वाताचं लक्षण




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

 is a form of joint disorder that involves inflammation of one or more joints.खर तर प्रकृतीचा विचार दैनंदिनी जीवनात आपण कळतनकळत करीत असतोच पण हा विचार तर्क  विचार आहे. प्रकृतीनिदान त्या नुसार आहार आणि दिनचर्या यांच आरोग्य रक्षणासाठी इतक महत्व आहे. प्रकृती ओळख, ‘शरीराचर शाषण यंत्रणा’ हे सर्व माहित असणं म्ह्त्वाचच. शरीराचं संरक्षण करणं, त्यातले बिघाड दुरुस्त करण, घटणार सामर्थ वाढविण,हे सगळ दोषांच काम. शरीराच संतुलन बिघडायला लागल की दोष इशारा देतात. त्यांचा मान राखला नाही तर आजार उद्भवतो. उदा. सर्दी पडसं आल असताना कफाच्या थंड गुणावर उष्ण गुणाचा वापर सहज सुचतो. पण त्यांकडे दुर्लक्ष केल तर तोल आणखीच ढळतो. स्विकारलं तर समतोल साधून शरीर पूर्व स्थितीत आणता येत. त्रिदोषांची शाषण यंत्रणा काही वैशिष्टे जन्मत: घेऊन येते. ती आई-वडिलांकडून मिळालेल्या बेगमिवर आणि आईच्या गर्भात वाढ होताना जे घटक मिळतात त्यावर अवलंबून असते. जन्मत: शरीरात एखाद्या दोषाच प्राबल्य असतं. म्हणून त्याचा प्रभाव शरीरावर अधिक दिसतो. आणि आहारविहारादी कारणांनी तो दोष वाढत गेला तर शरीराचा समतोल लवकर ढळू शकतो. त्या त्या दोषांच्या अतिशक्तीचे दुष्परिणाम त्यांच्या स्वत:च्या सत्ता केंद्रामध्ये प्रथम दिसू लागतात. म्हणून विविक्षित दोष वाढला तर त्या त्या दोषाची केंद्रस्थाने आधी लक्षण दाखवितात. म्हणून शरीरात असलेले दोष प्राबल्य ओळखता येण्याची पद्धती म्हणजेप्रकृती परीक्षण प्रकृती कळली कि शरीरातील दुबळे घटक आधीच ओळखता येतात आणि जेवनखाण, झोप,व्यायाम हे दैनंदिन जीवनाशी संबंधीत असलेले कार्य ओळखून आपल्या नैसर्गिक वैशिष्ठ्याशी जुळवता घेता येतं. व दुबळ्या घटकांवर उपाय करता येतात.म्हणून स्वत:च्या प्रकृती ओळखण हे तितकच महत्वाच.

आता बघू वात प्रकृती लक्षण.

वात प्रकृतीची व्यक्ती कृश व रुक्ष अशाप्रकारची असते. तिचे केसं, नख, दात, हात, पाय व तोंड हे खरखरीत व रखरखीत असतात. हाता-पायांच्या त्वचेला भेगा पडलेल्या असतात. त्यांच्या हाता-पायांवरी शिरा फुगलेल्या दिसतात,केस कमी व राठ असतात. वात प्रकृतीच्या माणसाला कधी जड अन्न भरपूर जेउन्हि पचतं, तर कधी कधी हलका व थोडा आहार सुद्धा अपचन करतो. मलाचे खडे घरतात व शौचास साफ होत नाही. खडा होण्याची व पटात वात धरण्याची प्रवृत्ती असते. या व्यक्तिम कडून शक्तींची कामे फार होत नाही. परंतु चालण, काम करण, बोलण इ. बाबतीत चलाखपणा असतो. ब्ल्ताना अडखळण्याची सवय असते. या व्यक्तींचा स्वर रुक्ष व कर्कश असा असतो. त्यांच्या चालताना गूडघ्यात कटकट असा आवाज होतो. त्यांची स्मरणशक्ती कमी असते. पण विषय चटकन समजून घेण्याची कुवत असते. बुद्धी चंचल व स्वभाव मत्सरी असतो. शिष्टाचार कमी असतात. उपकाराची जाणीव नसते. हिंसक वृत्तीही मधून मधून डोकावते. झोप कमी असते व झोपेत कधी कधी दात खाण्याची सवय असते. बर्याचदा झोपेतही डोळे उघडे राहतात. त्यांची स्वप्न सहसा आकाशात भ्रमण करत असल्याची,डोंगरमाथा चढण्याची अशी असतात. यांना मित्र कमी असतात मैत्री दृढ नसते. अंगाला तेल लावणे व उष्ण पदार्थ यांची आवड असते. थंड पदार्थ व थंडस्पर्श नको असते.

