भोजन विज्ञान

Like Like Love Haha Wow Sad Angry 1 आंबट, कडू, लवणयुक्त, खूप तिखट, जास्त गरम, एकदम कोरडे, अति उष्णता करणारे...
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

types of food

आंबट, कडू, लवणयुक्त, खूप तिखट, जास्त गरम, एकदम कोरडे, अति उष्णता करणारे पेय किवा अन्न हे राजशी पुरुषांना प्रिय असते. हेच पदार्थ दु:ख, चिंता उत्पन्न करणारे आहार होत.
सर्वात आहार शुद्धी, शास्त्रात संतांनी अन्न, द्रव्य यांना तीन प्रकारात अशुद्ध सांगितले आहे.

१. उपाय दुषित, २.  स्वरूप दुषित, ३. क्रिया दुषित

१) उपाय दुषित – छळ, कपट, अन्याय, विश्वासघात , चोरी, जुवा-सट्टा, फसवणूक घुसखोरी यां मार्गाने येनारे धन- द्रव्य हे दुषित आहे.
सर्वात पवित्र अर्थप्राप्ती म्हणजे जो पवित्र माती व जल या पासून उत्पन्न काढून होणारा पैसा हाच सर्वात पवित्र मानल्या गेला आहे.
माती व पाणी यांत राबून कष्ट करणारा शेतकरी जो उत्पन्न काढतो. त्यातून होणाऱ्या अर्थ प्राप्तीला श्रेष्ठ मानलेले आहे. ज्याचा अर्थ शुद्ध आहे. जो न्यायोपार्जीत आहे तोच पवित्र आहे.

जो अधर्म – अन्यायाने प्राप्त होतो तो वरून कितीही शुद्ध स्वरूपाचा दिसत असेल तरीही अपवित्र व दुषित आहे. तसेच दानात मिळालेले धन किवा अन्न  शास्त्रात शुद्ध मानलेले नाही. फक्त आपत्ती काळात घेतलेले सोडून बाकी लोभात घेतलेले धन किंवा द्रव्य ब्राम्हणांना हि वर्जित आहे, तो पवित्र नाही. न्यायपूर्वक आपल्या श्रमाने प्राप्त केलेले धन-द्रव्य किंवा अन्न त्यातही त्याचा दशांश भाग दान करून शेष भाग तोच शुद्ध, व पवित्र मानलेला आहे.

2) स्वरूप दोष :  जे अन्न बुद्धीवर्धक आणि वीर्यरक्षक तसेच उत्तेजक न करणारे, रक्त दुषित न करणारे, तसेच रोग उत्पन्न न करणारे असे सात्विक असते  त्या अन्नाला शुद्ध सत्वगुणी म्हटले जाते. साधकास तसेच, अध्यात्मिक व धार्मिक प्रवृत्तीची प्रकृती असलेल्या व्यक्तींनी चविष्ट आसक्ती सोडून हेच शुद्ध सत्वगुणी भोजनच नेहमी घेतले पाहिजे. गहू, जव हे सत्व गुणी अन्न आहे, पण जर याला भाजून घेतले असता या मधील सत्व कमी होऊन रसहीन, रुक्ष व रजोगुणयुक्त होते. तसेच चना हा वायूप्रधान आहे. पण यास भाजून त्याचा फोलासहित उपयोग करावा.
मांस, अंडे, दारू, नशा येणारे पदार्थ, तसेच मसूर डाळ, गाजर, वांगे, बिस्कीट, ब्रेड, वनस्पती तूप, चहा, कॉफी, लसून,कांदा, तंबाखू, विदेशी दुधपावडर हे सर्व पदार्थ अपवित्र व मादक आहेत. याने बुद्धीला दुषित, मलीन करणारे आहेत. तसेच हिरव्या पानांची म्हणजे मेथी, पालक ,चवलाई, आणि ढेमस, लवकी या प्रकारातील भाज्या सत्वगुणी प्रकारात मानतात. फळांमध्ये मोसंबी, संत्र, आंबा ज्यांचा रस गोड आहे, तसेच आवळा, बेल हि फळे फार श्रेष्ठ मानल्या गेली आहेत. यां पासून शक्ती, स्फूर्ती आणि आरोग्य मिळते.

मेवा म्हटले कि तेलयुक्त अक्रोट, बादाम, काजू, फ्ल्लीदाने, पिस्ता हे राजसी व उत्तेजक आहेत या पासून साधकाने दूरच असायला हवे. तसेच गुळ, साखर हे अति सेवन करणे योग्य नाही हे सुद्धा गरम, उत्तेजक व रक्तविकार करणारे आहेत. तसेच यापासून तयार होणारे म्हणजे हलवा, गोड भात, खीर  हे पदार्थ पचायला जड व गरिष्ठ असतात या पासूनही साधकाने दूर असावे. या पासून आरोग्यात जडपण येतो.

