कोणतीही व्यक्ती चांगले किंवा वाईट चरित्र घेऊन जन्माला येत नसतो. मात्र चांगले-वाईट चारित्र्य घेऊन मरू शकतो. प्रत्येक मुल हे पवित्र असते. मात्र अयोग्य परवरीश त्याचे चरित्र् दुषित करते. चरित्र म्हणजे एक जळती मशाल होय. त्याच्या तेज प्रकाशाने अनेकांना प्रेरणा मिळत असते. मनुष्य आपल्या चारीत्र्या वरूनच ओळखल्या जातो. चारीत्र्याचे गुण बीजच आपल्या अंत:करणात रोवल्या जाते. नंतर तेच गुण मनुष्याचा विकास व व्यक्तित्व निर्माण करतात. त्या बीजात स्वास्थ्य असेल तरच मनुष्य सुदृढपणे विकसित होऊ शकतो. मात्र बीज कीड लागलेले असेल तर मनुष्य कमजोर व दुर्गुणी बनू शकतो. बाहेरच्या साज सिंगार वरून आपले चारित्र्याचे दर्शन घडवून दिशाभूल करणाऱ्या चारित्र्यात टिकाऊपणा नसतो. व्यक्तीच्या आत्मअनुशासन, ज्ञान, गुण, विश्वनीयता, लक्ष, त्याच्या मनाची पवित्रता तसेच आवडी-निवडी वरूनच त्याच्या चारित्र्याची परख होत असते.
चारित्र्याबद्दल मानवाच्या मनात अनेक धारणा घर करून आहेत. स्त्री-पुरुष संबंधाविषयी सुद्धा समावेश आहेत. पण चारित्र्य हे ईतक्या छोट्या गोष्टी घेऊन चालत नाही. मनुष्य कधी कधी बाहेरून स्व्च्छ आचरण दाखवून अंर्त: मनात वासनामयी राहतो त्यालाही चारित्र्यवान समजल्याची भूल करीत असतो. चारित्र्य हे सर्व गुणांची कसोटी आहे. कुठल्याही कार्यात संपूर्ण: देऊन आपले पृथ्वीलक्ष गाठणे. सर्वांना समसमान मानून कार्य साध्य करणे. असुविधांत अडकून अर्धवट कार्य करणे हे चारितत्र्यास धक्का पोचवण्याचेच लक्षण होय. जो आपल्या स्व्च्छ चारित्र्याच्या कसोटीत खरा उतरतो. तोच चारित्र्यवाण समजला जातो.