“एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही.कॅलिडोस्कोप पाहिलेला नाही. सर्कसमधला जोकर आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला बाळपणीचा काळ सुखाचा स्वत:बरोबर कधी नेला ते आपल्याचा कळलंच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत. दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही. विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत. प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही…… त्या उडणार्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजून उडू शकते. आपण जमिनीवरच आहोत.”
वपुंच्या वपूर्झा मधील ह्या ओळी वाचल्या अन् मन भुर्रकन काही वर्षे मागे गेलं…आणि सारं सारं बालपण आठवलं.
लाटेने कि काळाने नेला तो किनार्यावरचा वाळूचा किल्ला?
भोवर्याच्या रश्शीला लावलेला कोल्डड्रिंकच्या झाकणाचा बिल्ला…
हरवली कुठे तरी ती शाळेतली मुल्यशिक्षणाची वही,
इवलुश्या मार्कांच्या प्रगतीपुस्तकावर मारलेली बाबांची खोटी सही….
गेले कुठे ते चालताना “पॅकपॅक” आवाज करणारे पायातले बूट?
“मी नाही देणार जा माझं चॉकलेट” म्हणत आवळलेली ती घट्ट मुठ….
किती जिव्हाळा होता डोकं टेकवलेल्या आईच्या हाताच्या उशीत?
ब्लँकेटहून जास्त उब होती त्या मायेच्या कुशीत…
हरवला तो प्रेमाचा घास….“चिऊताई” दाखवत आईने भरवलेला…
घरात न सांगता लपवून लपवून भेळ खायचा तो प्लॅन ठरवलेला?
गेले कुठे जत्रेतले ते गोड गोड म्हातारीचे केस?
छोट्याशा बुटांची आईने बांधलेली ती सुटलेली लेस….
गेली कुठे ती मामाच्या गावी जाणारी झुकझुक गाडी?
हरवली कुठे ती क्रिसमस मधली झिंगलमॅनची पांढरी दाढी?
धावत धावत ज्याचा पाठलाग केला तो धुरवाल्याचा धूर कुठे गेला?
शाळेत बडबड गीते गाताना एकत्र लावलेला तो सूर कुठे गेला?
झोपताना पाहिलेला तो चांदोमामा कुठे हरवला?
अ आ इ ई पाठीवर लिहिणारा तो खडू कुणी पळवला?
कशाला आलं हे आपल्याला शहाणपण????
हरवलं त्यात ते सुंदर बालपण…….
खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा ना? आयुष्यातील काही अनमोल क्षणांची आठवण ते क्षण निसटुन गेल्यावरच प्रकर्षाने होते. पण बालपणीच्या काही आठवणी, मनाच्या कोपर्यात अजुनही दाटलेल्या असतात, त्यांना हलकेच गोंजारल असता त्यांची सय अधिकच गडद होते. आपलं मनही किती विचित्र असतं ना. जेंव्हा लहान असतो तेंव्हा पटकन मोठे व्हावेसे वाटते. शाळा सोडुन बाबांसारखे ऑफिसला जावेसे वाटते तर दादासारखे कॉलेजला जावंस वाटतं. मुलींनाही आईसारखी साडी नेसुन स्वयंपाक करायला आणि ताईसारखा नट्टापट्टा करायला आवडतं. मात्र आता मोठे झाल्यावर पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात आणि नकळत डोळ्यात पाणी येतं.
पाखरे जर दिवस असते
आभाळी मी सोडिले नसते
फिरूनी त्यांना ह्रदयात मी
कोंडुन ठेविले असते
ते पाखरू मागे न वळले
मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना
जे परतुन कधी ना आले…
मज आवडते हि मनापासुनी शाळा, लाविते लळा हि जशी माऊली बाळा
कुठे आहे कुठे तुझाच सोबती जुना, कळे गावातले विचार हे तुला पुन्हा
जुन्या वाटेवरी नवीन चालणे तुझे, फिरे गावातुनी जणु नवाच पाहुणा
जुने विसरायचे बरे नव्हे अरे मना, असे बदलायचे खरे नव्हे अरे मना
हसावे वाटते फिरून आजही तुला, कशी वळते नजर तुझी पहा पुन्हा पुन्हा
एक होती चिऊ….एक होता काऊ
कावळ्याचे घर होते शेणाचे….चिमणीचे घर होते मेणाचे
एक दिवशी काय झाले…मोठ्ठा पाऊस आला आणि….
माझा खाऊ मला द्या
खेळ मांडियेला : आया रे खिलौनेवाला खेल खिलौने लेके आया रे…
चांदोबा चांदोबा कुठे रे गेलास
दिसता दिसता गडप झालास
हाकेला ओ माझ्या देशील का
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का…?
आयुष्यातील हे सोनेरी दिवस कसे पटकन निघुन गेले नाही. अगदी चांदोबा मामाच्या या गाण्यासारखेच ते दिवस बघता बघता सरून गेले. उरल्या त्या फक्त आठवणी. पण…. मला पुन्हा ते दिवस जगायचे आहे. एक घास चिऊचा…एक घास काऊचा करत भरवलेला जेवणाचा घास आईच्या हातातुन खायचा आहे, मला पुन्हा शाळेत जायचंय, मित्रांबरोबर खोड्या करायच्यात, मधल्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवणाचा डब्बा शेअर करायचाय, शाळेच्या स्नेहसंमेलनात भाग घ्यायचा आहे. पत्र्याची शिट्टी इतरांचा ओरडा पडेपर्यंत वाजवायची आहे. बायोस्कोपमधुन दिसणारी रंगबेरंगी दुनिया बघायचीय, चार आण्यात मिळणार्या लिमलेटच्या गोळ्या, शेंगदाण्याची चिक्की, चन्यामन्या बोरं खायची आहे, वडाच्या पारंब्यावर मनसोक्त झोके घ्यायचे आहेत, “घोटीव” पेपराच्या होड्या, विमाने बनवायची आहेत, तासन् तास रंगणारा नवा व्यापार खेळायचा आहे, चंपक, ठकठक्, चांदोबा पुस्तकांचा एका दिवसात वाचुन फडशा पाडायचा आहे. कम्प्युटर से भी तेज दिमाग असणारा चाचा चौधरी, सोबत साबूला घेउन वाचायच आहे, मॅन्ड्रेक्सच्या हातातील अंगठीचा शिक्का उठवायचा आहे. फास्टर फेणे आणि चिंगीच्या साहसी करामती पुन्हा अनुभवायच्या आहेत. साबणाच्या पाण्याचे फुगे उडवायचे आहेत. वाळुत किल्ले बनवायचे आहेत. खुप काही करायचे आहे कारण…
उडणार्या त्या म्हातारीने माझे वय जरी नेले असले तरी माझे मन, जुन्या आठवणी मात्र अजुनही त्या म्हातारीला नेता आल्या नाही.
Harwalel balpan, Balpanichya athwani agadi sukar asnarya ahet. aplyala tya nehamich athwatat. balpani kahllele khau, kelleli khele, he sarv aplyala khup anand detat. ya post madhe asnara mitrancha katta aplyala khup awdnara ahe.
Source : Unknown
Picture Gallery:
5 Comments. Leave new
खरोखर खुप अपतिम़
नकळत डोळे ओले झाले
बालपनाची श्रीमंती कुनास ठाऊक कुठे हरवली,कधी काली पावसाच्या पान्यात जहाजे आम्हीही चालवली….
this is awesome .I like it very much. plz make more eassay and poems on this subject
yere yere wapsa tula deto paisa …paisa zala khota pausa ala mottha…..
Nice post i like it.
Balpanich majjya wegalich hoti.