साधकास आहारात सर्वात उत्तम म्हणजे गाईचे दुध योग्य आहे बाकी सर्व प्रकारचे दुध उष्ण आहेत ते पिण्या योग्य नाही. आणि दुधात फार कमी प्रमाणात साखरेचा वापर करावा. दुधात गुळाचा वापर करू नये. दुधात आपण शुद्ध तुपाचा वापर करू शकतो ते सात्विक, लाभदायक आहे, पण ते तूप शुद्ध असायला हवे, मिसळीत असल्यास ते आरोग्यास अत्यंत हानिकारक आहे.

* गाईच्या तुपाला आयुर्वेदात सात्विक व शुद्ध मानले आहे. तसेच आंबट दही, उत्तेजक असून ताक (आंबट नसलेले) आरोग्यास लाभदायक आहे.
* भोजनात सर्वात महत्वाचे म्हणजे पाण्याच्या शुद्धते वर भर द्यावी. पाण्यात बर्फ, किंवा सुगंधित द्रव वापरू नये त्यामुळे पाण्याची शुद्धता, स्वाभाविकता व  सात्विकता नष्ट होते. आणि मनुष्याने आरोग्या करीता आवश्यक असल्यास शक्यतोवर आयुर्वेदातील औषधांचा वापर करावा.

३ ) क्रिया दोष :  आहार नेहमी न्यायोपार्जीत धन किंवा द्र्व्यातून मिळालेले असेल तरी त्यात स्वरूपदोष नकोत.कुठल्याही ऋतू नुसार मनुष्याने आहार करायला हवा जसे रात्री दही खाणे याला क्रिया दोष म्हटल्या जाते. हा प्रकार म्हणजे मनाला दुषीत करतो.
व शरीरात विकार करतो.

४) स्वयंपाकातील स्थान : या ठिकाणी आपण स्वयंपाक करतो तेथील व्यवस्था निट नेटकी व पवित्र असावे आधुनिक काळात तर ओट्यावर स्वयंपाक केल्या जातो पूर्वी जमिनीवर चूल मांडून लाकडे पेटवून मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केल्या जात असे ती अगदी जागा अगदी स्व्च्छ करून गाईच्या शेणाने सारवून उत्तम रीतीने वापरल्या जात असे. पण आता खेडोपाडी सुद्धा स्वयंपाकासाठी ग्यसच वापरला जातो.

पण आजही कुठे मातीच्या चुलीवर स्वयंपाक करण्याचे झाल्यास शास्त्रात सांगितल्या गेले आहे कि शनिवार व गुरुवारी स्वयंपाकाची चूल शेणाने न सारविता फक्त माती व पाण्यानेच सारवावी या दोन दिवशी शेणाचा उपयोग करू नये. चूल सारविन्यापूर्वी आपण स्वत: स्वच्छ व्हावे, तसेच महिलांनी स्वयंपाकघरात प्रवेश करण्यापूर्वी हातपाय तोंड स्वच्छ करूनच जावे. स्वयंपाक करण्याचे नियमात म्हटलेले आहे कि स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करूनच स्वयंपाक करावा. व करताना मनात प्रसंन्नता हवी. बाहेर फिरून आल्या बरोबर स्वयंपाक खोलीत प्रवेश करू नये. चामडी चप्पल, तसेच मलीन कपडे परिधान करून स्वयंपाक केल्यास ते अन्न अपवित्र मानलेले आहे.ते भोजनास योग्य नाही. तसेच मांजर, चांडाल, कुत्रा, कावळा यांनी स्पर्श केलॆले किंवा त्यांची दृष्टी पडलेले अन्न खाण्यास अपवित्र मानलेले आहे. तसेच स्वयंपाकात नेहमी स्व्च्छ भांड्यांचा वापर करावा.

उपसंहार :  कपट बुद्धी किंवा घृणास्पद दृष्टीने केलेला स्वयंपाक विकारयुक्त व विशैला मानलेला आहे. तो हानिकारक व पचण्यास अयोग्य आहे. आणि चिंतीत मनस्थितीत बनविण्यात आलेले अन्न ब्लड प्रेशर वाढविणारे व हृद्य विकार वाढविणारे असल्याचे मानल्या गेले आहे. प्रसन्न मनोवस्थांत बनविण्यात आलेला स्वयंपाक स्वास्थ्यप्रत व गुणकारी असते.

शांत अंत : करण आणि सुखद व प्रसन्नता पूर्वक स्वस्थ भावना ठेवून तयार केलेले भोजन ग्रहण केल्याने मनात ईश्वरीय भक्ती प्रदान करतात, मन आनंदित ठेवतात.

