आपल्या आत्माची आवाज ऎका त्याचा आदर करा !
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Listen your soul and respect your soul : tobacco injurious to health, The health effects of tobacco are the circumstances, mechanisms, and factors of tobacco consumption on human health. Tobacco Is Injurious to Health.

            आपल्या आत्माची आवाज ऎका त्याचा आदर करा !

 प्रत्येक व्यक्तीचे चांगल्या वाईट सवयी याबाबत आत्म्यातून आवाज येत असते. त्याकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करुन मनमानी करीत असतो.त्याचा परिणाम नेहमीच वाईट होतो,नंतर पश्च्याताप करतो. तंबाखू सेवनाने किती तरी भयानक बिमाऱ्या होतात हे प्रत्येकालाच माहिती आहे. या दुर्व्यसनाने व्यक्तीला त्याचे जीवन बरबाद होणार हे सुचित होऊनही व्यक्ती तंबाखूचे व्यसन सोडायला अजिबात तयार नसतो. त्यात तो लाचारी मानतो.

The health effects of tobacco are the circumstances, mechanisms, and factors of tobacco consumption on human health. Epidemiological research has been  तंबाखू एक भयानक विष !

 संपूर्ण विश्वात व्यसनाने प्रतिवर्ष ४० लाख  लोकांना मृत्यू येतो. त्यापैकी १० लाख आपले भारतीय तंबाखुच्या व्यसनाचे शिकार  असतात. या तंबाखू मध्ये कोलतार, आर्सेनिक, अमोनिया, फिनाईल एसीटोन, डी.डी.टी., ब्युटेल, हाईड्रोजनसाईनाइड, नेप्स्थालीन, केडमियम,कार्बनमोनोआक्साईड इ. घातक विषाचे पर्यायी पदार्थ आहेंत. हे विष व्यक्तीला जर्जर बनवून निर्जीव करतात. बर्याचदा जास्तीत जास्त प्रमाणात कर्करोग याच सेवनाने झाल्याचे आढळते. तसेच क्षयरोग, दमा, ब्रांकाइटिस (तेज खासीं) लखवा, रक्तचाप,हृदयरोग या बिमाऱ्या तंबाखू सेवणानेच होतात. तसेच नाक, कान, हृद्य, फेफडे, गुदा, तोंड, जीभ, दात, मसुडे, कोथा यांत होणारा कर्क रोग बहुतांश याच कारणाने होतो. म्हणूनच डॉ. पहिला प्रश्न हाच असतो की तंबाखू, खर्रा,पान वै, खात असता कां ?

व्यक्तित्वाला  विकृत करतो- तंबाखू!

 ईश्वरा कडून अनेक गुणांनि संपन्न प्रत्येक व्यक्तीला अनमोल व्यक्तित्व प्रकृती मिळालेली असते. त्या प्रकृतीला आत्मिक,बौद्धिक आणि भौतिक स्वरूपाने संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहें. त्या प्रकृतीला मनमोहक, सुरक्षित बनवून ठेवलेच पाहिजे. सर्व दुर्गुनां पासून जपले पाहिजे, कुठल्याही व्यसनी प्रवृत्ती व्यक्तीचा लोभ किंवा प्रेम कोणालाही नसतो, त्यापासून येणारी र्दुगंधी, त्याचे घाणेरडे स्वरूप, कुणीही पसंत करून घेत नाही. त्यापासून दूर राहण्याचाच प्रयत्न करतात. त्याचा प्रत्येक क्षणाला अपमान होत असतो, त्यांच्या संगतीत राहणाऱ्या व्यक्तीला सुद्धा बऱ्याच वेळा अपमान सहन करावा लागतो. व्यसनी व्यक्तीला सदाचारी व्यक्ती आपल्या सदनात प्रवेश सुद्धा देण्यास नाकारतात. कारण त्यात त्यालाही अपमान व कमीपणाचा आभास होत असतो. एवढे सर्व लक्षात घेऊनही व्यसनी व्यक्ती व्यसन सोडायला तयार नसतात.

Awareness campaigns tell you that tobacco consumption is a health hazardअमानवता प्रगट करतो- तंबाखू !

कितीतरी सुंदर वस्तू उपलब्ध असतात सेवन करण्यास पण आश्चर्य आहें की त्याकडे मनुष्याचे लक्ष न जाता या सर्व गलिच्छ वस्तुं  कडेच कां लक्ष जातें मनुष्याचे? सर्व धर्मग्रंथांत किंवा महापुरुषांनी या गोष्टी वर्जित केलेल्या आहें. कारण या मानवताच्या  गुणपतनाचे काम करतात. या पासून मानवाने स्वत:चा बचाव करायलाच पाहिजे! कारण या सर्व गोष्टी मानवतेतून उठवतात. तंबाखू जीवनात स्थान बनविते त्याचा परिणामस्वरूप म्हणजे क्रोध, क्रूरता, अधीरता, कायरता, निराशा, हे नकारात्मक भाव आणि विध्वंसक विचार त्याच्या जीवनात स्थान बनवितात. त्यापासून अकारण तुच्छ प्रवृत्ती, आळस, अकर्मण्यता असे विकार जडतात.

