गीतेतील भगवंताचि नावें म्हणजे गुणवाचक, कर्तव्य वाचक आहेत. जसे कृष्ण हे नाव व्यक्तीवाचक किंवा संज्ञांवाचक नाही. कृष्ण हे नाव सावळा किंवा श्यामर्वण अर्थाने नाही. भगवंत जोर्तीस्वरूप, सूर्याप्रमाणे तेजस्वी (आदित्यर्वण), तेजपुंज, तेजम आहे.त्याचा विचार किंवा आठवण कर्ताना दिव्य दृष्टीद्वारे पाहावे लागेल. असाच भाव मनात आणून बघावे. आकर्षणमूर्त, आनंदस्वरूप, ज्योर्तीबिंदू, परमात्म्याचे गुणवाचक, कर्तव्यवाचक हाच अर्थ घरून कृष्ण हे नाव संबोधतात. गीतेत भगवंताना अनेक नावाने संबोधन्यात आलेले आहे. जनतेची प्रार्थना स्वीकारणारा जर्नादन ब्रम्हा, विष्णू, शंकर याचे स्वरूपातून कर्तव्यकरणारा केशव, तेजपुंज असा कृष्ण, श्याम, सावळा जर्नादन, केशव, ऋषकेश, अच्चुत, गोविंद हि सर्व व्यक्तिवाचक नावें नाहीत गुणवाचक, किंवा कर्त्यव्यवाचक समजावेत(सोचावेत )
अर्जुन :
अंनघ, परंतप, गुडाकेश हि नावे अर्जुनाची आहेत. जसे निष्पाप अर्थाने अनघ , निद्राजित या अर्थाने ( निद्रेला जिंकणारा ) गुडाकेश, योगरूप -तप करणारा – परंतप, पवित्रता- सुखाच्या प्राप्ती करीतातसेच पुरुषार्थ या अर्थाने भारत या नावांने अर्जुनाचा उल्लेख करतात. हि सर्व नावें व्यक्तिवाचक किंवा संज्ञावाचक नाहीत, पवित्रतेच्या अर्थाने अर्जुन हा ब्रम्ह्या चा उल्लेख करण्या करीता संबोधतात.गीता ज्ञान हे ब्रह्म याच्या माध्यमातून देण्यात आले म्हणून ब्रम्हयाला ज्ञानियान मध्ये श्रेष्ठ आदिपिता, जगतपिता मानतात.
(अर्जुनाचा) रथ :
रथ: (शरीर) ज्याला नाक, कान, डोळा, त्वचा हे घोड्याच्या रुपात मानून त्या रथाचे लगाम म्हणजे बुद्धी (मन) होय ते लगाम भगवंतां- च्या स्वाधीन करावयाचे आहें. एकाच रथात दोन स्वार मनून सारथी म्हणजे भगवंत आणि मानवी आत्मा म्हणजे अर्जुन होय. ज्योर्तीरमयस्वरूपी परमात्म्याने प्रविष्ठ होऊन कृष्णमुखातून हे गीता ज्ञान एकट्या अर्जुनालाच नव्हे तर आपणा सर्व प्राणीमात्रांना देहरुपी रथ चालविण्या करीता दिलेले आहे. (आता सुरु असलेल्या कलीयुगातील समस्यांना जाणून) हे सर्व समजाविले आहे. आजचे हे महा भयानक कलियुग, स्त्रियांवरील अत्याच्यार, तसेच जुगारी, मध्यपान आजचे आहार, व्यवहार, आचारविचाराने भ्रष्ट होत असलेली विलक्षण परिस्थिती लक्षात घ्यायला हवी.