तसेच बाजारीय पदार्थ सेवन केल्यास किंवा नावडत्या व्यक्तींच्या हातचे बनलेले भोजन केल्याने चिंता, क्लेश, द्वेषभावना, आसुरीप्रवृत्ती मनात निर्माण होते, आणि अतृप्त, भुकी व्यक्ती किंवा महिलेच्या हातचे बनविलेले अन्न ग्रहण केल्यास मन व शरीर अस्वस्थ होते.आणि स्वास्थ्य बिघडते.
आपण नेहमी आपल्या आवडत्या किंवा आई, बहीण, पत्नी, गुरुमाता यांच्या द्वारे बनविण्यात आलेले भोजन शुभप्रद, स्वाथ्यप्रद, गुणकारी, सात्विक असेच भोजन केले पाहिजे. ते कधीही हानिरहीत ठरते.

हॉटेल, परकीय व्यक्तींच्या हातचे भोजन सहानुभूतीशून्य असल्याने आपल्या आरोग्याला अपायकारक ठरते.

| अन्नं ब्रम्हा रसो विष्णूर्भोक्ता देवो महेश्वर:|    अर्थात अन्न ब्रम्हा आहे. रस विष्णू आहे आणि ग्रहण करणारा महेश्वर असे शास्त्रांत म्हटल्या गेले आहे. म्हणून जेवणाचे वेळी शुद्ध, सात्विक भाव ठेवून आनंदाने जेवण करावे. तरच मनात सात्विक संस्कार उत्पन्न होतात. अन्न कसेही असले तरी जेवतेवेळी चांगले भाव ठेवून जेवण केल्याने ते एक प्रकारे नैवेद्य बनते. व त्यात आश्चर्य जनक शक्ती उत्पन्न होवून शुद्ध रक्त व पौष्ठिक तत्व शरीरात संचार करते, जेवतेवेळी ईश्वराचे मनात चिंतन  (अन्न देवतेचे स्मरण) करावे. तेव्हा अन्न प्रसादरूप होऊन सुख, शांती व आनंद प्रदान करते.
करावे.

भोजन-भ्रमण-कर्म-आराम

भोजनात नेहमी समानता हवी. कारण अन्न हे सर्व इंद्रीयांचा ग्रहण करण्याचा विषय आहे. अती अन्न ग्रहण केल्याने इंद्रीयांवर परिणाम होतो. ज्या प्रमाणे सिनेमा घरात आपण तीन तास डोळे लाऊन चित्रपट बघतो म्हणजे डोळ्यांना अति भोजन दिल्या प्रमाणे झाले. त्यानंतर डोळे दुखावयास लागणार. एखादे दिवशी जास्त जेवण झाल्यास आपले काम करण्याचे मनच होत नाही. म्हणजेच इंद्रीयान वर त्याचा विपरीत परिणाम झाला असेच समजते. तेव्हा कधीही आत्मसम्मित भोजन घ्यावे. आपल्याला जेवढे अनुकूल किंवा योग्य होईल तेवढेच अन्न ग्रहण करावे. अन्न बघितल्या नंतर मन प्रसन्न असावे, त्याच्या बद्दल कघीच वाईट बोलू नये. जो मनुष्य अन्नाचि कधीच निंदा करीत नाही. तो अन्नासाठी कधीच त्रस्त होत नाही.

कधी कधी अन्नाची काही व्यंगता काढून रागाने अन्नाचे ताट फेकतात म्हणजेच अन्नचा तिरस्कार करनेच होय त्याला पुढे अन्नासाठी त्रस्त व्हावेच लागते. उदा त्याच्या घरी भरपूर अन्न असूनही अश्या एखाद्या बिमारीने त्रस्त होऊन अन्न खाऊ शकत नाही. म्हणून अन्नाचा मान राखावा, अन्न ब्रम्ह आहे. अन्नात तीन दोष तयार होतात. माससहीत अन्न म्हणजे जातीदोष अन्न, उष्ठ्या व मलीन भांड्यात बनविण्यात आलेले अन्न म्हणजे आश्रयदोष, आणि अशुद्ध अपवित्र, रडत बनविलेले, किंवा केस वै.पडलेले  अन्न म्हणजे निमित्तदोष म्ह्टल्या गेलेले आहे.

तसेच दुसर्याच्या ह्क्कातले अन्न, चोरलेले अन्न हे पवित्र नाही, म्हनून नेहमी आपल्या हक्कातील व आवश्यकते नुसार भोजन शुद्ध व पवित्र मानलेले आहे तेच आपल्या इंद्रीयांना रोगापासून मुक्त ठेवतात, आपले स्वास्थ्य सुंदर तसेच जीवनात सुख-शांती प्रदान करतात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Related Stories