Food science means food purity thinking, purity and work purity., food science means food purity thinking purity and work purity.
The meta description will be limited to 156 charread Marathi article about the food, and how food is necessary fr the body, health and mentality.
आहार हा प्रत्येक प्राणीमात्रांचा आधार आहे. जन्मापासून ते मृत्यू पर्यंत प्राणी त्याकरीता भागदौड करीत असतो, भगवंतांच्या श्लोकात म्हटल्या गेले आहे कि “अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा” हे सत्य आहे. पण आजच्या या आधुनिक आणि व्यस्त जीवनात मनुष्य आपल्या खानपान वर येवढे दुर्लक्ष करीत आहे. ज्या कारणाने प्रतिदिन त्याच्या जीवनात वेगवेगळ्या रोगांची वृद्धी होत आहे. घरी बनविलेले ताजे व शुद्ध अन्नाचे भोजन सोडून बाजारू फाष्ट-फ्रूड आणि अशुद्ध अन्न सेवन करण्यात त्याला रुची वाटत आहे. खाणे-पिणे, राहणीमानातील जीवन पद्धती आता पाश्चात सभ्यतेकडे केंद्रित होत आहे. आणि आज आपणच भारतीय संस्कृतीचा गौरव नष्ट करण्याच्या मागे लागलेले आहोत. हि एक प्रकारे भारतीय संस्कृतीची विडंबना आहे. पाश्चात्य लोकांचे रहन-सहन, खाणपेन यांचा स्वीकार करन्यातच गौरव समजल्या जात आहे. हि साधी वाटणारी गोष्ट नसून ह्यांचे परिणाम फार भयानक रूप धारण करीत आहे. हि एक विचार करण्या बाबत बाब आहे. त्या खाण-पानाने कर्करोग, हृद्यरोग, टी. बी.,एड्स या सारख्या असाध्य रोगांची वृद्धी होत आहे. तसेच चिंता, क्लेश, उद्वेग व आसुरी या प्रकृती वाढत आहे. कारण आमच्या खानपान व राहणीमानावर सर्व आरोग्य, स्वभाव-गुण अवलंबून असते.
आमची शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक उन्नती आणि संस्कार हे आमच्या दैनंदिन आचार- विचार,खान-पेन याच्याच प्रभावा वर निर्भर असते. अन्न आणि मन यांचा फार नाजूक संबंध आहे हे आमच्या शास्त्रांत सांगितल्या गेलेले आहे. मन हा आमच्या इंद्रियांचा स्वामी आहे. आमचे इंद्रिय ज्या प्रकारे अन्न ग्रहण करतात. त्यांचा प्रभाव सूक्ष्म रुपात आपल्या मनावर होतो.
शुद्ध आहार सेवन करणाऱ्या व्यक्तीचा आचार-विचार आणि व्यवहार शुद्ध असतो, व त्याची बुद्धी कुशाग्र असते. शुद्ध आहार व सुद्ध आचार-विचार हे मनुष्याला परमात्म्याचा मार्ग दाखवितात. त्या विरुद्ध अशुद्ध आहार मन मलीन करतो व मनुष्याला विनाशाकडेच पोचवितो त्याची प्रवृत्ती नेहमीच विनाशाकडेच धावत असते.
स्वच्छ, सात्विक आहार ग्रहण केल्याने मन स्वच्छ राहून स्मरण शक्ती तीव्र व प्रखर बनते, स्मरणशक्तीच्या तीव्रतेने आमच्या वासनाग्रंथीची निवृत्ती करून मन मोक्ष प्राप्ती कडे धाव घेते.आहार शुद्धी मनुष्याचे जीवन सुंदर बनवितेच पण मृत्यू हि सुखद बनविते. आयुर्वेद सिद्धांतात म्हटले आहे कि शुद्ध व शाकाहारी भोजन शरीर निरोगी ठेवतेच आणि न्यायोचित निर्णय घेण्याची क्षमता वाढवितो. अन्नानेच शरीरात रक्त बनते. त्यानुसार गुण, अवगुण प्राप्त होते. मन-बुद्धी, अंत:करण निर्माण होण्यात भोजनाचे विशेष स्थान आहे. श्रीकृष्ण भगवंतानि गीतेत आहाराविषयी सत्व, रज आणि तम उत्पन्न करणार्या गुणाबद्दल सुंदर व्याखेत म्हटले की “आयु — स्त्वबलारोग्यसुखप्रितीविरर्धना:| रस्या: स्निग्धा: स्थिरा: हृद्या आहारा: सात्विकप्रिया: ||
आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रेम वाढवणारे रसयुक्त, शांत आणि स्थिर राहणाऱ्या स्वभावाने,तथा मनाला प्रिय वाटणारा आहारच सात्विक पुरुष्याला प्रिय असतो.