हे विकार मनुष्याला मानवतेतून बाहेर फेकतात.

तंबाखू व्यसन कानुनी अपराध !

प्राचीन काळापासून  ( तीनशे वर्षापासून )  तंबाखू व्यसनापासून मानवाला सचेत केले गेले आहे. तरी हे व्यसन कमी न होता विस्तारित होत आहें,जन जागृती शिवाय वेळे वेळेला कानुनी उपाय सुद्धा होत असतात, सिगरेट तंबाखू उत्पाद विज्ञापणाला निषेध करण्यात आलेले आहेत, व्यापार-वाणिज्य उत्पादन प्रदाय वितरण विनिमय अधिनियम लागू केल्या गेलेले आहेंत, तसेच सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान प्रतिबंध लावण्यातही आले होते. आणि १८ वर्षे कमी आयु करीता तंबाखू अथवा तंबाखू युक्त वस्तू- बिडी सिगरेट -गुटका-खर्रा यावर विक्रय प्रतिबंध झालेत, विज्ञापनांना प्रतिबंध करण्यात आले, याचे उल्लंघन करणारयास  कारावास किंवा दण्डनिय अपराध लावण्यात आलें आणि अर्थदंड देण्यात आलें. पण हि भूमिका सीमित असल्या कारणाने जन-जागृती अधिक प्रभावित होते.

तंबाखू व्यसनातून मुक्तता

तंबाखूचे अधिकांश व्यसनी जाणतात कि हे व्यसन अयोग्य आहे. तरी व्यसन याकरिता सोडत नाही, की त्यांनी मन-मस्तीष्कात ठामपणे बसवून ठेवले आहें कि हे संभव नाही. पण असे कित्येक उदाहरण बघण्यात येतांत कि कत्येक वर्षांपासून यांचे व्यसनी असलेले व्यक्ती आपल्या द्रुढसंकल्पनाने एका क्षणात त्यांनी हे व्यसन सोडलेले. तेव्हा लक्षात येते कि यां व्यसनात दडलेले दुर्गुण किंवा विकार आपल्या आरोग्याला किती भयावह आहेंत याचा मनात बोध होणे अतिमहत्वाचे आहे.फार गंभीरतेने मनातून संकल्प झाल्यास व्यसन सुटायला काही क्षण सुद्धा लागणार नाही. काही व्यसनी म्हणतात कि ऎकाएक व्यसन सोडल्यास प्रकृतीवर आणि शरीरावर परिणाम होतात. पण हा भ्रम फार चुकीचा आहे. त्यांनी मनातून गंभीररित्या संकल्प केल्यास त्याचा शरीरावर काही सुद्धा परिणाम होत नाही. या व्यसनातून मुक्ती आवश्यक आहें.

सर्वांचीच समस्या — सर्वांनी प्रयत्न करा !

हि समस्या फक्त व्यसनाधीन आहेंत त्यांचीच नसून त्यां पासून होणाऱ्या दुष्परीनामाने सर्वत्र मानवांना हानी पोचत आहें.जे मानव  या व्यसनाच्या दूर आहेत, पण व्यसनाधीन असणार्या व्यक्तींच्या तंबाखुच्या वासाने अथवा बिडी-सिगारेट च्या धुराने किंवा घाणीने (गंदगिने) ते सदाचारी व्यक्ती त्रस्त आहेत. व्यसनाधीन व्यक्तींच्या प्रदुषणाने गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत, ज्या ठिकाणी आरोग्य सुधारण्या करीता मनुष्य जातो त्या आरोग्य केंद्रांत या घाणीचेच साम्राज्य बघण्यास मिळतात. ऑफिसच्या बाहेर जिन्यांच्या कानाकोपऱ्यात, रस्त्यात याच घाणीचे प्रदर्शन होत असतात. यांपासून सर्व जनमानसास सहन करावा लागणारा त्रास आणि यापासून होणारे प्रदुषण हि एक गंभीर समस्या आहे. हे सर्व विचार करण्या सारखे आहे.तेव्हा हि समस्या सर्वांचीच आहे. तेव्हा सर्व व्यसनाधीन लोकांनी एकांतात बसून यावर विचारपूर्वक चिंतन, मनन करून आत्मबळ प्राप्त करावयास हवे. तेव्हा त्यांच्या आत्म्यातून येणारी आवाज त्यांनी ऐकायला हवी, त्याचा आदर करावयास हवा. आणि दृढ संकल्प करायला हवा. धार्मिक असता बाळगून जे आपले जेष्ठ मार्गदर्शक, शुभचिंतक आहेत,ईष्ट आहेत त्यांच्या समक्ष आजीवन सर्व व्यसन सोडण्याचे संकल्प करावेत. यामुळे तुमच्या मागुन येणारी संतान, दुसरी पिढी कोणत्याही व्यसनांच्या आधिन होणार नाही. आपल्या आत्म्यातून येणारी आवाज आचरणात आणायला हवी. आपने जीवन सुस्वच्छ, सुंदर बनवून आदर्श नागरिक बना.

Like
Like Love Haha Wow Sad Angry  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu