ताकातला पालक




Like
Like Love Haha Wow Sad Angry

A healthy curry made with spinach and yogurt. This can be had as a soup or over white rice or chappatti. this amazing preparation will be quite unlike anything you have tasted so far!

spinach curd curryसाहित्य -: पाव किलो कोवळा पालक, दीड ते दोन वाट्या आंबट ताक, प्रत्यकी दोन चमचे बेसन, तासभर भिजत ठेवलेली चनाडाळ, व थोडे भाजून घेतलेले साल काढलेले शेंगदाने, सुक्या खोबर्याचे दहा लांबट तुकडे, दोन हिरव्या मिरच्या, किंचित तिखट, चवी नुसार मीठ, थोडी साखर, सात लसून पाकळ्या, हिंग, मेथी दाणा, हळद, कढीपत्ता, एक ते दोन लाल सुकी मिरची .

कृती -: पालक निवडून स्व्च्छ करून त्याची पाने जास्त पाण्यात थोडावेळ भिजत ठेवा. व दो पाण्याने परत धुवून घ्या. हिरवी मिरचीव पालक बारीक चिरून मिर्चीश कुकर मध्ये शीजवून घ्या. थंड होऊ द्या ताकात चवी नुसार तिखट, साखर, बेसन, मीठ घालून छान घुसळून घ्या. उकडलेला पालक हातानेच चांगला कुस्करून त्या ताकात मिसळा नंतर भांड्यात ते उकळनिला ठेवा.  नंतर त्यात थोडी भिजलेली चना डाळ, दाणे,व खोबऱ्याचे  तुकडे घालून मन्दाग्निवर शिजू द्यावे. ढवळत रहा. झाल्यांनतर तेलाची फोडणी करून त्यात सर्व म्हणजे मोहरी, मेथी दाणा, कढीपत्ता, हिंग, लाल सुकी मिरची घालून फोडणी त्यात वरून टाका. व झाकून ठेवा.

टीप–  आवडत असल्यास भाजीत थोडे काजुचे तुकडे, पिकलेले पण साधारण कडक केळाचे तुकडे घालू शकतो. ताका ऐवजी चिंचेचा कोळ ,व गुळ  घालूनही हि भाजी बनू शकते.

Spinatch Curd Curry, Read full recipes of Spinatch Curd Curry, get the detailed recipes information here, ingredients requited for this recipes. details about calories, proteins etc.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu