आई हे अखिल जीवसृष्टीचे उत्कट आदीतत्व आहे




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Mothers day special, for mother, Love for mother., Mother is a symbol of love and most important part of life, mother sacrifice everything for her child. she loves her children and care them. we all need to respect our mother.

mother day speciual, article on mothers day, essay on mothers day

 

आई हे अखिल जीवसृष्टीचे उत्कट आदीतत्व आहे. वेदनेच्या देठावर फुलणारे सर्जनाचे चिरंतन फुल म्हणजे ‘ आई ‘मानवी जीवनातल्या सर्वच कलाविष्कारातल्या अभिव्यक्त झालेलं हे तत्व विश्वाला व्यापून उरलेलं. ज्याच्या अभिव्यक्तीसाठी सर्व वैश्विक परिणामे अपुरी पडावीत; असं हे सत्व, स्वत्व आणि शाश्वत आदित्त्व रक्तातून वाहणार्या चिरंतन उर्जे सारखं आई हे जीवनसत्व प्रभावित होत असतं. आई या महन्मंगल वैश्विक मूल्यावर, तिच्या मातृत्वावर, वात्सल्यावर, प्रेमावर, सर्जनावर, त्यागावर, बलीदानावर, आणि तिच्या उदात्त जीवनमुल्यावर, जगातील सार्याच लेखकांनी उत्कटून लिहिले आणि पुढेही लिहिले जाणार, तरी “आई” हे कधीही न संपणाऱ्या कहाणीचं हे कथानक असेल. कधीही न थांबणाऱ्या कवितेची ती लय असेल, कधीही न विरघळनाऱ्या स्वरांच आरोहण असेल, ती नित्यच अशी राहणार आहे.

(केतन पिंपळापुरे – मदर्स डे निमित्त )

श्रद्धा म्हणुनी जपतो मी अंतरात आई !
मजला खरेच काशी, काबा घरात आई !.  विविधांगी नात्यांचे स्पंदन उलगडणारी कविवर्य नजीम खान यांची ”आई ” हि कविता चालीत म्हणायला नितांत सुंदर आहे. मात्र डोळाभर झालेली आसवं ममत्वाने ओंजळभर झाली म्हणजे पुसता पुसत नाही. पुढे गालावर प्रतिबिंबित झालेली आसवं जन्मभर आईच्या आठवणी सारखीच पुरतात. या आसवांत माय उतुंगतेचे शिखर झालेले असते.

देतो उजेड रात्री तो चंद्र काय आहे,
कि शब्द ठेवलेला हा अंबरात आई,
येता फुलात काळ्या मातीतली पऱ्हांटी,
वाटे उभीच आहे हि वावरात आई,

दारिद्र्य चिरंतन करणार्या समाज रचनेत वावरताना मला किंबहुना माझ्यासारख्या इतरांना आठवते, कळल्या वयापासुनचे  भयभीत करणारे बालवयातील दिवस जेष्ठ कवी डॉ यशवंत मनोहर म्हणतात.  भुकेने घर डोक्यावर घेऊन, आई माझी वावरात जायची, दिवसभर मातीचा प्रकाश खुडायची, पाटीभर श्वास घेऊन घरी यायची, आईने मला अन्ना एवजी निखारेच चारले. ती उभी आहे मरणाच्या मढ्यावर.  मी मात्र तिच्याच कष्टाची कविता आहे.? प्रात्कनाचे दवभरले धुके पालवून क्रूर झालेली भूक जेव्हा मायेचे काळीज कातावून सोडते, तेव्हा माय सैरभैर होते. ती तमाम सृष्टीचैतन्यातील कोणत्याही प्रवर्गातील ‘माय’ असो, तिची आपल्या पिलांप्रती आसक्ती स्तंभित पाषाणालाहीपाझर फोडते. जणू आपसूक दुरावलेल्या पिलांची चोच पुन्हा पुन्हा “आई” कडे वळते .

श्रोते रडून गेले रे मैफलीत माझ्या
मी गीत गात होतो, आली सुरात आई
हे दृश्य श्रेष्ठ आहे साऱ्या जगात मित्रा
येते दिसून जेव्हा ही अंबरात आई
आली मलाच नाही हिस्स्यात मालमत्ता

श्रीमंत मी तरीही आहे घरात आई आपली पुरुष संस्कृती असली तरीही ती मायेचे आदीबंध अबाधित राखते. ममत्वाचे परिपोषण करते. भुकेपोटी काळ्या मातीत
‘मायेला’हि दिवसभर बापाबरोबर उन्हातान्हात  राबावे लागते.मायच्या पायात रुतलेल्या सनातन काट्याचे रक्त गोठले लाल ‘कुरूप’ अवशेष स्वप्नातही दचकून जागे करतात  रात्रीचा काळाकभिन्न काळोख अंधार पायवाटेने उश्यालगत येउन उभा राहतो, अश्या वेळी सुद्धा कवी दीपक रंगारी यांच्या या ओळी मनाचं सात्वन करताना म्हणतात — किती चालतात लोक झाला मातीचा रे गाळ , सार्या घरांना छप्पर. तरी एकच आभाळ.

स्मुतीसदृष्य मायेचे विश्वरूप डोळे आकाश्यातून काजव्यागत आपल्याला न्याहाळतात,  आई विषयी सार्वत्रिक भावनेने ओतप्रोत आशय असलेली प्रस्तुत कविता अंतिम वळणावर स्वर्गाचा प्रमाण नकाशा साकारताना स्मरतात जेष्ठ कवी सर्जेराव चव्हाण यांच्या आशयघन ओळी .

तिचा फाटका पदर, माझा आकाश पाळणा
तिच्या स्वप्नाचीच ओंजळ , माझ्या डोळ्यात मावेना
तिचे पोळलेले पाय, तळ हातावरील फोड
माय सोडवीत होती, मीठ भाकरीचं कोड

( सत्य कुटे,-  चिखली. मदर्स डे -निमित्त )

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu