सांगायचे झाले तर जन्मल्या पासून मरेपर्यंत श्वासोच्छवासादी यच्चयावत व्यवहार आणि अखिल विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय हे सर्व यज्ञ च होय. अश्या प्रकारच्या अव्हाहत चाललेल्या ज्ञांनांतूनच हि औटहातांची वामन मूर्ती यज्ञांकरताच उदयाला आली असल्यामुळेहीं औटहात काया ‘यज्ञमूर्ती’ आहे. आणि आपण अहोरात्र यज्ञ करीत बसलो आहोत. यज्ञ हाच भवपाश आहे. आणि यज्ञोपासनेणेंच तो तोडावयाचां आहे. काट्यानेच काटा काढायचा आहे. जसे समुद्राच्या आश्रयानेच समुद्र पार केला जातो.भ्रमाच्या आश्रयावरच हें भवचक्र चालू आहे. तें सोहंब्रम्हज्ञानानें घालवावयाचे आहे.आणि’ब्रम्हज्ञान’ हाच ‘ज्ञानयज्ञ’ होय.
Read Marathi Article based on Pralabdha Kriyaman Sanchit, Meaning of “KRIYAMAN KARM (क्रियमाण कर्म)” in English.