आता बघू या वात वाढण्याची कारण.

वात दोषात “वात दोष”  हा शासक नीट काम करीत नसतो. म्हणजे आधुनिक परिभाषेत “फंक्श्नल डेफिशियन्शी”  म्हणायला हरकत नाही. पण असर्वसाधारणपणे ‘दोष’ हा वाढल्यावर अपाय करतो. वात दोष वाढण  म्हणजे शरीरातील काही क्रियांची शक्ती कमी होण. वाताच्या सुरळीत कामात बाधा आणणार सर्वात म्हत्वाच कारण म्हणजे अग्नी मधील बिघाड. अतिरुक्ष लाह्यांसारखे पदार्थ सतत खाल्ल्याने, अति तुरट, अति तिखट, अति कडु पदार्थांनी वात बिघडतो. जागरण,अतिव्यायाम,उपासाचा अतिरेक, मनाचा क्षोभ, अति चिंता, भीती, मानसिक व शारीरिक आघात  हे सर्वच वाताच्या कार्यात बाधा आणतात. यांमुळे जी लक्षण तयार होतात त्यांनाच वात म्हटल्या गेले आहे. या प्रकृतीत जिथे त्याच्या कार्याची आवश्यकता ती दुबळी असतात. त्यामुळे आहारविहार यातील थोड्या फरकाने लहानसहान कारणाने त्याची कामे बिघडतात. आणि त्रास दायक लक्षणे दिसू लागतात.पक्वाशय, मलाषय, कंबर, मांड्या, कान, हाडे, स्पर्शेंद्रीये या वाताच्या नियंत्रणाखालील संस्था यांचे काम बिघडतात !

पक्वाशयाच्या अयोग्य कामा मुळे अगदी जन्मल्यापासून या व्यक्तींना मळाचे खडे होण, अंग रुक्ष असण, अशा तक्रारी असतात. पोट फुगण,पोटात गुर्गुर्नं,, अनियमित मल प्रवृत्ती , कंबर दुखणी, थोड्याच श्रमाने मांड्या दुखणी, कानाला थंडी, वारा सहन न होण,नखे कोरडी रुक्ष दिसणं, सांधे वाजण, सांधे धरणं, सांधे दुखनं, हवाबदलाने हाता-पायांना कात्रे पडण, केसात कोंडा होण असेही विकार दिसतात. पण वात प्रवृत्तीच्या व्यक्तीत वरील सर्वच लक्षण असणे असे नाही. असे असले तर फारच त्रास होईल. सर्वसाधारण एक दोष प्रधान वात प्रवृत्तीही सदा आतुर म्हणजे रोगट प्रकृतीची असते. वात दोषाच काम नैसर्गिकरित्याहि बिघडू शकते. पहाटेची, सायं-  काळची वेळ, असेच ग्रीष्म, वर्षा ऋतूत वात दोष ‘शासक’ म्हणून कमी परिणाम कारक असतो. तसेच वार्धक्यात त्याची कार्यक्षमता कमी कमी होत जाते. आणि त्यामुळे वात बिघडण्याची लक्षणे दिसू लागतात. म्हातारपणी ज्यां ज्या समस्या दिसतात त्या वात प्रकृतीची लक्षण म्हणायला हरकत नाही.

Note: Arthritis is a form of joint disorder that involves inflammation of one or more joints. Arthritis affects the musculoskeletal system, specifically the joints. Arthritis is the main cause of disability among people aged 55+ years in industrialized. If you feel pain and stiffness in your body or have trouble moving around, you might have arthritis. Most kinds of arthritis cause pain and swelling in your joints.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, , , , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu