अध्यात्मिक काशी

Like Like Love Haha Wow Sad Angry जेव्हा साधकाची चित्तवृत्ती शुद्ध शांत आणि निस्वार्थ होऊन आपल्या अध्यात्मिक अभ्यासाद्वारे हृदयात स्थित...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

जेव्हा साधकाची चित्तवृत्ती शुद्ध शांत आणि निस्वार्थ होऊन आपल्या अध्यात्मिक अभ्यासाद्वारे हृदयात स्थित असलेल्या प्रज्ञांकेंद्रात लिन होते. त्या अवस्थेला काशीप्राप्ती म्हटल्या गेले आहें. ही अवस्था म्हणजे परमपद होय. ह्यात असली आनंदाचा अनुभव होत असतो. ह्याकरीता काशी क्षेत्रास आनंदवन म्हणतात. या काशीत महाश्मशानची स्थिती (जेथे शिवाचा वास असतो) चे कारण हे आहे की तेथे शिवाच्या तेज विकाराने दग्ध होऊन अनात्मरूप उपाधींतून मनुष्यास मुक्ती मिळते आणि तेथेच संपूर्ण अहंकार मिटतो.

गौरीमुखाचे तात्पर्य म्हणजे काशीप्राप्तीची आवस्था, म्हणजेच साधक दैवीज्योती आणि बोधशक्तीत प्रगट होऊन त्याचा अध्यात्मिक दिव्यचक्षु श्रीशिवा द्वारे खुलतो, तो त्रिलोकाच्या पार उतरून गौरी अर्थात विद्यादेवीच्या प्रत्यक्ष दर्शनास समर्थ होतो. त्याच्या चित्ताच्या तीन अवस्था म्हणजे जाग्रत-अवस्था, श्रवणअवस्था, स्वर्गलोक अवस्था जागृत होतात, काशी त्याच्याही  परे आहे त्यालाभाने मुक्ती प्राप्त होते. तेव्हाच शिव आपले तारक-मंत्र प्रदान करतात असे म्हटले आहे. जेव्हा साधकाचे हृद्य काशीरूपांत (कारण देहात) स्थित होते तेव्हा शिव प्रभू पासून मिळणारऱ्या तारक-मंत्र प्रभावाने मनुष्य निरंतर तुरीय अवस्थेत पोचतो. शिवाच्या त्रिशुलाचे महत्व म्हणजे त्रितापातून मुक्ती प्राप्त करून तुरीय अवस्थेत पोचविणे आहे. अशा साधकास त्रिशुलधारी साधक म्हणतात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories